नांदेड| शहरातील डॉ. राम वाघमारे व सुवर्णा वाघमारे (Waghmare couple) या दाम्पत्याने समाजसेवेचा वसा पुढे नेत गेल्या अनेक पासून आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त गरिबांसाठी भोजनदान व चादर वाटपाचा उपक्रम राबवत आहेत.

थंडीच्या कठीण काळात गरजूंना उबदार चादरींचा आधार देत, वाघमारे दाम्पत्याने त्यांच्यासोबत प्रेम, माणुसकी व सहकार्याची भावना व्यक्त केली. त्यांनी गरिबांशी संवाद साधत त्यांना आर्थिक मदतीसोबत मानसिक आधारही दिला.

डॉ. राम वाघमारे हे साहित्यिक असून महात्मा फुले शाळेत सहशिक्षक आहेत. आज घेण्यात आलेल्या या उपक्रमात त्यांचे चिरंजीव सार्थक वाघमारे, प्रा. डॉ. शुद्धोधन गायकवाड व मिलिंद व्यवहारे यांची उपस्थिती होती. शहरातील विविध भागात जाऊन त्यांनी गोरगरिबांना अन्नदान व चादर चे वाटप केले.

या सेवाभावी कार्याबद्दल वाघमारे कुटुंबाचे त्यांच्या मित्रमंडळींनी व इतर नागरिकांनी स्वागत केले. या उपक्रमामुळे गरजूंना दिलासा मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. वाघमारे दाम्पत्याचा हा उपक्रम फक्त गरजूंना मदत करण्यापुरता मर्यादित न राहता इतरांसाठी प्रेरणादायक ठरला आहे. त्यांच्या कार्यातून समाजात सकारात्मक संदेश पोहोचत असून कर्तव्यपालनाचा आदर्श निर्माण झाला आहे.
