नवीन नांदेड| नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळ सलग्न महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त सिडको परिसरातील जेष्ठ वृत्तपत्र विक्रेता यांच्या सन्मान सोहळा उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला.
१५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे २५ व्या वर्धापन दिनानिमित्त व भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन निमित्ताने सिडको वृत्तपत्र विक्रेता टिनशेड येथे जेष्ठ वृत्तपत्र विक्रेता यांच्या सत्कार सोहळा व वृत्तपत्र विक्रेता बांधव यांच्या सन्मान सोहळा सकाळी ७ वाजता सिडको वृत्तपत्र विक्रेता टिनशेड येथे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, सामाजिक कार्यकर्ते फारुक अहेमद, प्रदीप नागापूरकर, राज्य सचिव बालाजी पवार,विकास सुर्यवंशी सांगली, रविंद्र कुलकर्णी मालेगाव धूळे,विठ्ठल गायकवाड.
नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर,चंद्रकांत घाटोड,चेतन चौधरी , संदीप कटकमवार, बालाजी चंदेल व पत्रकार अनिल धमणे, तिरूपती पाटील घोगरे यांच्या उपस्थितीती होती, प्रारंभी माजी राष्ट्रपती कै.अबदुल कलाम,व दर्पणकार आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला,व उपस्थित मान्यवर यांच्ये शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सिडको परिjसरातील जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते दौलतराव कदम,शेख सयोधदीन,मदनसिंह चौहान, रामनाथ दमकोडंवार,श्रंगारे, महिला वितरक वंदना लोणे यांच्या शाल श्रीफळ देऊन तर वृत्तपत्र विक्रेता यांच्या सन्मान करण्यात आला. यावेळी सतिश कदम अध्यक्ष , दिलीप ठाकूर, बालाजी सुताडे यांनी उपस्थित मान्यवर यांच्ये स्वागत केले, यावेळी वर्धापन दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेते यांच्या सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिडको वृत्तपत्र विक्रेते यांनी परिश्रम घेतले.