उस्माननगर| येथे सायंकाळी सहा वाजता उस्माननगर येथील सुरेश मामा बास्टे यांच्या श्री अदिराज कृषी दुकाना समोर प .पू. सद्गुरू श्री.श्री. श्री. १००८ श्री . अजिवन सन्मानित महंत आष्टवक्र स्वामी प्रयागगिरीजी महाराज यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून गावकऱ्यांच्या वतीने सुरेश मामा बास्टे यांनी पुष्पमाला घालून जंगी स्वागत केले. तर तेलंगवाडीत महिला भगिनींनी व पुरुषांनी पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत (A warm welcome) केले .

तेलंगवाडी ता.कंधार येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी अखंड हरिनाम सप्ताह व श्री. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त प.पू. सद्गुरू श्री.श्री.श्री.१००८ श्री. अजिवन सन्मानित महंत आष्टवक्र स्वामी प्रयागगिरीजी महाराज यांचे शिराढोण हून उस्माननगर मार्गे तेल़ंगवाडी येथे मार्गस्थ होत असताना भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

उस्माननगर येथील श्री अदिराज कृषी दुकाना समोर तेलंगवाडीचे सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश मामा बास्टे यांनी गावकऱ्यांच्या वतीने पुष्पमाला अर्पण करून फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत केले. त्यानंतर तेलंगवाडी येथे भव्य मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्याने काढण्यात आली. यावेळी गावातील महीलांनी जागोजागी सडा टाकुन व सुंदर रांगोळी काढुन आणि जागोजागी सद्गुरू महंत महाराज यांचें पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील लहान थोर महीला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
