नांदेड l पत्रकार दिनाचे औचित्य साधून मराठी अपडेट माध्यम समूहाच्या वतीने नवीन नांदेड भागातील पत्रकार बांधवांना देण्यात येणारा, डॉ. शंकरराव चव्हाण नवीन नांदेड पत्रकारीता पुरस्कार उपसंपादक सुरेश आंबटवार यांना, खा. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
पत्रकार दिनाचे औचित्य साधून, मराठी अपडेट माध्यम समूहाच्या वतीने, दरवर्षी नवीन नांदेड भागातील एका पत्रकार बांधवांस डॉ. शंकरराव चव्हाण नवीन नांदेड पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते. गतवर्षी पत्रकार दिंगाबर शिंदे यांना सन्मानित करण्यात आले होते. तर यंदा दै. लोकपत्रचे उपसंपादक सुरेश आंबटवार यांना, खा. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संयोजक, मराठी अपडेटचे संपादक तथा काँग्रेस जिल्हाप्रवक्ते बापूसाहेब पाटील, काँग्रेस कार्याध्यक्ष महेश देशमुख, पत्रकार दिंगाबर शिंदे, शेख कलीम आदीजन उपस्थित होते.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)