नांदेड| बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील रहिवासी विठ्ठलराव कोंडीबा वाघमारे उपाख्य व्ही. के. गुरूजी कुंडलवाडीकर यांचे आज दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन (Kundalwadikar passed away) झाले, ते 79 वर्षाचे होते.

उद्या गुरुवार दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी नांदेड येथील शांतीधाम गोवर्धन घाट येथे सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांच्या पाटबंधारे नगर येथील निवासस्थानावरून अंतयात्रा निघेल.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, जावई, नातू-पंतु असा मोठा परिवार आहे. तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांचे ते वडील तर जिल्हा परिषदेचे मिलिंद व्यवहारे यांचे ते सासरे होते.
