नांदेड। शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या बोरबन कॉलनीतील अंतर्गत रस्त्याांची दुरावस्था झाली असून पावसाळ्यात या नगरातील महीला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांना अनेक अडचणीं सामाना करावा लागत आहे त्यामुळे या भागाचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे व महापालिका प्रशासनाने या भागातील रस्त्याांची व बंद पथदिव्यांची समस्या सोडवावी अशी मागणी बोरबन कॉलनीतील नागरिकांनी केली आहे.
शहरात नवारुपाला आलेली आणि सुसज्ज अशी उच्चभ्रू लोकांची वस्ती तसचे अनेक नामाकिंत डॉक्टर, व्यापारी व अधिकारी, कर्मचारी यांची कॉलनी नांदेड दक्षिण मतदार संघात असून इथे ५० वर्षापासून नागरिक हे प्रशस्त बंगोलोज् व घरे बांधून राहतात परंत पावसाळा आला की येथील नागरिकांना अंतर्गत रस्त्याा अभावी खूप तास सहन करावा लागत आहे.
नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे हे आपल्या मतदार संघातील अनेक रस्ते पक्के करत आहेत. परंत बोरबन कॉलनीतील रस्त्याांकडे दुर्लक्ष होत असून . ज्या नगरामध्ये चार घरे आहेत तेथे रस्ते, नाल्या झाल्या पण शेकडो घरांची वसाहत असलेल्या बोरबन कॉलनी आहे तरी देखील मागील ५० वर्षांपासून अनेक रस्त्यांची अवस्था ही कायम अडचणींची ठरते आहे पक्क्या रस्त्यााविना ही कॉलनी उपेक्षित आहे तरी विद्यमान आमदार मोहन अण्णा हंबर्डे व महापालिका प्रशासनाने यांनी या भागातील अंतर्गत रस्ते व बंद पथदिव्यांची समस्या सोडवावी अशी मागणी रहीवाशांनी केली आहे.