Thursday, May 14

Talks of the final campaign : गावा गावात रंगू लागल्या अंतिम प्रचाराच्या चर्चा; २० नोव्हेंबरला मतदान – NNL

उस्माननगर| नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या पोटनिवडणूक लोकसभा आणि नऊ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत मतदानाला काही दिवसाचा अवधी असल्यामुळे जिकडे तिकडे निवडणुकीच्या चर्चा सुरू असून अनेक ठिकाणी तर्क – वितर्क काढले जात आहेत. 20 तारखेला होत असलेला मतदानामुळे पक्षाचे कार्यकर्ते मतदार राजापर्यंत आपला प्रचार पोहोचवीत असताना प्रत्येक गावात किती मतदान होईल. कोणाचे पारडे किती जड आहे . या निवडणुकीत कोण बाजी मारणार ? कोणाची रॅली मोठी होती ? कोणाच्या सभेला माणसे किती होती ? यावरून आपलाच पक्ष निवडून येणार अशा गप्पाचां चा फड रंगलेला अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे.

18 वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांची मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली असून , यामध्ये युवक मतदारांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत असल्यामुळे ग्रामीण भागात आपलाच उमेदवार विजयी होणार. पान टपऱ्या , चावडी , हॉटेल व कट्ट्यावर विविध पक्षांचे समर्थक विजयाचे गणित मांडत असून दावे प्रति दावे केले जात असल्याचे सर्वत्र पाहावयास मिळत आहे . मतदानासाठी काही दिवसाचा अवधी असल्यामुळे प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी आणि भेटीगाठी समवेत मताची बेरीज वजाबाकी करण्यात व्यस्त आहे. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये कोठेही जा केवळ निवडणुकीच्या चर्चा आणि गप्पाच फड रंगलेला दिसत आहे . प्रचारात आपल्या पक्षाची भूमिका किती महत्त्वाची ठरत आहे.

किती मतदान होणार ? याचे गणित कार्यकर्ते व पदाधिकारी पटवून देत आहेत. सगळ्याच पक्षाचे समर्थक विजयाचे दावे व प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे कौल कोणाच्या बाजूने रहाणार यासाठी मात्र मतदान झाल्यावर समजेल . मात्र असे असले तरी सुध्दा प्रचार संपल्यानंतर रात्रीच्या वेळी विजयाची गणीते मांडण्यात विविध पक्षांचे व अपक्ष उमेदवार आणि कार्यकर्ते मग्न झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!