Thursday, May 14

Mannerwarlu community ; मन्नेरवारलु समाजाचा भीमराव केराम यांना पाठिंबा – NNL

किनवट, परमेश्वर पेशवे l किनवट तालुक्यातील शिवणी येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मन्नेरवारलू समाजाचे किनवट तालुका अध्यक्ष किशनराव यासमवार यांच्या अध्यक्षतेखाली शिवणी पंचायत समिती गणातील अप्पारावपेठ, मलकजाम, चिखली सह परिसरातील मन्नेरवारलु समाजाचे बैठक आयोजित करण्यात आले होती.

या वेळी अखिल भारतीय मन्नेरवारलू समाजाचे प्रदेश सरचिटणीस सुरेशराव आंबूलगेकर यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,विधानसभा निवडणुकीत किनवट माहूर मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भीमराव केराम यांना बिनशर्त पाठींबा देण्यात येत आहे असे मत व्यक्त केले.या वेळी जिल्हा सचिव मधुकर उन्हाळे ,व्यंकटेश तोटावाड,नागोराव बोईनवाड, आदी उपस्थित होते. या वेळी आंबूलगेकर पुढे बोलतांना मन्नेरवारलू समाजाने किनवट माहूर मतदार संघात भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार भीमराव केराम यांना मागील काळात २०१९ च्या निवडणुकीत सुद्धा समाजाने भक्कम पणे उभे होते.

IMG 20241117 WA0003 Mannerwarlu community ; मन्नेरवारलु समाजाचा भीमराव केराम यांना पाठिंबा - NNL

समाजात काही स्वार्थी लोकांनी भीमराव केराम यांच्या बद्दल अपप्रचार करत भीमराव केराम समाज विरोधी आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.परंतु भीमराव केराम यांनी कधीच वयक्तिक मन्नेरवारलू समाजाबद्दल टीका किंवा अपशब्द त्यांनी बोलले नाही.तर त्या उलट अनेक वेळा समजला मदत केले आहे.तर दुसरीकडे किनवट माहूर मतदार संघात विकासकाची नवे पर्व आणून अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध केले.

तर केराम यांनी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही त्यांनी विकासाचे राजकारण केले.किनवट माहूर मतदार संघाला एक अभ्यासू नेतृत्व म्हणून लाभलेल्या केरामांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवण्यासाठी शिवणी पंचक्रोशीतील आपण सर्व मन्नेरवारलु समाज भक्कमपणे केराम यांच्या पाठीशी राहून भरघोस मतदानाने कमळ या निशाणीवर बटन दाबून विजयी करण्यासाठी बिनशर्त पाठींबा देत आहोत असे मत व्यक्त केले.

या वेळी शिवणी येथील गंगाधर भुशिवाड, बालगंगाराम भुशिवाड, चिखली येथील पंढरी झरीवाड,नरेंद्र झरीवाड, राजेश्वर सिंगरवाड,विठ्ठल सिंगरवाड,हनमंतू भुशिवाड, गोवर्धन पालेलू,संजय तोटावाड,रवी अप्पारावपेठ सह शिवणी,मलकजाम, चिखली,सह परिसरातील मन्नेरवारलु समाज बांधव उपस्थित होते.तर या वेळी सर्व मन्नेरवारलु समाज बांधवांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार भीमराव केराम यांना जाहीर पाठींबा दर्शविला आहे.तर आंबूलगेकर यांनी भीमराव केराम हे भरघोस मताने निवडून येथील असा ठाम विश्वास व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!