हिमायतनगर, अनिल मादसवार| सर्वदूर ख्यातीप्राप्त असलेल्या हिमायतनगर (वाढोणा – वारणावती) येथील श्री परमेश्वर देवस्थानच्या 2025 ची महाशिवरात्री यात्रा महोत्सव नियोजन संदर्भात दि.02 जानेवारी गुरुवारी दुपारी 2 वाजता खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली. बैठकीत सर्वानुमते यात्रा सब कमिटीच्या अध्यक्षपदी सुभाष शिंदे, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण तर सचिवपदी अनिल भोरे यांची निवड करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही युवकांच्या पुढाकारातून श्री परमेश्वराची यात्रा हर्षोल्हासात साजरी होणार आहे.
सबंध भारतात एकमेव उभी श्री परमेश्वर मूर्ती नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा) शहरात आहे. त्यामुळे राज्यभरातून तसेच विदर्भ – मराठवाडा- तेलंगणा – आंध्रप्रदेश – कर्नाटक राज्यातुन लाखो भाविक भक्त महाशिवरात्री निमित्ताने श्री परमेश्वर दर्शनासाठी गर्दी करतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर (वाढोण्याच्या) श्री परमेश्वराची महाशिवरात्री यात्रा जवळ येऊन ठेपली आहे. यात्रेतील कार्यक्रम व नियोजन संदर्भाची दि.02 गुरुवारी मंदिराच्या पदसिद्ध अध्यक्षा तथा तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत जेष्ठ शेतकरी विठ्ठलराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर सभागृहात बैठक संपन्न झाली. या बैठकीस मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक प्रकाश शिंदे, वामनराव बनसोडे, राजाराम झरेवाड, ऍड दिलीप राठोड, मथुराबाई भोयर,अनिल मादसवार, संजय माने, विलासराव वानखेडे, गजानन मुत्तलवाड, लिपिक बाबुराव भोयर, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, पोलीस निरीक्षक अमोल भगत, विकास पाटील, संतोष गाजेवार, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
2025 ची महाशिवरात्री यात्रा महोत्सव दि.24 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार असून, दिनांक 12 मार्चला यात्रेचा सत्कार सोहळ्याने समारोप केला जाणार आहे. यात्रा महोत्सव दरम्यान भाविक – भक्त, व्यापारी, कलावंत, खेळाडू, भजनी मंडळ व यात्रेकरूना येणाऱ्या आडी- अडचणी तसेच भव्य शंकरपट स्पर्धेच्या नियोजन संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. सुरुवातीच्या सप्ताह काळात ज्ञानेश्वरी व वीणा पारायण, काकडा आरती, हरिपाठ, अखंड हरिनाम, किर्तन, प्रवचने आदी भव्य धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. त्यानंतरच्या काळात धार्मिक – सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व शेतकऱ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा काळात आयोजित कार्यक्रम सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी आणि यश मिळविणाऱ्या संघ, खेळाडू, शालेय स्पर्धा, कब्बड्डी, भव्य कुस्त्यांची दंगल, भजन, पशुप्रदर्शन, मनोरंजन महिलांसह विविध स्पर्धेत विजेत्यांना बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यात्रेत आयोजित कार्यक्रमाच्या उपसमित्या नेमण्यात आल्या असून, स्पर्धा संपन्न करण्याची जबाबदारी संबंधित समितीच्या पदाधिकार्यांवर सोपविण्यात आली आहे. एकूणच यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या सुविधा व दर्शनार्थीना प्रसादाचे वितरण आई सुरक्षेच्या दृष्टीने विशेष नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी सुनंदा दासेवार, बाबूराव बोडडेवार, मायंबा होळकर, पांडुरंग तुपतेवार, नगरपंचायतचे प्रतिनिधी म्हणून मारोती हेंद्रे, बाळू हरडपकर, बाबुराव पालवे, बाळू अण्णा चवरे, गजानन चायल, गजानन हरडपकर, सदाशिव सातव, राम नरवाडे, राजू गाजेवार, पापा शिंदे, रामू शक्करगे, संतोष वानखेडे, मारोती शिंदे, बाबुराव बंडेवार, बाबुराव पालवे, विकास नरवाडे, माधव शिंदे, रामेश्वर मोरे, साहेबराव अष्टकर, परमेश्वर काळे, सुधाकर चिटेवार, श्याम पाटील, संदीप तुप्तेवार, गंगाधर बासेवाड, भारत डाके, दत्तात्रेय काळे, रामेश्वर पेटपल्लेवार, पापा पार्डीकर, वैभव वानखेडे, दत्तात्रेय दळवी, वैभव डांगे, किरण माने, बालाजी ढोणे, दुर्गेश मंडोजवार, जितू सेवनकर, आशुतोष बोरेवाड, पंडित ढोणे, गजानन वारकड, गजानन वानखेडे, नागेश शिंदे, अनिल नाईक, देवराव वाडेकर यांच्यासह भजनी मंडळाचे कार्यकर्ते व गावातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.