Motiram Patil More ; मोतीराम पाटील मोरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा – NNL
नांदेड l तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावाचे सुपूत्र तथा पंचायत समितीचे माजी सभापती मोतीराम पाटील मोरे यांचा वाढदिवस दरवर्षी प्रमाणे १ जानेवारी रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावर्षी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा भव्य किर्तन सोहळा यानिमित्ताने त्रिकुट येथील गणपती मंदीरात पार पडला त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आ.प्रतापराव पाटील चिखलीकर , आ. हेमंत पाटील, भाजपाचे चैतन्य बापू देशमुख, शिवसेनेचे विनय गिरडे पाटील, भाजपाचे संतोष क्षिरसागर पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी भेटून त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे
ब्राम्हणवाडा गावाचे सुपूत्र श्री मोतीराम पाटील मोरे यांना घरातूनच राजकीय बाळकडू मिळाले होते त्यांचे वडील विठ्ठलरराव पाटील मोरे यांनी सुद्धा सरपंच पदाचे मानकरी झाले त्यानंतर काका महादजी तोलाजी मोरे यांना सुद्धा ब्राहम्णवाडा गावाच्...
