Sunday, May 17

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Talks of the final campaign : गावा गावात रंगू लागल्या अंतिम प्रचाराच्या चर्चा; २० नोव्हेंबरला मतदान – NNL

Talks of the final campaign : गावा गावात रंगू लागल्या अंतिम प्रचाराच्या चर्चा; २० नोव्हेंबरला मतदान – NNL

नांदेड, राजकीय
उस्माननगर| नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या पोटनिवडणूक लोकसभा आणि नऊ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत मतदानाला काही दिवसाचा अवधी असल्यामुळे जिकडे तिकडे निवडणुकीच्या चर्चा सुरू असून अनेक ठिकाणी तर्क - वितर्क काढले जात आहेत. 20 तारखेला होत असलेला मतदानामुळे पक्षाचे कार्यकर्ते मतदार राजापर्यंत आपला प्रचार पोहोचवीत असताना प्रत्येक गावात किती मतदान होईल. कोणाचे पारडे किती जड आहे . या निवडणुकीत कोण बाजी मारणार ? कोणाची रॅली मोठी होती ? कोणाच्या सभेला माणसे किती होती ? यावरून आपलाच पक्ष निवडून येणार अशा गप्पाचां चा फड रंगलेला अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांची मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली असून , यामध्ये युवक मतदारांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत असल्यामुळे ग्रामीण भागात आपलाच उमेदवार विजयी होणार. पान टपऱ्या , चावडी , हॉटेल व कट्ट्यावर विविध पक्षांचे समर्थक...
Baburao Kadam Kohlikar : हादगावच्या सत्ताधारी आमदाराच्या अडथळ्यामुळे ३०० कोटींचा निधी थांबला – बाबुराव कदम कोहळीकर -NNL

Baburao Kadam Kohlikar : हादगावच्या सत्ताधारी आमदाराच्या अडथळ्यामुळे ३०० कोटींचा निधी थांबला – बाबुराव कदम कोहळीकर -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| हादगावच्या सत्ताधारी आमदाराच्या विरोधामुळे हदगाव - हिमायतनगर शहरासाठीच्या ड्रेनेज लाइनसाठी ३०० कोटींचा मंजुरीच्या प्रस्तावाचा निधी थांबला असल्याचा घणाघाती आरोप महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली. तसेच २० तारखेला मतदान करताना विचार करून मते द्या.. मी जनतेसाठी गेल्या २० वर्षांपासून पद नसताना काम करत आहे. हि माझी शेवटची निवडणूक असून, यानंतर मी निवडणूक लढविणार नाही. त्यामुळे मत वाया गेले समजून एकवेळ मला साथ द्या संधीचे सोने केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं आवाहन त्यांनी जनतेला केलं. हदगाव हिमायतनगर तालुक्यातील विधानसभा निवडणुकीसाठी दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या यांच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. हिमायतनगर तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि माजी खासदार सुभाष व...
Mla. Bhimrao Keram : तुम्ही मला मतदान रुपी आशीर्वाद द्या मी किनवट जिल्हा इस्लापूर मांडवी तालुका निर्मितीसाठी प्रयत्नशील राहील- आ. भीमराव केराम  -NNL

Mla. Bhimrao Keram : तुम्ही मला मतदान रुपी आशीर्वाद द्या मी किनवट जिल्हा इस्लापूर मांडवी तालुका निर्मितीसाठी प्रयत्नशील राहील- आ. भीमराव केराम -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार भीमराव केराम यांनी इस्लापूर येथील जाहीर सभेत जनतेला संबोधित करत असताना तुम्ही मला निवडून द्या मतदार रुपी आशीर्वाद द्या मी किनवट जिल्हा इस्लापूर तालुका मांडवी तालुका करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील . मी एक आदिवासी समाजातील आमदार निवडून आल्याने व आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व करत असल्याने अनेक प्रस्थापिताच्या पोटात दुखत असल्याची खंत सुद्धा यावेळी त्यांनी व्यक्त केली. कधी नव्हे ते जिल्ह्यात सर्वात जास्तीचा निधी मी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघासाठी खेचून आणला व विकासात्मक कामे केली. मी कुठेही काम करत असताना जातीपातीचे राजकारण नाही केलं मतदारसंघातील प्रत्येक गावात समान रित्या कामाचे वाटप केले. प्रत्येक भागाचा विकास साधण्याचा प्रयत्न मी सदैव केला. पण ही विकासात्मक कामे विरोधकाच्या डोळ्यात खूपत असल्याने माझ्या विरोध...
Elect Pradeep Naik : प्रदीप नाईक यांना निवडून द्या लाल दिव्याची खात्री मी घेतो…. खासदार अमोल कोल्हे -NNL

Elect Pradeep Naik : प्रदीप नाईक यांना निवडून द्या लाल दिव्याची खात्री मी घेतो…. खासदार अमोल कोल्हे -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार सभेत बोलत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा असे सुभाष चंद्र बोस यांनी म्हटलं होतं पण मी म्हणतो की तुम्ही प्रदीप नाईकांना निवडून द्या मी किनवटला लाल दिवा मिळून देण्यासाठी पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे शब्द टाकतो. मी तुमच्या वतीने पवार साहेबाकडे वकीली करेल 2019 चे विधानसभेच्या वेळीच हा ढाण्या वाघ निवडून आला असता तर लाल दिव्याची स्वप्न तुमचे पूर्ण तेव्हाच झाले असते. किनवटची ऐतिहासिक सभा ही नांदेड जिल्ह्याचा इतिहास लिहिण्यात सारखी होईल आज मी महाराष्ट्रभर फिरत असताना ही निवडणूक आता नुसती विधानसभेची राहिली नसून ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ठरली आहे . याप्रसंगी त्यांनी भाजपवर सडकवून टीका केली मतदाराच्या काठीला आवाज नसतो सुजल्यानंतर कळते की कुठे मार लागला हे भाजपाला कळायला पाहिजे...
Former Mla Shankaranna Dhondge माजी आ. शंकरअण्णा धोंडगे याची भूमिका निर्णायक ; मतदार संघाचे लक्ष -NNL

Former Mla Shankaranna Dhondge माजी आ. शंकरअण्णा धोंडगे याची भूमिका निर्णायक ; मतदार संघाचे लक्ष -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| लोहा विधानसभा मतदार संघात गोधळाची परिस्थिती आहे. पण असा राजकीय स्थितीत महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक माजी आ शंकर अण्णा धोंडगे हे काय निर्णय घेतात याकडे मतदार संघाचे लक्ष लागले असून त्याची भूमिका किंगमेकार अशी राहणार Urdu असा दावा धोंडगे समर्थकांनी केला आहे त्याच्या भूमिकेकडे मतदार संघाचे लक्ष लागले आहे. लोहा कंधार तालुक्याच्या राजकारणात बहाद्दरपूऱ्यातील ज्या क्रांतिभुवनाने ७१वर्ष एक पक्ष ..एक झेंडा पहिला .. अनेक डावपेच अनुभवले..विजयाचा ३५ वर्ष गुलाल उधळला ..त्याच अंगणात आता विविध पक्ष .. व झेंडे उभे राहिले आहेत.प्रा पुरुषोत्तम धोंडगे यांनी जाहीर पाठिंबा शेका.पक्षाच्या उमेदवार आशाबाई शिंदे यांना दिला ..त्याची" शिट्टी "वाजणार की राजकीय फुरर ..फुरर ..होणार हे निकालानंतर स्पष्ट होईल तर दुसरीकडे उमेदवारी मागे घेतल्या नंतरही किंगमेकर भूमीकेत माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे आहेत त्यांनी...
Former MP Subhash Wankhede : जातीभेदाच्या नावाखाली मतांचे विभाजन टाळून बाबुराव कदम कोहळीकर यांना आशीर्वाद द्या – माजी खासदार सुभाष वानखेडे -NNL

Former MP Subhash Wankhede : जातीभेदाच्या नावाखाली मतांचे विभाजन टाळून बाबुराव कदम कोहळीकर यांना आशीर्वाद द्या – माजी खासदार सुभाष वानखेडे -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या योजनांमुळे महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळे विरोधक मतांच विभाजन करून निवडणूक जिकंण्यासाठी विविध प्रकार अवलंबवित आहेत. विधानसभा निवडणुकीत २४ उमेदवार उभे आहेत, त्यापैकी काही उमेदवारांना रसद पुरवून जातीपातीचे विष पेरण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यांच्या या भुलथापाला भीक न घालता एक प्रामाणिक सरळ, सर्वसामान्य जनतेसाठी तळमळीने काम करणारा शेतकरी पुत्र उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देऊन आपले प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत पाठवा. असे आवाहन हिंगोली लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केले. ते गुरुवार दि.14 रोजी रात्रीला हिमायतनगर शहरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात संपन्न झालेल्या सभेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी प्रचार सभेच्या मंचावर महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीक...
Rahul Gandhi ; संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करु: राहुल गांधी -NNL

Rahul Gandhi ; संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करु: राहुल गांधी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार। संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणतात. संविधान रिकामे पुस्तक नाही तर त्यात बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची विचारसरणी आहे. संविधानात भारताचे ज्ञान, देशाचा आत्मा आहे. नरेंद्र मोदींनी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणून बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, गांधीजी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. काँग्रेस, इंडिया आघाडी मात्र कोणत्याही परिस्थितीत संविधानाचे रक्षण करेल आणि संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करेल, असा विश्वास लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नंदूरबार व नांदेडमध्ये भव्य प्रचारस...
3rd inspection of election ; किनवट मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची 16 नोव्हेंबरला तृतीय तपासणी – NNL

3rd inspection of election ; किनवट मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची 16 नोव्हेंबरला तृतीय तपासणी – NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे l भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 83- किनवट विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तृतीय तपासणी गुरुवारी 16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 यावेळेत 8- किनवट विधानसभा मतदार संघाकरिता नियुक्त खर्च निरिक्षक मयंक पाण्डेय (आयआरएस) यांच्या उपस्थितीत निवडणूक खर्च तपासणी कक्ष, आय. टी.आय. , किनवट येथे केली जाणार आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षक यांच्यासमोर सादर करणे आवश्यक आहे. अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमीत केलेल्या परिपत्रकांनुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांच...
OBC leader Laxman Hake : हिमायतनगर शहरात 18 नोव्हेंबर रोजी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची जाहीर सभा होणार -NNL

OBC leader Laxman Hake : हिमायतनगर शहरात 18 नोव्हेंबर रोजी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची जाहीर सभा होणार -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| येणाऱ्या 18 नोव्हेंबर रोजी हिमायतनगर शहरात भव्य रँली व श्री परमेश्वर मंदीर मैदानातील बसस्टँड येथे विजय संकल्प महासभा होणार आहे. या सभेला ओबीसी नेते लक्ष्मणजी हाके व नवनाथ आबा वाघमारे यांचा मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे तमाम वंचित व ओबीसी समाज बांधवानी विजय संकल्प महासभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे. हदगाव / हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील तमाम ओबीसी बहुजन बांधवांनी आलेल्या संधीचे सोने करून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा ओबीसी नेते दिलीप राठोड याना निवडून द्यावे. असे आवाहन प्रचाराच्या माध्यमातून मतदार संघात केले जात आहे. वंचित प्रचाराला गावागावातून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे विरोधकांकडून वंचितच्या उमेदवाराचा अपप्रचार करून बदनाम करण्याचे षडयंत्र रचून ओबीसी व वंचित समाजाचे मतदान मि...
Public support of Baburao Kadam Kohlikar : हिमायतनगरातील असंख्य मुस्लिम बांधवांचा बाबुराव कदम कोहळीकर यांना जाहीर पाठिंबा -NNL

Public support of Baburao Kadam Kohlikar : हिमायतनगरातील असंख्य मुस्लिम बांधवांचा बाबुराव कदम कोहळीकर यांना जाहीर पाठिंबा -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदार सांघट येणाऱ्या हिमायतनगर येथील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदान निर्मिती कामात भ्रष्टाचार करणाऱ्यावर कारवाई झाली नसल्याने याबाबत याचिका दाखल केली आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार यांच्या कार्य शैलीवर नाराज होऊन हिमायतनगर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद हाजी अब्दुल गन्नी यांच्यासह पाच नगरसेवक व काँगेसच्या असंख्य शहराध्यक्ष फेरोज कुरेशी सह अनेक मुस्लिम बांधवांनी पोलीस ठाणे नजीक बाजार चौकात कार्यक्रम घेऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर याना जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे बाबुराव कदम कोहळीकर यांच्या मताधिक्यात भर पडणार आहे. काँग्रेस पक्षाची एकगट्ठा मतदान असलेल्या हिमायतनगर शहरातील असंख्य मुस्लिम समाज बांधवानी आज पर्यंत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या मित्र पक्षालाच मतदान करून निवडून दिले आहे. मात्र मुस्लिम समाजाला न्याय देण्याचे स...
error: Content is protected !!