किनवट, परमेश्वर पेशवे। आदिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या किनवट तालुक्यामध्ये अतिवृष्टीने थैमान घातले असताना सदरील अतिवृष्टी धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी इतर पक्षाचे पदाधिकारी व विरोधी पक्षाचे कार्यकर्ते ही कामाला लागली असताना सत्ताधारी पक्षाच्या तालुका अध्यक्षाला मात्र या गोष्टीचा विसर पडला की काय? किनवट भाजपाचे तरुण व युवा समजले जाणारे तालुका अध्यक्ष बालाजी आलेवार यांचा वाढदिवस दिनांक 27 रोजी शिवनी या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने फुलाचा वर्षाव करत मोठ्या उत्साहात व दणक्यात साजरा करण्यात आल्याने परिसरात चर्चेला एकच उधाण आले.
किनवट तालुक्यातील अतिवृष्टी धारक शेतकऱ्यांचे तालुका अध्यक्षांनी प्रश्न मार्गी लावण्या ऐवजी आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात व हजारो चहात्याच्या उपस्थितीत साजरा केल्याने परिसरात एकच खमंग चर्चा ऐकावयास मिळत आहे . तालुका- ध्यक्षांनी या वाढदिवसा एवढा मोठा खर्च करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे केली असती तर शेतकऱ्यांना फायद्याचे ठरले असते असे बोल हि जणसामान्यतून ऐकवायला मिळत आहेत. एकीकडे किनवट मतदार संघात सर्वसामान्यांचा नेता म्हणून जनसामान्यात ओळख निर्माण करण्याची ही नवीन पद्धत तर नव्हे? असेही बोल या भागातील जनसामान्याचे तोंडून ऐकायला मिळत आहेत.
तालुका अध्यक्ष हा एवढा थाटात वाढदिवस साजरा करतो अन तालुक्यातील विविध पक्षातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होऊन कार्यक्रमाच्या निमित्ताने ही नेते मंडळी गुणगान गाऊन या तालुकाध्यक्षाची मोठ्या मनाने कौतुक पण करतात. त्यातच बहुतांशी बुद्धिवंताणि सुद्धा त्याच्यावर स्तुती सुनने उधळीत एवढे मात्र खरे ? जनसामान्याचा तालुका अध्यक्ष म्हणून ओळख असलेल्या या पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसासाठी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातून सर्वच राजकीय पक्षाची कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाली होती.
एवढेच नव्हे तर किनवट तालुक्याचे विद्यमान आमदार भीमराव केराम भाजपाचे वरिष्ठ नेते अशोक सूर्यवंशी संध्याताई राठोड, प्रफुल राठोड, यासह युवा नेते सचिन नाईक यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती . हे विशेष म्हणावे लागेल. एकंदरीत सर्वच पक्षाच्या लोकांनी शेतकऱ्याचा कैवार घेण्यासाठी आता पुढे यावं अशी रस्ता अपेक्षा या भागातील शेतकरी वर्गातून ऐकावयास मिळत आहे.