नांदेड l तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावाचे सुपूत्र तथा पंचायत समितीचे माजी सभापती मोतीराम पाटील मोरे यांचा वाढदिवस दरवर्षी प्रमाणे १ जानेवारी रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावर्षी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा भव्य किर्तन सोहळा यानिमित्ताने त्रिकुट येथील गणपती मंदीरात पार पडला त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आ.प्रतापराव पाटील चिखलीकर , आ. हेमंत पाटील, भाजपाचे चैतन्य बापू देशमुख, शिवसेनेचे विनय गिरडे पाटील, भाजपाचे संतोष क्षिरसागर पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी भेटून त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे
ब्राम्हणवाडा गावाचे सुपूत्र श्री मोतीराम पाटील मोरे यांना घरातूनच राजकीय बाळकडू मिळाले होते त्यांचे वडील विठ्ठलरराव पाटील मोरे यांनी सुद्धा सरपंच पदाचे मानकरी झाले त्यानंतर काका महादजी तोलाजी मोरे यांना सुद्धा ब्राहम्णवाडा गावाच्या सरपंच पदाची सूत्र देण्यात आली…मोतीराम पाटील यांचे मोठे भाऊ बालाजी मोरे यांनी सुद्धा पाच वर्ष सरपंच म्हणून काम पाहिले.
अशा राजकीय वातावरणात त्यांनी १९८८ साली ब्राम्हणवाडा ग्रामपंचायत निवडणुकीची पहिली निवडणूक लढवली त्यात सरपंच पदाचे सूत्र मोतीराम पाटील यांच्या हाती गावकऱ्यांनी दिली.व त्यानंतर श्री मोतीराम पाटील मोरे यांच्या गावाला सांभाळून घेतांनाच गोरगरिबाच्या अडीअडचणीला सहकार्य करण्याची भूमिका आणि त्यांचा मायाळू स्वभाव आणि मनमिळावू वृत्ती व अनेकांना अडचणीच्या काळात त्यांचा वाटणारा खंबीर आधार या जमेच्या बाजूंमुळे गावकऱ्यांनी मोतीराम पाटील यांना सलग चाळीस वर्ष ग्रामपंचायत चा कारभार सोपविला पुढे त्यांचे वारस म्हणून विठ्ठल मोरे यांना सुद्धा सरपंच पदावर विराजमान करून ब्राह्मणवाडाचे काम पाहिले. ब्राहम्णवाडा विकासात मोतीराम पाटलांची निर्णायक कामगिरी श्री मोतीराम पाटलांच्या दूरदृष्टीमुळे ब्राहम्णवाडा हे गाव नांदेड जिल्हयाच्या पटलावर आले.
श्री मोतीराम पाटील यांनी आपल्या गावातील प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन सलग चाळीस वर्ष सरपंच पदाचे सूत्र हाती ठेवत अतिशय नियोजन पद्धतीने गाव विकसित करण्यास मोठा सिंहाचा वाटा त्यांनी उचलला ज्यात पहीले व आमूलाग्र असे कार्य म्हणजे माजीमुख्य मंत्री माननीय अशोकरावजी शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या पाठपुराव्यातून गाडेगाव येथे गोदावरी नदीवर उभारलेला पूल ज्यामुळे खऱ्या अर्थाने ब्राहम्णवाडा गाव हे वेगवान झाले.
यासह सरपंच पदाच्या कार्यकाळात गावात शाळा,पशुवैद्यकीय दवाखान्याचे उपकेंद्र, अंतर्गत नाल्या,रस्ते, समशानभूमी यासोबतच आरोग्य उपकेंद्राची उभारणी असे महत्वपूर्ण विकासकामे त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केली त्यांचा राजकीय प्रवास हा ब्राहम्णवाडा गावाचे सरंपच ते पंचायत समिती व पुढे नांदेड प.स.चे सभापती असा चढत्या क्रमाचा राहीला आहे .किर्तन सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन हे ब्राम्हणवाडा चे माजी सरपंच पै. विठ्ठल पा. मोरे व मित्रमंडळींनी चोखपणे पार पाडले .