हिमायतनगर| बॅंकेतुन शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड करीता निनावी कॉल ऐत आहे. यामध्ये टेक्स्ट मॅसेज करून त्यामध्ये एक लिंक पाठविली जात आहे. लिंकवर क्लिक करून आलेला ओटीपी सांगताच खात्यातील रक्कम गायब होत असल्याचे प्रकार घडत असुन, असाच एक प्रकार सोमवारी एका शेतकऱ्यासोबत घडला आहे. त्या शेतकऱ्याने सांगितलेल्या अटीमुळे त्यांच्या खात्यातील 85 हजार रुपये काढून घेतल्या गेल्याने सदरील शेतकरी हतबल झाला. ऐवढी रक्कम गायब झाल्याने खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात भेट देऊन नांदेडच्या सायबर क्राईमकडे याबाबतची तक्रार केली आहे.
हिमायतनगर तालुक्यात निनावी कॉल करून अनेकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार घडत आहे. कारला येथील अल्पभूधारक शेतकरी नाथा बळीराम चौरे यांना बॅंकेतुन बोलतो असा निनावी नंबरवरून सोमवारी सकाळी फोन आला. या दरम्यान तुमचं क्रेडिट कार्ड बंद कराव लागेल अन्यथा दंड लागतो असे बोलत तुमच्या मोबाईलवर टेक्स्ट मॅसेज बँकेतून पाठवला आहे. त्या लिंकच बटन दाबा आणि ओटीपी सांगा सदरील ओटीपी सांगताच शेतकरी नाथा चौरे यांच्या भारतीय स्टेट बँकेच्या खात्यात कापूस विकून जमा केलेले 85 हजार रुपयाची रक्कम काही सेकंदात गायब झाली असल्यामुळे शेतकऱ्याला धक्काच बसला आहे.
निनावी फोन करून अनेकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार घडत आहे. याबबतीत सायबर क्राईम कडे जाऊन तक्रार करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यापुर्वी दोन महिन्या अगोदर पिचोंडी गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावरील 75 हजार रुपये रोख निनावी फोन करून काढून घेतली गेली आहे. अशा अनेक घटना घडत असुन, शेतकऱ्यांसह प्रत्येक नागरीकांनी जागरूक राहणे गरजेचे असुन, बँकेतून फोन आला असला तरी बँकेत भेट द्यावी. परंतु कुणालाही ओटीपी सांगू नये असे आवाहन बँकेच्या शाखा अधिकारी तसेच पोलिस निरीक्षक यांनी केले आहे.