Sunday, May 17

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

A warm welcome : श्री.श्री. श्री.१००८ मह़ंत आष्टवक्र प्रयागगिरी महाराज यांचे जंगी स्वागत

A warm welcome : श्री.श्री. श्री.१००८ मह़ंत आष्टवक्र प्रयागगिरी महाराज यांचे जंगी स्वागत

नांदेड, धार्मिक
उस्माननगर| येथे सायंकाळी सहा वाजता उस्माननगर येथील सुरेश मामा बास्टे यांच्या श्री अदिराज कृषी दुकाना समोर प .पू. सद्गुरू श्री.श्री. श्री. १००८ श्री . अजिवन सन्मानित महंत आष्टवक्र स्वामी प्रयागगिरीजी महाराज यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून गावकऱ्यांच्या वतीने सुरेश मामा बास्टे यांनी पुष्पमाला घालून जंगी स्वागत केले. तर तेलंगवाडीत महिला भगिनींनी व पुरुषांनी पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत (A warm welcome) केले . तेलंगवाडी ता.कंधार येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी अखंड हरिनाम सप्ताह व श्री. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त प.पू. सद्गुरू श्री.श्री.श्री.१००८ श्री. अजिवन सन्मानित महंत आष्टवक्र स्वामी प्रयागगिरीजी महाराज यांचे शिराढोण हून उस्माननगर मार्गे तेल़ंगवाडी येथे मार्गस्थ होत असताना भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. उस्माननगर येथील श्री अदिराज कृषी दुकाना सम...
Organized mass Monday : हायटेक सिटी येथे सामुहिक सोमवार शिवरात्र आणि प्रदोष उद्यापन सोहळ्याचे आयोजन

Organized mass Monday : हायटेक सिटी येथे सामुहिक सोमवार शिवरात्र आणि प्रदोष उद्यापन सोहळ्याचे आयोजन

नांदेड, धार्मिक
नांदेड| भारतीय संस्कृतीमध्ये अनादि काळापासून व्रत्त, वैकल्य, उपासना ( Organized mass Monday) यांना अनन्य साधारण महत्व आहे. व केलेल्या व्रत वैकल्याचे विधीवतपणे उद्यापन केल्याने त्या व्रताचे योग्य ते फळ प्राप्त होते. त्याबद्दल सोमवार, शिवरात्र, प्रदोष या त्रिवेणी संगमाला विशेष महत्त्व सांगितले आहे. श्री. ष. ब्र.108 सोमलिंग शिवाचार्य महास्वामीजी, बिचकुंदा (तेलंगणा) यांच्या पवित्र सानिध्यात त्यांच्या कृपा आशिर्वादाने तथा श्री शिवयोगी मन्ना महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने शके 1946 पौष कृष्णपक्ष त्रयोदशी दि. 27 जाने 2025 सोमवारी सायंकाळी 4 ते 6.30 या प्रदोष काली या शुभ मुहुर्तावर स्थापित श्री हरी हरेश्वर महादेवांच्या सानिध्यामध्ये स्थापित मंडळांच्या पुजनानी हवनच्या यज्ञानी उद्यापन सोहळा हायटेक सिटी, संकेत हॉस्टेल ते आसना चौक रोड, सांगवी (बु), नांदेड येथे संपन्न होणार आहे. जास्तीत जास्त शिव...
Sreesanth Nandi Maharaj Yatra : कवाना येथील श्रीसंत नंदी महाराज यात्रेला झाली शानदार सुरुवात

Sreesanth Nandi Maharaj Yatra : कवाना येथील श्रीसंत नंदी महाराज यात्रेला झाली शानदार सुरुवात

नांदेड, धार्मिक
हदगाव, शेख चांदपाशा| नांदेड, यवतमाळ जिल्ह्यासह आजुबाजुच्या तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मौजे कवाना येथे श्रीसंत नंदी महाराज (Sreesanth Nandi Maharaj Yatra) यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेकडो वर्षांच्या पंरपरेपासुन चालू असलेल्या यात्रेला यंदा दिनांक १८ पासून शानदारपणे सुरवात झाली आहे. सामाजिक, धार्मिक, एकात्मतेचे प्रतीक असलेल्या यात्रेत विविध कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहेत. दिनांक १२ जानेवारी रोजी सप्ताहाने सुरुवात झाली असून, दररोज भजन, किर्तन, अन्नदान होत आहेत. यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, या धार्मिक कार्यक्रमात पंचक्रोशीतील भाविकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. सणात समागमे धारावी आवडी... करावी तातडी परमार्थाची... पाय तुमचे गुरु राजा... माझी देव पुजा हो शिवपुजा... या नामाच्या गजराने भक्तिमय वातावरणा...
Sandal Urs Enthusiasm; हजरत सय्यद खाकीशाह वल्ली उरुसा अन् संदल नरसीत उत्साहात साजरा

Sandal Urs Enthusiasm; हजरत सय्यद खाकीशाह वल्ली उरुसा अन् संदल नरसीत उत्साहात साजरा

धार्मिक, नांदेड
नायगाव। नरसी येथील सुप्रसिद्ध हजरत सय्यद खाकीशाह वल्ली यांच्या उरुसानिमित्त (Hazrat Syed Khakishah Valli Urusa and Sandal) निमित्त भव्यदिव्य संदल मिरवणूक रैली काढून मोठ्या उत्साहात असंख्य हिंदू -मुस्लिम बांधवांनी संदल दरम्यान अलोट गर्दीत करत राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडवले. नरसी येथील प्रसिद्ध हजरत सय्यद खाकीशाह वल्ली यांच्या नरसी येथे गुरुवारी सायंकाळी नरसीचे पोलीस इब्राहिम बेग पटेल यांच्या निवासस्थाना पासून भव्यदिव्य संदल रैली काढण्यात आली होती.या उरुसा निमित्त रक्तदान शिबीर व भडाऱ्यांचे आयोजन केले असून गुरूवारी बाबांच्या पवित्र दर्ग्यात मौलाना हाफीज उसमान, खारी शाहेद रजा, यांनी चादर अर्पण करत दुवा केली सर्व भाविक भक्तांनी दर्शन घेत तमाम हिंदु मुस्लिम समाजातील बांधवांना संदल उर्स उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नरसीचे संदल चे मानकरी पोलीस पाटील इब्राहिम बेग.दर्गाह चे मुजावर ...
Shivpuran Katha : तिर्थक्षेत्र पिंपळगाव येथे शिवपुराण कथा व दत्त याग यज्ञ सोहळा

Shivpuran Katha : तिर्थक्षेत्र पिंपळगाव येथे शिवपुराण कथा व दत्त याग यज्ञ सोहळा

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर| पिंपळगाव येथील दत्तमंदिर परीसरात मार्च महिन्यात जगद्गुरु श्नी श्नी श्नी १००८ डॉ राजेंद्रदास महाराज यांची शिवपुराण कथा, दत याग यज्ञ होणार असुन, या यज्ञ सोहळ्यात (Shivpuran Katha and Datta Yag Yagya Ceremony) महाराष्ट्रातील संत, महंतांची उपस्थित असणार आहे. दररोज लाखोंच्या वर भक्तांची ऊपस्थीती राहणार आहे. या सोहळ्यासाठी भक्तांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन प.पू. बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी केले आहे. तिर्थक्षेत्र पिंपळगाव येथील शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मंदिर येथे यावर्षी दि. ६ मार्च ते १३ मार्च या कालावधीत भव्य असा शिवपुराण कथा दत याग यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 108‌ यज्ञ होणार असुन यज्ञासाठी दररोज 432 यजमान यज्ञाला बसणार आहेत. असा यज्ञ सात दिवस होणार आहे. अतिशय मोठा भक्तांचा मेळा या ठिकाणी भरणार असून राज्यातील संत मंडळी...
Kinwat ; किनवट येथील गजानन महाराज मंदिरात महिला संमेलन संपन्न – NNL

Kinwat ; किनवट येथील गजानन महाराज मंदिरात महिला संमेलन संपन्न – NNL

धार्मिक, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे l विराट हिंदू युवती व महिला संमेलन मकर संक्रात निमित्त किनवट गजानन बाबा मंदिर येथे संपन्न झाले. या हिंदू युवती महिला संमेलनामध्ये किनवट माहूर आदीलाबाद परिसरातील हजारो महिला या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पूजनीय संत ह भ प नारायण महाराज माधापुरकर होते. तसेच या कार्यक्रमाचे वक्ते म्हणून कांचन दीदी मोफुलवार हैदराबाद या उपस्थित होत्या. या संमेलनामध्ये पुजनीय संतांनी मार्गदर्शन करताना, देश धर्मासाठी युवती व महिलांचे योगदान हे देशाला वैभवशाली बनवणारा आहे . म्हणून अशा मकर संक्राती परवा निमित्त ह्या आयोजित सभेमध्ये आलेल्या युवती व महिलानी आपल्या सामाजिक कामाची जाण ठेवून, समाजामध्ये संस्कार निर्माण करून हा देश सुसंस्कृत होण्यासाठी महिलांची मोठे योगदान आहे. म्हणून आईने केलेली सेवा आईने केलेला कार्य हे देश देशासाठी आहे म्हणून महिलांनी आजच्...
Bhagwat Katha Week : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर येथे श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन

Bhagwat Katha Week : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर येथे श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| श्रीक्षेत्र माहूरगड येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या वतीने १९ जाने २०२५ ते २५ जाने २०२५ रोजी पर्यंत दररोज दु.१२ ते ४ वाजेपर्यंत भागवताचार्य श्रीराम महाराज चिखलीकर ता. मानोरा जि. वाशिम यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद् भागवत कथा (Shrimad Bhagwat Katha) सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या आयोजकांनी केले आहे. माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत श्री श्री १००८ परमहंस परीवाज्रकाचार्य महंत मधुसूदनजी भारती महाराज गुरु अच्युत भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री. स्वामी समर्थ (shri swami samarth) अन्नछत्र मंडळ माहूर यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.येणार्‍या भाविक भक्तांना अन्नदानासोबतच अध्य...
Bhoomipujan ceremony : श्रीक्षेत्र शेगांव येथे १६ जानेवारी रोजी पंचाक्षर मन्मथधाम मंदिराचा भूमीपूजन सोहळा

Bhoomipujan ceremony : श्रीक्षेत्र शेगांव येथे १६ जानेवारी रोजी पंचाक्षर मन्मथधाम मंदिराचा भूमीपूजन सोहळा

नांदेड, धार्मिक
नांदेड| श्रीसदुरू दमया स्वामी जंगममठ संस्थान संचालित श्रीक्षेत्र मन्मथधाम संस्थांनाचे प्रेरणा व श्रद्धास्थान, म हातपस्वी ३२ वे मठाधिपती त्रिकाल पूजानिष्ठ, ष.ब्र.१०८ श्री सदुरु श्री पंचाक्षर शिवाचार्य महास्वामीजी यांच ११८ वे जन्मोत्सवानिमित्त सानिध्य व अमृत शुभहस्ते श्रीमद काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी यांचे दि. १६ जानेवारीला शेगाव (Shegaon) येथे दुपारी २ वाजता आगमन, तीन वाजता वीरशैव भक्त निवास, श्री पंचाक्षरमन्मथधाम मंदिर भूमीपूजन दुपारी ३. ०५ वाजता आणि दि. १७ जानेवारीला सकाळी ८. ३० वाजता मिरवणूक व शोभायात्रा व त्यानंतर सन्मान सोहळा असा काशी जगदुरुंचे दिव्य सानिध्य लाभणार आहे. याप्रसंगी अध्यक्ष श्री ष.ब्र. १०८ श्री सद्गुरू डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य, श्रीसद्गुरु दमयास्वामी जंगममठ संस्थान, बाळापूर, कपिलाधर, संभा...
additional stop at Ujjain : काचीगुडा-बिकानेर-काचीगुडा एक्स्प्रेसला उज्जैन येथे अतिरिक्त थांबा -NNL

additional stop at Ujjain : काचीगुडा-बिकानेर-काचीगुडा एक्स्प्रेसला उज्जैन येथे अतिरिक्त थांबा -NNL

नांदेड, देश विदेश, धार्मिक
नांदेड| पश्चिम रेल्वेने ट्रेन क्र. 07053/07054 काचीगुडा-बिकानेर-काचीगुडा एक्स्प्रेसला उज्जैन येथे अतिरिक्त थांब्या देण्यात आल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याचा प्रवाश्याना लाभ होणार आहे. सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे: दिनांक  11/01/2025 ला काचीगुडा येथून सुटणाऱ्या गाडी क्र. 07053 काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेस  ला उज्जैन येथे  पुढील सूचनां प्राप्त होई पर्यंत तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. दिनांक 14/01/2025 ला बिकानेर येथून सुटणाऱ्या गाडी क्र. 07054  बिकानेर काचीगुडा एक्स्प्रेस ला उज्जैन येथे पुढील सूचना प्राप्त होई पर्यंत तात्पुरता थांबा देण्यात आला आहे.   उज्जैन  येथील थांब्यासह वेळापत्रक: 07053 काचीगुडा - बिकानेर एक्स्प्रेस स्थानक 07054 बिकानेर- काचीगुडा एक्स्प्रेस दिवस आगमन प्रस्थान आगमन प्रस्थान दिवस रविवार 23.4...
A grand blood donation : जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थानतर्फे हिमायतनगरच्या परमेश्वर मंदिर प्रांगणात होणार भव्य रक्तदान -NNL

A grand blood donation : जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थानतर्फे हिमायतनगरच्या परमेश्वर मंदिर प्रांगणात होणार भव्य रक्तदान -NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर| महाराष्ट्र राज्यात ४ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या पंधरवड्यात राज्यभर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतिने रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात येते. शहरातील परमेश्वर मंदिर प्रांगणात दि.15 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजित केले या रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य प्रेरनेणे या महारक्तदान महायज्ञाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. माऊली दरवर्षीचं त्यांच्या भक्ताला संदेश भक्तांकडून साजरे करून घेत असतात आणि या उपक्रमात १००००० एक लाख रक्त बाटल्याचे उदिष्ट माऊलीने दिले आहे आणि या पैकी ५०००० बाटल्या ह्या देश्याच्या सीमेवरील सैनिकाला आणि ५०००० हजार बाटल्या महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, गोवा व गुजरात देऊन त्यांचे सामाजिक उपक्रम सरकार देऊन त्यांच्या मार्फत गोरगरी...
error: Content is protected !!