हिमायतनगर| पिंपळगाव येथील दत्तमंदिर परीसरात मार्च महिन्यात जगद्गुरु श्नी श्नी श्नी १००८ डॉ राजेंद्रदास महाराज यांची शिवपुराण कथा, दत याग यज्ञ होणार असुन, या यज्ञ सोहळ्यात (Shivpuran Katha and Datta Yag Yagya Ceremony) महाराष्ट्रातील संत, महंतांची उपस्थित असणार आहे. दररोज लाखोंच्या वर भक्तांची ऊपस्थीती राहणार आहे. या सोहळ्यासाठी भक्तांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन प.पू. बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी केले आहे.

तिर्थक्षेत्र पिंपळगाव येथील शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मंदिर येथे यावर्षी दि. ६ मार्च ते १३ मार्च या कालावधीत भव्य असा शिवपुराण कथा दत याग यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 108 यज्ञ होणार असुन यज्ञासाठी दररोज 432 यजमान यज्ञाला बसणार आहेत. असा यज्ञ सात दिवस होणार आहे. अतिशय मोठा भक्तांचा मेळा या ठिकाणी भरणार असून राज्यातील संत मंडळीची उपस्थीती असणार आहे. या यज्ञ सोहळ्यासाठी अनेक गावांतील भक्तांची मोठी मदत होत असुन स्वयंस्फूर्तीने देणगी देत आहेत.

या 108 यज्ञ सोहळा तसेच जगद्गुरु श्नी श्नी श्नी १००८ डॉ राजेंद्रदास महाराज यांची शिवपुराण कथेच्या नियोजनासाठी शुक्रवारी भक्तांची बैठक बोलावण्यात आली होती.या बैठकीमध्ये विविध समित्या गठीत करण्यात ऐऊन जबाबदारी सोपविण्यात आली आहे.या बैठकी प्रसंगी बोलताना बालयोगी व्यंकटस्वामी महाराज म्हणाले की श्री दत्तात्रेय कृपेमुळे आजपर्यंत भक्तांची सेवा केली प्रत्येक भक्तांनी देखील आपलाच सोहळा समजून जे काम हाती घेतले ते समर्थपणे पार पाडावे आणि या ठिकाणी येणाऱ्या संत मंडळीची सेवा करावी असे आवाहन केले आहे.

सदर बैठकीसाठी नांदेड गुरूद्वाराचे संत बलविरसिंगजी महाराज,शिवपुरीचे परमपूज्य विराग्यदासजी महाराज, हनुमान गड नांदेडचे महत गरुडदास त्यागीजी महाराज, सद्गुरू शिवलिंग स्वामी महाराज ,ह. भ प सुरेश महाराज पोफाळीकर, महेश महाराज शेवाळा, हे भ प बाबुराव बासेवाड महाराज, महादेव मंदिरांचे शिवचैतन्य महाराज, हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.बाबुराव कदम कोहळीकर, उमरखेड विधानसभा मतदार संघाचे आ.वानखेडे, यांसह सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी भक्तगण जवळपास १३० गावांतील ३००० भाविकांची ऊपस्थीती होती.
