Mahavikas aghadi ; महाविकास आघाडीने माकपला किनवट विधानसभा मतदारसंघ सोडावा माकप कार्यकर्त्यांची आग्रही मागणी -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। दिंनाक २८ स्पटेंबर रोजी शहीद भगतसिंग यांच्या जंयती निम्मीत्ताने अभिवादन, माकप महासचिव काॅ.सीताराम येचुरी यांना अदरांजली तथा कार्यकर्त्यांचा मेळावा काॅ.अर्जुन आडे यांच्या अध्यक्षतेखाली गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालय येथे संपन्न झाले.
गेली अनेक दशके माकपने किनवट मतदार संघात जनतेच्या बाजूने अनेक लढे लढले असुन जमिन मालकीच्या हक्कापसुन ते शेतकरी- कष्टकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन सतत रस्तावरची लढाई समोर घेऊन गेली आहे.वन, देवस्थान जमिनीचा प्रश्न असो की चिमटा धरण विरोधी संघर्षाचे, हामीभाव,पिकविमा, अतिवृष्टी अनुदान, कर्जमाफीचे प्रश्न असो अथवा शेतमजुरांच्या रोजगाराचे प्रश्न, घरकुलाचे प्रश्न, भुमिहिंनाचे प्रश्न,योजना कर्मचाऱ्यांचे प्रश्न,किनवट जिल्हा होण्याचे प्रश्न सातत्याने राजकीय पटलावार वरील प्रश्नांवर माकपा ने हस्तक्षेप केला आहे,या राजकीय पाश्वभुमीवर महाविकास आघाडीच...









