हिमायतनगर l दुर्जन माणसांची संगत करणे म्हणजे इंगळीचा दंश घेणे होय. दुर्जनांची संगत ही दंशाइतकी दाहक असते. तुम्ही दुर्जनांच्या संगतीने दुर्जन होता. म्हणून यावर उपाय एकच आहे. सद्गुणांचा अंगीकार करणे. म्हणून सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहायला हवे. सत्संग सदा घडायला हवा. म्हणजे दुर्गुणांचा दाह शांत करता येईल. सज्जन माणसाच्या संगतीने आपल्यातले दुर्गुण नाहीसे होतात. दुर्गुणाच्या इंगळीचा दाह शमतो. म्हणून सत्संग हा दाह शांत करणारा एकमेव उपाय आहे म्हणून दुर्जनाच्या संगतीपेक्षा सज्जनांच्या संगतीत राहिल्यास जिवनाचा मार्ग सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन ह.भ.प.कृष्णा महाराज यांनी केले आहे.
कारला येथील श्री कृष्ण मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.रविवारी सायंकाळची किर्तन सेवा ह.भ.प.कृष्णा महाराज बोंपीलवार यांची झाली आहे.या किर्तन प्रसंगी बोलताना महाराज म्हणाले की आजच्या युगात प्रत्येक माणूस स्वार्थ बनत चालला आहे आपला स्वार्थ पाहून संगत करत करू पाहतो स्वतच सार्थक झाले तर ठिक नाहीतर संगतीत राहून दुर्जनांचा आधार घेत सज्जनाला दुर करीत असल्याचे पहायला मिळत आहे.भगवंतांच्या नामाचे साधन साधले तर इतर साधनाची आवश्यकताच उरत नाही.
कारण नाम घेतले की द्वेत संपते. एकदा द्वेत संपले की भेद संपला. भेद संपला की देव आणि भक्त हा भावच उरत नाही. माणस ओळखून संगत करण गरजेच बनले आहे संतांनी देखील उपदेश केला दुर्जनांच्या संगतीत राहिल्यास जिवनाचा मार्ग चुकत असतो त्यामुळे सज्जनांच्या संगतीत राहून आपल्या जिवनाचा मार्ग सुखकर करून घेतला तर निरोगी जिवन जगता येईल असे कृष्णा महाराज बोंपीलवार यांनी सांगितले आहे.
या किर्तनाचे गायनाचार्य – ह.भ.प. ज्ञानेशार महराज बोटेवाड सिबदरेकर, ह.प.भ. मारोती महाराज राहुलवाड,ह.भ.प. आनंद महाराज गोसलवाड , ह.भ.प. भगवानराव महाराज गुंपलवाड,
मृदंगाचार्य सचिन बोंपीलवार ,ह.भ.प.प्रथमेश यटलेवाड़,नाथा पाटील चव्हाण,प्रा.मारोती देवकर, पोलिस पाटील साईनाथ कोथळकर,अमोल एटलेवाड, जनार्दन मुठेवाड, आडेलू चपलवाड, लक्ष्मण चिंतलवाड, गजानन एटलेवाड, केशव रासमवाड, राजेश ढाणके, रामराव लुम्दे, संजय इटेवाड, यांच्यासह कृष्ण भक्त मंडळाची उपस्थिती होती.