Tuesday, May 19

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Rahul Chavan : येणार्‍या महानगरपालिका निवडणूका आपल्याला जिंकायच्या – संघटक राहुल चव्हाण

Rahul Chavan : येणार्‍या महानगरपालिका निवडणूका आपल्याला जिंकायच्या – संघटक राहुल चव्हाण

नांदेड, राजकीय
नांदेड| येणार्‍या महानगरपालिका निवडणूका आपल्याला जिंकायच्या आहेत, हा निश्चय करुन प्रभागनिहाय संघटनात्मक बांधणी करताना सूक्ष्म पध्दतीने नियोजन करा, असे आवाहन शिवसेनेचे राज्य संघटक राहुल चव्हाण पाटील (We want to win the upcoming municipal elections - Organizer Rahul Chavan) यांनी आज येथे केले. नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात आज शिवसेना व अंगिकृत संघटनांच्या पदाधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठक राज्य संघटक राहुल चव्हाण पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला महानगरप्रमुख प्रकाश मारावार, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, राम चव्हाण, महानगरप्रमुख दक्षिण मनोज यादव, शहरप्रमुख अर्जुन ठाकूर, जित्तूसिंह टाक, तालुकाप्रमुख नंदू वैद्य, युवासेना जिल्हा युवाधिकारी अक्षय वट्टमवार, नागनाथ महादापुरे, गौतम जैन यांच्यासह अनेकांची उपस्थिती यावेळी होती. यावेळी महानगरपालिकेच्या एकंदरच पक्ष बांधणीसंदर्भात महानगरप्र...
Dr. Pramod Sawant ; आमच्या सरकारचा खरा डीएनए आदिवासीच आहे : डॉ. प्रमोद सावंत

Dr. Pramod Sawant ; आमच्या सरकारचा खरा डीएनए आदिवासीच आहे : डॉ. प्रमोद सावंत

नांदेड, राजकीय
नांदेड l गोव्याच्या सर्व समावेशक प्रशासनाच्या प्रवासात एक परिवर्तनकारी क्षण म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माननीय केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री श्री जुआल ओराम यांच्यासमवेत संगुएम नगरपालिका सभागृहात ३० दिवसांच्या धरती आबा जनभागीदारी अभियानाचा शुभारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हे प्रमुख उपक्रम केवळ योजनांद्वारेच नव्हे तर प्रामाणिक संपर्क, सहभागाने चालणाऱ्या विकासाद्वारे आदिवासी समुदायांना सक्षम करण्यासाठी समर्पित आहे. ही केवळ एक योजना नाही, तर ती आपली सामाजिक जबाबदारी आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. आम्ही केवळ कार्यक्रम राबवत नाही, तर आम्ही आमच्या आदिवासी बंधू-भगिनींच्या प्रगतीच्या प्रवासात सोबत आहोत. आदिवासींच्या उत्थानासाठी सरकारच्या खोलवर रुजलेल्या वचनबद्धतेला पुन्हा एकदा अधोरेखित करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, आमचा खरा डीएनए आद...
Crop loan : शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या – आ. श्रीजया चव्हाण

Crop loan : शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या – आ. श्रीजया चव्हाण

नांदेड, राजकीय
नांदेड, अनिल मादसवार| भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्रीजया चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील पीक कर्ज वितरणाचा मुद्दा (Provide crop loans to farmers - MLA Sreejaya Chavan) आज विधानसभेत मांडला. शेतकरी आर्थिक अडचणीत असून, त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. विधानसभेत बोलताना आ. श्रीजया चव्हाण म्हणाल्या की, खरीप हंगाम सुरू होऊन एक महिना झाला. कालपर्यंत नांदेड जिल्ह्यात ८२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, अद्याप नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्दिष्टाप्रमाणे पीककर्ज वितरित झालेले नाही. नांदेड जिल्ह्यात खरिप हंगामासाठी एकूण १ हजार ८५० कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. परंतु, आतापर्यंत केवळ ९०० कोटी रुपये म्हणजे सुमारे ५० टक्के कर्ज वितरण झाले आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत ४४५ कोटी रूपयांचे वाटप करून १०० टक्के उद्दिष्ट पूर्...
Sarpanch : उस्माननगर येथील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणात बदल करण्याची मागणी

Sarpanch : उस्माननगर येथील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणात बदल करण्याची मागणी

नांदेड, राजकीय
उस्माननगर| कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर येथील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणात बदल करून एसी ला आरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाधर केरबा कांबळे यांनी तहसीलदार कंधार यांच्या कडे केली आहे. सविस्तर माहिती की , कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर येथील ग्रामपंचायत ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे. येथील आरक्षण सोडत मागील दोन महीनाभर आगोदर ओबीसी साठी सुटले होते. यादरम्यान ओबीसीं नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. अचानक दि १ जुलै रोजी पुन्हा दुसऱ्यांदा आरक्षण सोडत काढण्यात आली. पण आरक्षण सोडताना संबंधित अधिकारी यांनी कोणत्या निकषावर आरक्षण काढले हे समजले नसले तरी. उस्माननगर येथे ओपन पुरूष हे आरक्षण मागील तीन टर्म सुटले होते. येथे सर्व जाती धर्माचे लोक आहेत. नियमानुसार ज्या समाजाला आरक्षण मिळायला हवे त्य...
Revenue Minister Bawankule : नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार – महसूलमंत्री बावनकुळे

Revenue Minister Bawankule : नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार – महसूलमंत्री बावनकुळे

मुंबई, राजकीय
मुंबई| राज्यात नोंदणी आणि मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी जमा होणारा "एक टक्का निधी" थेट आणि तात्काळ संबंधित संस्थांना मिळावा यासाठी सरकार लवकरच नवीन कार्यपद्धती तयार करणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत स्पष्ट केले. विधानसभेत आमदार रणधीर सावरकर यांनी अकोल्यातील स्थानिक संस्थेला मिळालेल्या निधीबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तरात महसूलमंत्री म्हणाले , “अकोल्यात सुमारे ३५ कोटी रुपये या स्वरूपात थकित आहेत. संपूर्ण राज्यात पाहता ही थकित रक्कम तब्बल ७९०० कोटी रुपयांवर आहे. आजच्या स्थितीत, मुद्रांक शुल्क शासनाच्या खात्यात जमा होते. त्यानंतरच अर्थसंकल्पात तरतूद होऊनच संबंधित संस्थांना निधी वितरीत होतो. त्यामुळे अनेकदा ३-५ वर्षे निधी वितरित होत नाही. यावर उपाय म्हणून, ज्या दिवशी मुद्रांक नोंदणी होते, त्याच दिवशी १% ...
Deputy Sarpanch : नागझरीच्या उपसरपंच पदी पुष्पाबाई नाईक धिरबसी यांची बिनविरोध निवड

Deputy Sarpanch : नागझरीच्या उपसरपंच पदी पुष्पाबाई नाईक धिरबसी यांची बिनविरोध निवड

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| नाट्यमय घडामोडीनंतर ग्रामपंचायत कार्यालय नागझरी च्या उपसरपंच पदी पुष्पाबाई कुंडलसिंग नाईक धिरबसी यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालय नागझरी येथे तहसिलदार डॉ. चौंडकरांच्या अध्यक्षतेखाली १२ जून २०२५ रोजी विशेषसभा पार पडली होती. १२ जूनच्या ग्रामपंचायतीच्या विशेषसभेत सात विरुद्ध एक मताने अविश्वास पारीत झाल्याने माजी उपसरपंच राजू मुंडेंना पदाला मुकावे लागले यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर आज दिनांक ०२ जुलै २०२५ रोजी सरपंच प्रदीप तुमराम यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यात उपसरपंच पदी पुष्पाबाई कुंडलसिंग नाईक धिरबसी यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी पिठासिन अधिकारी म्हणून पंचायत समिती किनवटचे विस्तार अधिकारी के गायकवाड यांनी काम पाहिले. ग्रामपंचायत अधिकारी रेणुका शामराव चिकराम यांची उपस्थिती होती. राजू मुंडे ,वैशाली मनोजकुमार विनकरे, सुनिता रामद...
Free sand : राज्यात २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी; घरकुलांसाठी मोफत वाळू वितरणाचीही हमी

Free sand : राज्यात २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी; घरकुलांसाठी मोफत वाळू वितरणाचीही हमी

नांदेड, राजकीय
मुंबई| राज्यात वाळू वाहतुकीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला निर्णय अखेर घेण्यात आला असून, सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता २४ तास करता येणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत नियम ४७ अंतर्गत निवेदन सादर करत केली. मंत्री बावनकुळे म्हणाले की, सद्यस्थितीत सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच वाळूचे उत्खनन परवानगीने होते. पण दिवसभरात साठवलेली वाळू रात्री उचलता न आल्यामुळे वाहतूक क्षमतेचा योग्य उपयोग होत नाही आणि त्यामुळे अवैध वाहतूक वाढते. ही परिस्थिती बदलण्यासाठी महाखनीज पोर्टलवरून २४ तास ईटीपी तयार करता येईल अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहतुकीसाठी सुरक्षिततेचे पाऊल वाहतुकीच्या पारदर्शकतेसाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून, प्रत्येक वाळूघाटाचे जिओ-फेन्सिंग केले जाणार आहे. घाट व मार्गांवर सीसीटीव्ही बसवले जाणा...
Jahagirdar : आवाज मराठीचा जल्लोष मराठीचा या ऐतिहासिक सभेसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे – जहागीरदार

Jahagirdar : आवाज मराठीचा जल्लोष मराठीचा या ऐतिहासिक सभेसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे – जहागीरदार

नांदेड, राजकीय
नांदेड| हिंदी भाषा सक्तीचे निर्णय रद्द करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असता मराठी वरचा अन्याय होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि होणाऱ्या अन्याय सहन करणार नाही. अशी तडखर भूमिका राज साहेब ठाकरे यांनी घेतली असून, दिनांक 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटी वरून भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चाची दखल घेत सरकारने हिंदी सक्तीचे निर्णय रद्द केल्याने मागणीला यश येऊन हिंदी सक्तीचे दोन्ही निर्णय रद्द केल्याचे जाहीर केले. मोर्चा रद्द झाल्याने जल्लोष मराठीचा या ऐतिहासिक सभा आयोजित केली आहे. या सभेकरिता नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तसेच अंगीकृत संघटना महिला सेनेच्या पदाधिकारी व मनसे सैनिक यांनी दिनांक 5 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता एन एम सी आय डोम वरळी मुंबई येथे होणाऱ्या सभेसाठी जाणार आहेत. ...
Gram Panchayat Sarpanch : हिमायतनगर : ग्रामपंचायत सरपंच आरक्षणाच्या दुसऱ्या सोडतीत तालुक्यातील पाच गावात मोठा फेरबदल

Gram Panchayat Sarpanch : हिमायतनगर : ग्रामपंचायत सरपंच आरक्षणाच्या दुसऱ्या सोडतीत तालुक्यातील पाच गावात मोठा फेरबदल

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| सरपंच पदाच्या २५ एप्रिल आरक्षणात सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटलेल्या आदर्श गाव टेंभी, दुय्यम बाजार पेठ असलेल्या कामारी, सिरंजनी, आंदेगाव, पोटा खु या पाच गावातील सरपंचपद ईतर मागासवर्गीसाठी आरक्षित झाले आहे. या गावांचा अपवाद वगळता उर्वरित गावांचे आरक्षण बहुदा जैसे थे अवस्थेत आहे. हिमायतनगर येथील तहसील कार्यालयात दिनांक १ जुलै रोजी दुपारी 3 वाजता ऊपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार पल्लवी टेमकर, पेशकार चंद्रुभैया राठोड यांच्या उपस्थितीत प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. ग्रामपंचायत निहाय आरक्षणाची चिठ्ठी बालकांच्या हस्ते काढून सरपंच पदाची सोडत जाहिर करण्यात आली. यात तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती पैकी २७ जागा महिलासाठी तर २५ जागा पुरुषासाठी सुटल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी ७ पैकी ४ महिला, ३ पुरुष, अनुसूचित जमाती १० पैकी ५ महिला ५ पुरुष, ओबीसी १...
Nanded ; नांदेड तालुक्यातील 73 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण जाहिर

Nanded ; नांदेड तालुक्यातील 73 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण जाहिर

नांदेड, राजकीय
नांदेड l नांदेड तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत मंगळवारी तहसील कार्यालयातील उपविभागीय अधिकारी यांच्या बैठक कक्षात जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, सामान्य उपविभागीय अधिकारी अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शकपणे शांततेत पार पडली. तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीपैकी ३७ग्रामपंचायतीवर महीलांना सरपंच पदाची संधी उपलब्ध होणार आहे. अनुसूचित जातीसाठी तालुक्यात असलेल्या १८ ग्रामपंचायतीपैकी राहेगाव, मार्कंड, पोखर्णी, खुपसरवाडी, कोटतीर्थ, धानोरा, पिंपरी महिपाल, नाळेश्वर, जैतापूर या ठिकाणी सरपंच पदाचे आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे तर अनुसूचित जाती महिलांसाठी गाडेगाव, बाभूळगाव, पुयणी, नागापूर / सस्तापूर, किकि, वाजेगाव, सुगाव बु, भनगी, आदी ठिकाणी बळीरामपूर आदी महिलांसाठी सरपंच पदाचे आरक्षण राखीव आहे. तरअनुसूचित जम...
error: Content is protected !!