Sunday, May 17

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Balaji Kalyankar ; आ. बालाजी कल्याणकर यांची शिवसेनेकडून मंत्रिमंडळात वर्णी लागावी – मुन्ना राठौर – NNL

Balaji Kalyankar ; आ. बालाजी कल्याणकर यांची शिवसेनेकडून मंत्रिमंडळात वर्णी लागावी – मुन्ना राठौर – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड l नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्याने महायुतीला शतप्रतिशत कौल देऊन सर्वच उमेदवार विजयी केले आहेत. महायुतीकडून नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपाचे पाच, शिवसेनेचे तीन व राष्ट्रवादी पक्षाचा एक आमदार निवडून आला आहे. नांदेड जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची पुरती दाणादाण उडालेली आहे. २०१९ मध्ये नांदेड जिल्ह्यातून काँग्रेसचे चार आमदार निवडून आले होते. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या हाती मोठा भोपळा आला आहे. महाविकास आघाडीचा एकही आमदार जिल्ह्यातून निवडून आला नाही. महायुतीकडून निवडून आलेल्या आमदारांना आता वेध लागले आहेत मंत्रिमंडळात वर्णी लागण्याचे. नांदेड जिल्ह्यातून शिवसेनेकडून आमदार बालाजी कल्याणकर तसेच भाजपाकडून मुखेडचे आमदार तुषार राठोड, नायगावचे आमदार राजेश पवार, किनवटचे आमदार भीमराव केराम व राष्ट्रवादीकडून पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्ष...
Shri Jayatai Chavan : श्रीजयाताई चव्हाण विजयी झाल्याने कुबेर भंडारी गुजरात येथे करणार महादूग्धाभिषेक -NNL

Shri Jayatai Chavan : श्रीजयाताई चव्हाण विजयी झाल्याने कुबेर भंडारी गुजरात येथे करणार महादूग्धाभिषेक -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार| भोकर विधानसभेच्या भाजप महायुतीच्या उमदेवार श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांच्या विजयासाठी गुजरातमधील प्रसिद्ध कुबेर भंडारी देवस्थानला महादूग्धाभिषेक करणार असे साकडे घातले होते. आता श्रीजयताई आमदार झाल्यामुळे पुढील महिन्याच्या अमाश्येला आपण कुबेर भंडारी देवस्थानला जाऊन महादूग्धाभिषेक करणार असल्याची माहिती सुभाष देशमुख चिकाळेकर यांनी दिली. भोकरच्या विकासाचे स्वप्न पाहणार्‍या व तरूण तडफदार नेतृत्व असलेल्या श्रीजयाताई चव्हाण यांची भोकर मतदारसंघाप्रती असलेली आत्मीयता व काम करण्याची पद्धत पाहून अख्खा मतदारसंघ भारावून गेला आहे. नवनिर्वाचित आमदार श्रीजयाताई चव्हाण यांच्या रूपाने भोकर मतदारसंघाला दडफदार, अभ्यासू, विकासाची जाण असलेले नेतृत्व लाभले आहे. सुभाष देशमुख हे चव्हाण घराण्याचे निकटचे आणि विश्वासू मानले जातात. कोरोना महामारीने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनाही घे...
MLA Baburao Kadam Kohlikar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या हदगांव-हिमायतनगरचे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना शुभेच्छा -NNL

MLA Baburao Kadam Kohlikar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या हदगांव-हिमायतनगरचे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना शुभेच्छा -NNL

मुंबई, नांदेड, राजकीय
मुंबई,नांदेड,हिमायतनगर, अनिल मादसवार| विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हदगांव-हिमायतनगर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बाबुरावजी कदम कोहळीकर यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. विधानसभा निवडणुकीच्या काळात खुद्ध महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभेतील हिमायतनगर येथे जाहीर सभा घेऊन तुम्ही बाबुरावला निवडून द्या तुमच्या विकासाचे स्वप्न साकार करू असा विश्वास दिला होता. तसेच हदगाव हिमायतनगर तालुक्याचा कायापालट करण्यासाठी एमआयडीसी मंजूर करून देऊन रोजगारांची संधी उपलब्ध करून दिली जाईल असे देखील आश्वासन दिले. तसेच लाडक्या बहिणींना संबोधित करताना तुमचा आशीर्वाद बाबुरावसह महायुती सरकारला मिळाला तर लाडकी बही...
Dr.Hansraj Vaidya : कोणी मानो वा न मानो,नांदेड मधिल विधान सभेचे नऊ आमदार व लोकसभेच्या पोट निवडणूकिच्या विजयाचे खरे शिल्पकार आम्हीच – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

Dr.Hansraj Vaidya : कोणी मानो वा न मानो,नांदेड मधिल विधान सभेचे नऊ आमदार व लोकसभेच्या पोट निवडणूकिच्या विजयाचे खरे शिल्पकार आम्हीच – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| जगातील सर्वात मोठ्या लोकशाहिचा देश-भारत देश.ही निवडणूक भारतातील नागरीकांनीच नाही तर आख्या जगातील नागरिकांनी एक आगळ्या वेगळ्या वळणावरून पादाक्रांत होताना पाहिली. मी-मी म्हणणार्‍या निवडणूक विश्लेषकांना सुद्धा निट आंदाज करता आला नाही.सगळ्यांच्या तर्कांना मतदार राजानी हुल्कावनी दिली.खोट ठरविलं!खुद्द उमेद्वारांना सुद्धा मतदात्यांचा आंदाज समजू शकला नाही. सर्वच पक्षाच्या उमेद्वारांनी मतदारांना अनेक प्रकारच्या आमिषांला बळी पाडण्याचा प्रचंड प्रमाणात प्रयत्न केला,पण सर्वच पक्षाच्या उमेद्वाराला पोक्त तथा ज्येष्ठ नागरिक मतदार समूहाने शेवट पर्यंत "मी तुमचाच" या भूमिकेतून पात्र वटविले. मतमोजणीचा निकाल लागे पर्यंत सर्वजनालाच चकित केले असेच म्हणावे लागेल! . जे-जे कुणाचा सुफडा साफ करणार होते,त्यांचाच सुफडा ज्येष्ठ नागरिक समूह मतदारानी साफ केला असेच निकालावरूदिसून येऊ शकेल! पोक्त,अनुभव संपन्न ज...
Prataprao Patil : जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून प्रतापराव पाटील यांची नियुक्ती करा – इंजि.स्वप्निल इंगळे -NNL

Prataprao Patil : जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून प्रतापराव पाटील यांची नियुक्ती करा – इंजि.स्वप्निल इंगळे -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| जिल्ह्यातील सर्वात अनुभवी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची संपूर्ण जिल्ह्याची सखोल माहिती व अचूक ज्ञान असलेला नेता आहेत. म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याद्यक्ष स्वप्निल इंगळे पाटील यांनी पक्षाचे राष्ट्रीय अद्यक्ष मा अजितदादा पवार यांच्याकड़े पत्राद्वारे केली आहे जिल्ह्याचा पालकमंत्री हा जिल्हा प्रशासन व राज्य सरकार मधील एक महत्वाचा दुवा म्हणून काम करतात कारण पालकांप्रमाणे ते जिल्ह्याला काय हवे नको ते बघत असतात. जिल्हा प्रशासनला ते मार्गदर्शन करतात. राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या योजनांची प्रशासनामार्फत अमलबजावणी ते करतात. ते जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त...
Bodharankar’s victory : बोढारंकर यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून ग्रामीणमध्ये बालाजी पुयड तर शहरी मध्ये दक्षिण जिल्हा प्रमुख विनय गिरडे यांच्या पुढाकार -NNL

Bodharankar’s victory : बोढारंकर यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून ग्रामीणमध्ये बालाजी पुयड तर शहरी मध्ये दक्षिण जिल्हा प्रमुख विनय गिरडे यांच्या पुढाकार -NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड| नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव पाटील बोढारंकर यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना उपनेते हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बालाजी पाटील पुणेगावकर‌ नांदेड दक्षिणचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख गिरडे यांनी ग्रामीण भागासह सिडको हडको परिसरात परिश्रम घेऊन मताधिक्य मिळवून दिले यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले असुन विजयाचे शिल्पकार म्हणून ग्रामीण मध्ये बालाजी पाटील पुणेगावकर‌,तर शहरी भागात विनय पाटील गिरडे हे विजयाचे शिल्पकार म्हणून चर्चेत आले आहेत. नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातुन शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव पाटील बोढारंकर यांनी निवडणूक लढविली होती, शिवसेना उपनेते हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी पाटील पुणेगावकर‌ यांनी ग्रामीण भागातील वाजेगाव बळीरामपुर,सोनखेड सर्कल अंतर्गत गावात सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य‌ व प...
Ravindra Chavan : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र चव्हाण विजयी -NNL

Ravindra Chavan : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र चव्हाण विजयी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. संतुकराव मारोतराव हंबर्डे यांचा 1457 मतांनी पराभव केला आहे. सहा महिन्यापूर्वी काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यांचे चिरंजीव रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी चुरशीच्या लढतीत ही जागा कायम ठेवली आहे. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीमध्ये केरळमधील वायनाड व महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. 25 वर्षानंतर नांदेड येथे एकाचवेळी लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्यात. त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान झाले. गेल्यावेळी 61 टक्के मतदान झालेल्या लोकसभेमध्ये पोटनिवडणुकीत 67.81 टक्के मतदान झाले. शेवटच्या काही फेऱ्यामध्ये त्यांनी मताधिक्य मिळवत ही जागा काँग्रेसकडे कायम ठेवली. रविंद्...
Nanded district Election Result : नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी -NNL

Nanded district Election Result : नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत आलेल्या निकालानुसार किनवट येथून भाजपचे भिमराव केराम, हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर, भोकर विधानसभेतून भाजपाच्या श्रीजया अशोकराव चव्हाण, नांदेड उत्तरमधून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिणमधून शिवसेनेचे आनंद तिडके, लोहा विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव पाटील चिखलीकर, नायगाव मतदारसंघातून भाजपचे राजेश पवार, देगलूरमधून भाजपचे जितेश अंतापूरकर तर मुखेड विधानसभा मतदारसंघातून डॉ. तुषार राठोड हे विजयी झाले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभांपैकी भारतीय जनता पार्टीला 5 जागा, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 1 अशा एकुण 9 जागा निवडून आल्या आहेत. तर विधानसभेसोबतच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र चव्हाण विजयी झाले आहेत आज झाले...
Nana Patole : विधानसभेतील पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी यापुढेही काँग्रेस पक्ष काम करेल: नाना पटोले -NNL

Nana Patole : विधानसभेतील पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी यापुढेही काँग्रेस पक्ष काम करेल: नाना पटोले -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जनतेच्या अपेक्षित भावनांच्या विरोधातील आहे. राज्यातील सर्वच स्तरातील प्रमुख लोक, काँग्रेस व मविआचे नेते, पदाधिकारी, तळागाळातील कार्यकर्ते, पत्रकार यांच्याशी संवाद साधला असता हा निकाल अपेक्षित नव्हता असाच सुर निघत आहे. एक्झिट पोल मध्येही भाजपा युती व महाविकास आघाडी यांच्यात काटें की टक्कर दिसली. परंतु आज आलेला निकाल हा अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्विकार्य आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे. टिळक भवनमधील पत्रकार परिषदेत बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने घवघवीत यश दिले आणि अवघ्या ५ महिन्यात एवढा बदल होईल असे वाटत नाही. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभर दौरे केले, लोकांशी संवाद साधला, पूर्ण तयारीनिशी निवडणुका लढल्या. राज्यात शेतकऱ्यांपुढे गंभीर समस्या आहेत, महागाई, बेरो...
error: Content is protected !!