HomeनांदेडKusum Mahotsav ; कुसुम महोत्सव' पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

नांदेडचा महाउत्सव म्हणून ओळखला जाणारा ‘कुसुम महोत्सव’ यावर्षी २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च, असा तीन दिवस असेल. या महोत्सवातील सर्व कार्यक्रम नांदेड शहरातील यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात होतील.

डॉ. शंकरराव चव्हाण व कै.सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २०२० मध्ये माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव सुरु करण्यात आला. कोरोनाचे एक वर्ष वगळता दरवर्षी हा उपक्रम सातत्याने राबवला जातो आहे.

पहिला दिवसः (मराठी भाषा गौरव दिन)
शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ‘द फोक मराठी’ हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा १०० कलावंतांचा संगीत आणि नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील लोककला, लोकवाद्य तसेच लोकनृत्यांचा आनंद घेता येईल. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध आरजे अमित करणार आहे.

दुसरा दिवसः
शनिवारी २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हिंदी चित्रपट क्षेत्रातील नायिकांवर आधारित ‘कलर्स ऑफ बॉलीवूड’ हा ‘फॅशन शो’ आयोजित करण्यात आला आहे. या ‘फॅशन शो’चे परिक्षण करण्यासाठी ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ य़ा टीव्ही मालिकेतील काव्या आणि पार्थची लोकप्रिय जोडी अर्थात सुप्रसिद्ध कलावंत ज्ञानदा रामतीर्थकर आणि विजय आंदळकर उपस्थित राहणार आहेत.

या शिवाय याच दिवशी कविता राम, मदन शुक्ला, दत्तात्रय मेस्त्री, रेशमा चतुरे या लोकप्रिय व प्रतिभाशाली गायक-गायिकांच्या म्युझिकल नाईटचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध अँकर स्वप्नील जाधव करतील.

तिसरा दिवसः
रविवारी १ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पद्मश्री पुरस्कार विजेते, सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा ‘कैलासा लाईव्ह’ हा कॉन्सर्ट होणार आहे.

या शिवाय दरवर्षीप्रमाणे कुसुम महोत्सवाचे तीनही दिवस रोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत शॉपिंग व फूड फेस्टिवल सुरु राहील. कुसुम महोत्सवाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील महिला बचत गट व उद्योजकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. कुसुम महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढत असून, या वर्षी शॉपिंग फेस्टिवलमध्ये तब्बल १५० स्टॉल्स राहणार आहेत. या ठिकाणी दैनंदिन गरजेच्या वस्तुंपासून हस्तकलेच्या नावीन्यपूर्ण वस्तुंची विक्री आणि प्रदर्शन असते.

तसेच यावर्षीच्या फूड फेस्टिव्हलमध्येही ५० स्टॉल्स राहणार आहेत. या ठिकाणी नांदेडकरांना वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य पदार्थांचा आनंद लुटता येईल. या वर्षीच्या कुसुम महोत्सवात शॉपिंगचे १५० आणि खाद्य पदार्थांचे ५० असे एकूण २०० स्टॉल्स असतील.

पत्रकार परिषदेत प्रमुख उपस्थितीः
माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण, माजी पालकमंत्री तथा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी.पी. सावंत, भोकरच्या आ. श्रीजया चव्हाण, महापौर कविताताई मुळे, महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, संजय जोशी, रत्नाकर अपस्तंभ, गिरीश देशमुख, प्रा.डॉ. विश्वाधार देशमुख, माजी महापौर मंगलाताई निमकर, माजी महापौर शैलजाताई स्वामी, रंजना सावंत, मृणालताई राजूरकर

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments