किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार सभेत बोलत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा असे सुभाष चंद्र बोस यांनी म्हटलं होतं पण मी म्हणतो की तुम्ही प्रदीप नाईकांना निवडून द्या मी किनवटला लाल दिवा मिळून देण्यासाठी पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे शब्द टाकतो. मी तुमच्या वतीने पवार साहेबाकडे वकीली करेल 2019 चे विधानसभेच्या वेळीच हा ढाण्या वाघ निवडून आला असता तर लाल दिव्याची स्वप्न तुमचे पूर्ण तेव्हाच झाले असते.
किनवटची ऐतिहासिक सभा ही नांदेड जिल्ह्याचा इतिहास लिहिण्यात सारखी होईल आज मी महाराष्ट्रभर फिरत असताना ही निवडणूक आता नुसती विधानसभेची राहिली नसून ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ठरली आहे . याप्रसंगी त्यांनी भाजपवर सडकवून टीका केली मतदाराच्या काठीला आवाज नसतो सुजल्यानंतर कळते की कुठे मार लागला हे भाजपाला कळायला पाहिजे. वन हक्कासारखे कायदे आणून आदिवासी बांधवांची जल जमीन काढून घेण्याचा घाट.
या सरकारच्या माध्यमातून घातला जातो. शाहू फुले आंबेडकर यांच्या वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात एक नव्हे तर दोन पक्ष पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना व नंतर शरदचंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी ही भाजपवाल्यांनी फोडली त्यांचे चिन्ह चोरली व निवडून आलेले लोकप्रतिनिधी विकल्या जात असल्याची परिस्थिती पहिल्यांदा महाराष्ट्राने बघितली व महाराष्ट्राच्या संस्कृतीची नासाडी करण्याची पाप या भाजप वाल्यांनी केली असल्याचा घनाघाती आरोप डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितीनजी कराळे भीम टायगर सेनेचे महाराष्ट्राचे संस्थापक दादासाहेब शेळके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भगवानरावजी आलेगावकर शिवसेनेचे नेते ज्योतीबा खराटे यांची प्रामुख्याने भाषणे झाली माजी आमदार खाजा बेग, कृष्णा पाटील आष्टीकर, व्यंकट भंडारवाड उस्मान खान पठाण मारुती दिवसे यांच्यासह जिल्हाभरातील सर्वच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची पदाधिकारी शिवसेनेची पदाधिकारी व मित्र पक्षाची पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होती. व सभास्थळी हजारो मतदारांची लक्षणीय उपस्थिती ही सर्वांची लक्ष वेधून घेत होती. या सभेचे सूत्रसंचालन दत्तराव मोहिते यांनी केली