85 thousand missing : शेतकऱ्यांनो सावधान… बॅंकेतुन शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड करीत निनावी कॉल; खात्यातील 85 हजार गायब -NNL
हिमायतनगर| बॅंकेतुन शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड करीता निनावी कॉल ऐत आहे. यामध्ये टेक्स्ट मॅसेज करून त्यामध्ये एक लिंक पाठविली जात आहे. लिंकवर क्लिक करून आलेला ओटीपी सांगताच खात्यातील रक्कम गायब होत असल्याचे प्रकार घडत असुन, असाच एक प्रकार सोमवारी एका शेतकऱ्यासोबत घडला आहे. त्या शेतकऱ्याने सांगितलेल्या अटीमुळे त्यांच्या खात्यातील 85 हजार रुपये काढून घेतल्या गेल्याने सदरील शेतकरी हतबल झाला. ऐवढी रक्कम गायब झाल्याने खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात भेट देऊन नांदेडच्या सायबर क्राईमकडे याबाबतची तक्रार केली आहे.
हिमायतनगर तालुक्यात निनावी कॉल करून अनेकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार घडत आहे. कारला येथील अल्पभूधारक शेतकरी नाथा बळीराम चौरे यांना बॅंकेतुन बोलतो असा निनावी नंबरवरून सोमवारी सकाळी फोन आला. या दरम्यान तुमचं क्रेडिट कार्ड बंद कराव लागेल अन्यथा दंड लागतो असे बोलत तुमच्...
