नांदेड l राष्ट्रीय ख्यातीच्या नावारुपास आलेल्या भावसार समाजाच्या उपवधू वर परिचय मेळाव्याचे २३ मार्च २०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहे . नांदेड जिल्हा भावसार समाज युवा मंडळ नांदेड तर्फे ओम गार्डन येथे हा भव्य मिळावा संपन्न होणार आहे .
नुकतीच भावसार समाजाचे उप वधू वर परिचय मेळावा कार्यकारणी ची बैठक संपन्न झाली .
यात भावसार समाजातील सोळावा उप वधू वर परिचय मेळाव्यानिमित्ताने उप वधू वर यांची माहिती संकलित करून स्मरणीकेच्या रूपाने प्रकाशित करण्यात येईल .उपवधूवरांची माहिती लवकरात लवकर योग्य पद्धतीने मिळावी म्हणून ऑनलाइन पद्धतीने गुगल लिंक च्या माध्यमातून भरून संकलित केली जाणार आहे .या उपक्रमाचे उद्घाटन याप्रसंगी संपन्न झाले .
यावेळी उपवधु वर परिचय मेळावा समितीचे अध्यक्ष गिरीश बुलबुले कार्याध्यक्ष गंगाधरराव बडवणे सचिव देविदास बुलबुले कोषाध्यक्ष प्रवीण गंडरघोळ उपाध्यक्ष सुरेश गोजे ,अनिरुद्ध नृसिंहराव दांडगे , सागर बुलबुले , प्रमोद हिबारे सहसचिव दत्तात्रेय कोळेकर ,दत्ता गर्जे , सौ.कल्पना पुरणाळे ,शशिकांत भोकरे व समिती प्रमुख सूर्यकांत दत्तोपंत टणे , वसंतराव कंकाळ , प्रभाकर पेठकर, विजय भायेकर ,माणिक देवतराज राजू आंबेकर मनोज कुमार सवणे सुरेश कंकाळ ,संजय पेटकर व सल्लागार बळीराम बडवणे , सुरेश बुलबुले , लक्ष्मीकोत माळवतकर आदींची यावेळी उपस्थित होती .
भावसार समाजातील उपवधूवरांनी दिलेल्या लिंक वर आपला बायोडाटा ऑनलाइन पद्धतीने भरून सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष गिरीश बुलबुले यांनी केले आहे .
या मेळाव्यास महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश तेलंगाना गुजरात तामिळनाडू मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आदि राज्यातून उप वधू वर व त्यांचे पालक उपस्थित राहणार आहेत .