किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार भीमराव केराम यांनी इस्लापूर येथील जाहीर सभेत जनतेला संबोधित करत असताना तुम्ही मला निवडून द्या मतदार रुपी आशीर्वाद द्या मी किनवट जिल्हा इस्लापूर तालुका मांडवी तालुका करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील . मी एक आदिवासी समाजातील आमदार निवडून आल्याने व आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व करत असल्याने अनेक प्रस्थापिताच्या पोटात दुखत असल्याची खंत सुद्धा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
कधी नव्हे ते जिल्ह्यात सर्वात जास्तीचा निधी मी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघासाठी खेचून आणला व विकासात्मक कामे केली. मी कुठेही काम करत असताना जातीपातीचे राजकारण नाही केलं मतदारसंघातील प्रत्येक गावात समान रित्या कामाचे वाटप केले. प्रत्येक भागाचा विकास साधण्याचा प्रयत्न मी सदैव केला. पण ही विकासात्मक कामे विरोधकाच्या डोळ्यात खूपत असल्याने माझ्या विरोधात अपप्रचार करण्यास त्यांनी सुरुवात केली. व माझ्या विरोधात खोटे नाटे आरोप करीत मी केलेल्या भाषणाचा व शब्दांचा वेगळा अर्थ काढून वाक्याचा विपर्यास करण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांनी सुरू केला. पण सुजाण मतदार राजा या सर्व गोष्टीला जाणून आहे. तो कधीही विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणार नाही याची मला खात्री आहे. असे मत याप्रसंगी आमदार भीमराव केराम यांनी व्यक्त केले.
आमदार भीमराव केराम यांच्या प्रचाराची धुरा या भागातील माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत आरंडकर यांनी हाती घेतल्याने प्रचाराला मोठ्या प्रमाणात गती मिळाली असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद अंकुरवाड यांनी केले. सभेच्या व्यासपीठावर मोठ्या प्रमाणात भाजपा पदाधिकाऱ्यांची व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सभास्थळी हजारोचा जनसमुदाय उपस्थित होता.