Sunday, May 17

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Bhimrao Keram ; किनवटमध्ये महायुतीचे भीमराव केराम यांचा दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय – NNL

Bhimrao Keram ; किनवटमध्ये महायुतीचे भीमराव केराम यांचा दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय – NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे l 83 किनवट विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी घोषित झाले असून महायुतीचे उमेदवार भीमराव केराम यांनी 92028 इतके मतदान घेऊन दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळविला आहे.या विजयाचा सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला असून यावेळेला महायुतीसरकार मध्ये भीमराव केराम यांना मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. 83 किनवट विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान संपन्न झाले असून दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी किनवट येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली सकाळी 7 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 14 टेबलवर 24 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया झाली या वेळेला एकूण 17 उमेदवार रिंगणात होते महायुतीचे भीमराव केराम व महाविकास आघाडीचे प्रदीप नाईक यांच्यात तुल्यबळ लढत झाली. चौदाव्या फेरीपर्यंत प्रदीप नाईक आघाडीवर हो...
Baburao Kadam Kohlikar wins : महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर विक्रमी मतांनी विजयी; मा.खा. सुभाष वानखेडे ठरले विजयाचे शिल्पकार -NNL

Baburao Kadam Kohlikar wins : महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर विक्रमी मतांनी विजयी; मा.खा. सुभाष वानखेडे ठरले विजयाचे शिल्पकार -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात यंदा मतांची टक्केवारी वाढल्याने महायुतीचे उमेदवार निवडून येतील अशी चर्चा सर्वत्र असताना कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फेक नेरेटिव्ह पसरवून निकालात संभ्रम निर्मण करण्याचा प्रयत्न केला. अखेर सर्वच फेरीमध्ये बाबूराव कदम कोहळीकर यांच्या मतांची आकडेवाडी वाढतच गेल्याने शेवटी बाबूराव कदम यांचा विक्रमी मतांनी म्हणजेच 30 हजार 228 मतांनी विजय झाला. बाबुरावजी कदम याना निवडून आणण्यासाठी माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी घेतलेली मेहनत फळाला आली असल्याने ते विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर कोण..? निवडून येणार याबाबत चौका चौकात चर्चा सुरू होत्या. तर अनेक कार्यकर्त्यांनी शर्यती लावून जय पराजयावर भाष्य केले होते. दरम्यान दिनांक २३ रोजी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुपारच्या वेळी निकालाच्या अंतिम फेरीपर्यंत महाविकास आघाडीच...
Vishnupuri ; विष्णुपुरी येथे अनेक महिलांनी मतदानाचा हक्क बजावला – NNL

Vishnupuri ; विष्णुपुरी येथे अनेक महिलांनी मतदानाचा हक्क बजावला – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l नांदेड जिल्हायातील एकमेव महिला पदाधिकारी असलेल्या ग्रामपंचायत विष्णुपुरी महिला पदाधिकारी सह गावातील अनेक महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत मतदान केले. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकी साठी व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले, विष्णुपुरी जिल्हा परिषद शाळा येथे 5 मतदान ‌केद्रं असुन या ठिकाणी एकुण 5100 मतदार असुन महिला मतदार संख्या जवळपास दोन हजार आहे.नांदेड जिल्ह्यातील एकमेव महिला पदाधिकारी असलेल्या विष्णुपुरी ग्रामपंचायत येथे 15 सदस्य महिला असुन ग्रामपंचायत सरपंच सौ.संध्या विलास हंबर्डे, उपसरपंच अर्चना विश्वनाथ हंबर्डे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य‌ यांनी व गावांतील जवळपास दोन हजार महिलांनी जिल्हा परिषद शाळा विष्णुपुरी येथे रांगेत उभे टाकून मतदान केंद्रावर मतदान केले. अनेक महिलांनी मतदान झाल्यावर सेल्फी पाईंट‌ व्दारे मोबाईल मध्ये फोटो तर एकत्र येऊन ...
file a case : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या फारुक अहमद यांची उमेदवारी रद्द करून गुन्हे दाखल करा -NNL

file a case : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या फारुक अहमद यांची उमेदवारी रद्द करून गुन्हे दाखल करा -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असताना नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारूक अहमद यांनी त्यांच्या प्रचार सभेत वादसग्रस्त , प्रक्षोभक विधान करून राजकीय , सामाजिक आणि धार्मिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा यांना धमकीवजा आव्हानात्मक भाषेचा वापर करून देशाच्या सुरक्षितेला आव्हान देण्याचे काम केले आहे. त्यामुळे संबंधित उमेदवाराची तात्काळ उमेदवारी रद्द करावी आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत अशी मागणी राज्यसभा सदस्य खा. डॉ. अजित गोपछडे यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे . यावेळी खा. अजित गोपछडे यांच्यासह डॉ. सचिन उमरेकर विनायक सगर , दीपक सिंह रावत, बाळू खोमणे , दिलीप ठाकूर ,दीपक कोठारी, शिवाजी...
Maroti Kadam : मत विकण्यापेक्षा दान करावे – साहित्यिक मारोती कदम -NNL

Maroti Kadam : मत विकण्यापेक्षा दान करावे – साहित्यिक मारोती कदम -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| येत्या मंगळवारी 20 तारखेला जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी आणि विधानसभेसाठी मतदान होत आहे. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मतदानासाठी अनेक प्रलोभने दिली जात आहेत. कोणत्याही भूलथापांना अथवा आमिषांना बळी न पडता भारतीय संविधानाने दिलेल्या मताधिकाराचा वापर करावा. हजार पाचशेला मत विकण्यापेक्षा ते दान करायचे असते असा सल्ला येथील साहित्यिक मारोती कदम यांनी 89 व्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमात दिला. ते कार्तिक पौर्णिमेच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी जंबुद्विप बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष बबन सावंत, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार, महिला विभाग प्रमुख रुपाली वागरे- वैद्य, काव्य पौर्णिमेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, संयोजक निरंजन तपासकर, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर आदींची उपस...
Counting of votes : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व ६ विधानसभांची मतमोजणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात -NNL

Counting of votes : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व ६ विधानसभांची मतमोजणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठीच्या ज्ञान स्त्रोत केंद्र इमारतीमध्ये लोकसभा पोटनिवडणूक व सहा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. याठिकाणी लोकसभेसाठी 6 व विधानसभेसाठी 6 अशा 12 मतमोजणी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच स्ट्राँग रूमची निर्मिती करण्यात आली आहे. लोहा, हदगाव, किनवट या तीन विधानसभा क्षेत्राची मतमोजणी मात्र त्या-त्या ठिकाणी होणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक एकाच वेळेस येत असल्यामुळे यावेळी जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी देखील नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात होणार आहे. अन्य वेळी नांदेड दक्षिण व नांदेड उत्तर अशीच विधानसभेची मतमोजणी शहरात होत होती. मात्र यावेळी दोन्ही निवडणुका सोबत असल्यामुळे भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड या लोकसभा क्षेत्रातील वि...
Mohanrao More supports Congress : उबाठाचे बंडखोर अपक्ष उमेदवार मोहनराव मोरे यांचा काँग्रेसला पाठिंबा -NNL

Mohanrao More supports Congress : उबाठाचे बंडखोर अपक्ष उमेदवार मोहनराव मोरे यांचा काँग्रेसला पाठिंबा -NNL

उमरखेड, राजकीय, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार| महाविकास आघाडीच्या उबाठा पक्षाकडून तिकिटासाठी इच्छुक असलेले मोहनराव मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष कायम ठेवला होता .आज प्रचाराची रणधुमाळी संपत असताना त्यांनी आपला पाठिंबा काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांना दिल्याने राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहे . प्राचार्य मोहनराव मोरे मागील पंधरा वर्षापासून उमरखेड विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत .तसेच यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमरखेड विधानसभेत आमदारकीची निवडणूक लढले आहेत तर काँग्रेसकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती .यावेळी ते महाविकास आघाडीच्या उबाठा पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक होते .त्यांनी मातोश्रीवर जाऊन तिकिटासाठी प्रयत्न केले परंतु उमरखेड ची जागा काँग्रेसला सुटल्याने येथे काँग्रेसचे साहेबराव कांबळे हे काँग्रेसच्या चिन्हावर उभे राहिले . तिकीट न म...
cool down this evening : आज संध्याकाळी प्रचार तोफा थंडावणार -NNL

cool down this evening : आज संध्याकाळी प्रचार तोफा थंडावणार -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या 48 तासाला उद्या सोमवारी सायंकाळी 6 वाजता प्रारंभ होणार आहे. 48 तासांसाठी सर्व राजकीय पक्षांना आपला प्रचार थांबावावा लागणार असून 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार आहे. सर्वत्र चोख बंदोबस्‍त करण्‍यात आला असून निर्भय व पारदर्शी वातावरणात मोठ्या संख्‍येने नागरिकांना मतदान करण्‍याचे आवाहन जिल्‍हा प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रमाणे लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेच्या 48 तासा अगोदरच्या कालावधीमध्ये कलम 163 लागू होईल. याची नोंद घेण्‍याचे आवाहन केले आहे. या काळात सार्वजनिक सभा आयोजित करता येणार नाही. ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. बेकायदेशीरित्या ज...
Mannerwarlu community ; मन्नेरवारलु समाजाचा भीमराव केराम यांना पाठिंबा – NNL

Mannerwarlu community ; मन्नेरवारलु समाजाचा भीमराव केराम यांना पाठिंबा – NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे l किनवट तालुक्यातील शिवणी येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मन्नेरवारलू समाजाचे किनवट तालुका अध्यक्ष किशनराव यासमवार यांच्या अध्यक्षतेखाली शिवणी पंचायत समिती गणातील अप्पारावपेठ, मलकजाम, चिखली सह परिसरातील मन्नेरवारलु समाजाचे बैठक आयोजित करण्यात आले होती. या वेळी अखिल भारतीय मन्नेरवारलू समाजाचे प्रदेश सरचिटणीस सुरेशराव आंबूलगेकर यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,विधानसभा निवडणुकीत किनवट माहूर मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भीमराव केराम यांना बिनशर्त पाठींबा देण्यात येत आहे असे मत व्यक्त केले.या वेळी जिल्हा सचिव मधुकर उन्हाळे ,व्यंकटेश तोटावाड,नागोराव बोईनवाड, आदी उपस्थित होते. या वेळी आंबूलगेकर पुढे बोलतांना मन्नेरवारलू समाजाने किनवट माहूर मतदार संघात भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार भीमराव केराम यांना मागील काळात २०१९ च्या निवडणुकीत ...
The Muslim community of Himayatnagar united to make Baburao Kadam MLA..! : बाबुराव कदम यांना आमदार करण्यासाठी हिमायतनगरातील मुस्लिम समाज एकवटला..! -NNL

The Muslim community of Himayatnagar united to make Baburao Kadam MLA..! : बाबुराव कदम यांना आमदार करण्यासाठी हिमायतनगरातील मुस्लिम समाज एकवटला..! -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| लोकनेते तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना आमदार करण्यासाठी हिमायतनगरातील मुस्लिम समाज एकवटला असल्याचे बोलले जात आहे. शहरातील मुस्लिम मतदार असलेल्या वार्डात खुद्ध माजी उपनगरअध्यक्ष मोहम्मद जाविद यांनी पाच नगरसेवक प्रतिनिधींच्या सोबत पुढाकार घेऊन शहरात प्रचार राहिली काढली आहे. हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत मागील काळात भ्रष्टाचाराच्या चौकशीचा मुद्दा हाताळणारे माजी उपनगरअध्यक्ष मोहम्मद जाविद हाजी अब्दुल गन्नी सेठ यांनी महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना 5 माजी नगरसेवकासह शेकडो समर्थकांना घेऊन पाठिंबा दिला आहे. त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर प्रचारात उडी घेतली असून, शहरातील प्रत्येक मुस्लिम समाज बांधवांच्या मतदानाची संख्या असलेल्या वॉर्डावॉर्डात समर्थक मुस्लिम समाज बांधवाना घेऊन डोअर टू डोअर भेटी घेत बाबुराव कदम साहेबाना आमदार करण्यासाठी परिश्...
error: Content is protected !!