Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन
नांदेडचा महाउत्सव म्हणून ओळखला जाणारा 'कुसुम महोत्सव' यावर्षी २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च, असा तीन दिवस असेल. या महोत्सवातील सर्व कार्यक्रम नांदेड शहरातील यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात होतील.
डॉ. शंकरराव चव्हाण व कै.सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २०२० मध्ये माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव सुरु करण्यात आला. कोरोनाचे एक वर्ष वगळता दरवर्षी हा उपक्रम सातत्याने राबवला जातो आहे.
पहिला दिवसः (मराठी भाषा गौरव दिन)
शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ‘द फोक मराठी’ हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा १०० कलावंतांचा संगीत आणि नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील लोककला, लोकवाद्य तसेच लोकनृत्यांचा आनंद घेता येईल. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध आरजे अमित करणार आहे.
दुसरा दिवसः
शनिवारी...
