नांदेड| येथील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी मोटार सायकल चोराचा शोध घेऊन येथीलच मोटार सायकल चोरास चार चोरीच्या मोटार सायकलसह ताब्यात घेतले आहे. या कार्यवाहीमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी श्रीनिवास रामराव कोलंबीकर वय 30 वर्ष व्यवसाय श्रीपाद स्केल सर्व्हिसेस वजन-माप काट्याचे दुकान रा.एन.डी.41 सिडको, नांदेड येथून दिनांक 11/12/2024 रोजी वेळ 09.40 वाजताचे सुमारास् चोरीला गेली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे सर्व पो. स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पो. स्टे. नांदेड ग्रा. येथील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरील नमुद गन्हयातील आरोपी व गुन्हयातील चोरी गेलेली मोटार सायकल MH-26 BZ-7927 किमती 40,000/- रुपये गोपनीय माहितीचे आधारे तपासाची चक्रे फिरवुन आरोपीचा शोध घेवुन आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले.
आरोपी मनोज दिनकर सदार वय 38 वर्ष व्यवसाय बेकार रा. संतकबीरनगर, सिडको, नांदेड याच्या ताब्यातुन चोरी गेलेली मोटार सायकल व इतर चोरीचे तीन मोटार सायकल एकुण किमती 1,60,000/- रुपयेचा मुद्देमाल जप्त केले आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोहेकॉ. मोरे हे करीत आहेत. हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड, सुशील कुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हा उघडकीस आणण्यासाठी ओमकांत चिंचोलकर पोलीस निरीक्षक पो.स्टे. नांदेड ग्रा., विश्वदिप रोडे, पोलीस उप निरीक्षक, पो.स्टे. नांदेड, ग्रामीण, महेश कोरे पोलीस उप निरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रामीण पोहेकॉ.मोरे, पोहेकॉ.जाधव, पोहेकॉ. वाकडे, पोहेकॉ. सत्तार, पोकों. माने, पोकों. पचलिंग, पोकॉ. कलंदर, पोकॉ.कल्याणकर, पोकों. सिरमलवार, पोकॉ. माळगे, सर्व पो.स्टे. नांदेड ग्रा. यांनी परिश्रम घेतले.