Bjp leader grand birthday ; तालुक्यावर अतिवृष्टीचे सावट असताना भाजपा तालुका अध्यक्षाचा वाढदिवस दणक्यात साजरा -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। आदिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या किनवट तालुक्यामध्ये अतिवृष्टीने थैमान घातले असताना सदरील अतिवृष्टी धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी इतर पक्षाचे पदाधिकारी व विरोधी पक्षाचे कार्यकर्ते ही कामाला लागली असताना सत्ताधारी पक्षाच्या तालुका अध्यक्षाला मात्र या गोष्टीचा विसर पडला की काय? किनवट भाजपाचे तरुण व युवा समजले जाणारे तालुका अध्यक्ष बालाजी आलेवार यांचा वाढदिवस दिनांक 27 रोजी शिवनी या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने फुलाचा वर्षाव करत मोठ्या उत्साहात व दणक्यात साजरा करण्यात आल्याने परिसरात चर्चेला एकच उधाण आले.
किनवट तालुक्यातील अतिवृष्टी धारक शेतकऱ्यांचे तालुका अध्यक्षांनी प्रश्न मार्गी लावण्या ऐवजी आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात व हजारो चहात्याच्या उपस्थितीत साजरा केल्याने परिसरात एकच खमंग चर्चा ऐकावयास मिळत आहे . तालुका- ध्यक्षांनी या वाढदिवसा एवढा मोठा खर्च ...
