Wednesday, May 13

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

नांदेड l देशव्यापी संपा निमित्ताने १२ फेब्रुवारी दुपारी १२ वाजता महात्मा गांधी पुतळा येथून हजारो कामगार कर्मचाऱ्यांनी भव्य मोर्चा काढून चार श्रम संहिता, जनसुरक्षा विधेयकास विरोध करीत केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला.

गांधी पुतळा येथून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालया समोर गगनभेदी घोषणा देत संयुक्त कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. त्यानंतर नांदेड वाघाळा शहर म्हणरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयात मोर्चेकरी धडकले व शहरातील पूरग्रस्तांच्या प्रलंबीत मागण्याचे निवेदन आयुक्त, महापौर व उप महापौर यांना देण्यात आले.
आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने असल्यामुळे मोर्चा जिल्हा परिषद कडे अगेकुच करीत निघाला व थेट जिल्हा परिषदेत घुसला.
मोर्चा मध्ये आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शालेय पोषण कामगार, ग्रामपंचायत कर्मचारी, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी, परिचर व कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने मोर्चात सामील झाले होते.

सदरील मोर्चा मध्ये स्थानिक मागण्याही करण्यात आल्या त्यापैकी मौजे वझरा शेख फरीद ता. माहूर जि. नांदेड येथे मागील ५५ ते ६० वर्षात नवीन प्लॉट्स पडले नाहीत तेथे गावठाण विस्तारवाढ करून मागणी केलेल्या अर्जदारांना मोफत प्लॉट्स पाडून द्यावेत व घरकुल बांधण्यासाठी पाच लक्ष रुपयांची तरतूद करावी.

विशेष म्हणजे वझरा गांव हे पेसा ग्रामपंचायत असून मागणी केलेल्या अर्जंदरांना प्लॉट्स व घरकुल देण्यात यावेत असा ठराव विशेष ग्रामसभेने पारित केला आहे. परंतु कायद्याची पायमली करून विश्वस्त व अधिकारी देवस्थानची जमीन अवैध रित्या परस्पर विक्री करीत आहेत. त्यांच्यावर कारवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. उपरोक्त मागण्यासाठी सिटू कामगार संघटनेचे मागील दोन वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर साखळी उपोषण सुरु आहे. मोर्चा चा समारोप जिल्हा परिषद येथे करण्यात आला असून यावेळी भव्य सभा घेण्यात आली.

दुसऱ्या दिवशी १३ फेब्रुवारी रोजी सीटू संलग्न घरेलू कामगार व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करीत तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी स्थानिक मागण्यासह महिलांच्या मागण्याकडे संघटनेने लक्ष वेधले. उपरोक्त आंदोलनात शकडो कामगार सामील झाले होते.

या आंदोलनाचे नेतृत्व कॉ.विजय गाभने, कॉ. उज्वला पडलवार, कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. करवंदा गायकवाड, कॉ. लता गायकवाड,कॉ. जयराज गायकवाड, कॉ.श्याम सरोदे कॉ.सोनाजी कांबळे, कॉ.गुणवंत मिसलवाड, कॉ. राहुल नरवाडे, कॉ. क्रांती सदावर्ते, कॉ. प्रेमला पतंगे, कॉ. इरवंत सूर्यकार, आदींनी केले. स्थानिक व राज्य,केंद्र स्तरावरील मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!