Talks of the final campaign : गावा गावात रंगू लागल्या अंतिम प्रचाराच्या चर्चा; २० नोव्हेंबरला मतदान – NNL
उस्माननगर| नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या पोटनिवडणूक लोकसभा आणि नऊ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत मतदानाला काही दिवसाचा अवधी असल्यामुळे जिकडे तिकडे निवडणुकीच्या चर्चा सुरू असून अनेक ठिकाणी तर्क - वितर्क काढले जात आहेत. 20 तारखेला होत असलेला मतदानामुळे पक्षाचे कार्यकर्ते मतदार राजापर्यंत आपला प्रचार पोहोचवीत असताना प्रत्येक गावात किती मतदान होईल. कोणाचे पारडे किती जड आहे . या निवडणुकीत कोण बाजी मारणार ? कोणाची रॅली मोठी होती ? कोणाच्या सभेला माणसे किती होती ? यावरून आपलाच पक्ष निवडून येणार अशा गप्पाचां चा फड रंगलेला अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे.
18 वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांची मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली असून , यामध्ये युवक मतदारांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत असल्यामुळे ग्रामीण भागात आपलाच उमेदवार विजयी होणार. पान टपऱ्या , चावडी , हॉटेल व कट्ट्यावर विविध पक्षांचे समर्थक...
