लोहा| लोहा नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा जिजाबाई व्यंकटराव मुकदम -चव्हाण यांचे वृद्धोपकाळात उपचारा दरम्यान गुरुवारी सायंकाळी चार वाजता त्याचे निधन झाले मृत्यू समयी त्यावर वय ८५ वर्ष होते .आज शुक्रवारी (३ जानेवारी) दुपारी एक वाजता जुना लोहा येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
कंधार व लोहा पंचायत समितीचे माजी सभापती व्यंकटराव मुकदम -चव्हाण याच्या सहचारिणी जिजाबाई मुकदम -चव्हाण या मागील पंधरा दिवसा पूर्वी घरात पडल्या होत्या .त्याच्या पायाचे हाड फ़ॅक्चर झाले होते.नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती .त्यातून त्या सवरल्या पण गुरुवारी पुन्हा त्याची तबीयत खराब झाली व त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
स्व व्यंकटराव मुकदम यांच्या राजकीय सामाजिक जीवन कार्यात जिजाबाई या सावली सारख्या उभ्या राहिल्या. राजकीय घराणे असल्याने माणसाचा राबता मोठा होता.अनेक कुटुंबे उभे केली. एक सुसंकृत – आदर्श माता होत्या नोव्हेंबर १९८७ ते १९९३ तसेच १९९३ ते १९९८ या दहा वर्षात त्या लोहा नगर पालिकेच्या नगरसेविका होत्या.२००३ ते २००८ या काळात लोहा नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. शॉपिंग सेंटर, स्मशानभूमी, जुन्या शहरात जाणारा सिमेंट रस्ते, नगर पालिका इमारत, वाचनालय अशी अनेक विकास कामे त्यांनी केली. देशाचे गृहमंत्री डॉ शंकरराव चव्हाण , माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण ,आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्याशी मुकदम कुटुंबियांचे स्नेहाचे नाते राहिले आहे.
जिजामाता मुकदम यांच्या पश्चात सेवानिवृत्त कृषी अधिकारी माणिकराव मुकदम, सेवानिवृत्त विद्युत अभियंता नारायण चव्हाण , माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, सेवानिवृत्त बँकेचे व्यवस्थापक माधवराव चव्हाण ही चार मुलगे, महानंदा बाबुराव मोरे व पद्मिन प्रा धनजंय पवार या दोन मुली , नातवंडे , सुना नातु पणतू असा चार पिढीचा मोठा गोतावाळा सुसंस्कृत कुटुंब त्यांनी घडवील आहे. आज शुक्रवारी ३ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता जुना लोहा येथे जिजाबाई मुकदम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .