नांदेड| येणार्या महानगरपालिका निवडणूका आपल्याला जिंकायच्या आहेत, हा निश्चय करुन प्रभागनिहाय संघटनात्मक बांधणी करताना सूक्ष्म पध्दतीने नियोजन करा, असे आवाहन शिवसेनेचे राज्य संघटक राहुल चव्हाण पाटील (We want to win the upcoming municipal elections – Organizer Rahul Chavan) यांनी आज येथे केले.


नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात आज शिवसेना व अंगिकृत संघटनांच्या पदाधिकार्यांची महत्वपूर्ण बैठक राज्य संघटक राहुल चव्हाण पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला महानगरप्रमुख प्रकाश मारावार, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, राम चव्हाण, महानगरप्रमुख दक्षिण मनोज यादव, शहरप्रमुख अर्जुन ठाकूर, जित्तूसिंह टाक, तालुकाप्रमुख नंदू वैद्य, युवासेना जिल्हा युवाधिकारी अक्षय वट्टमवार, नागनाथ महादापुरे, गौतम जैन यांच्यासह अनेकांची उपस्थिती यावेळी होती.

यावेळी महानगरपालिकेच्या एकंदरच पक्ष बांधणीसंदर्भात महानगरप्रमुख प्रकाश मारावार यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर राहुल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. येणारी महानगरपालिकेची निवडणूक आपल्याला जिंकायची आहे, यासाठी मागच्या बैठकीत सांगितल्या प्रमाणे प्रभागनिहाय बैठकांना आजपासूनच सुरुवात करा, शिवसेनेचे संघटन वार्डनिहाय व प्रभागनिहाय करताना त्याचे नियोजन करा, संघटनेतील सर्वसामान्य शिवसैनिकांना विश्वासात घेवून वार्डनिहाय हि बांधणी केली तर निश्चितच यश मिळू शकेल.

मतदार याद्यामध्ये नसलेली नावे पुन्हा टाकण्यासाठी नवमतदारांच्या नाव नोंदणीसाठी अभियान आता राबवायचे आहे, प्रभागात व वार्डात नसलेली नावे यादी शोधून ती वगळण्यासाठी प्रशासनावर मोठ्या प्रमाणात दबाव आणून तसे आक्षेप नोंदले पाहिजे. जेणेकरुन यादी पारदर्शी बनू शकेल. प्रभाग रचनेच्या संदर्भात घ्यावयाचे आक्षेप, त्याची मांडणी याबाबत डोळ्यात तेल घालून आपण काम केले पाहिजे. या निवडणुकीत कुणाशी युती करायची, कुणाशी करायची नाही याबाबतचा विचार वरिष्ठ पातळीवर पक्षप्रमुख घेतील, मात्र प्रत्येक प्रभागात आपले सक्षम उमेदवार शोधून त्यांची माहिती घेवून तशी तयारी आपल्याला करावी लागणार आहे. वेळ भरपूर असून, प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेवून कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले.

पक्षाची शिस्त न तोडता येणार्या पंधरा दिवसात प्रभागाची बांधणी करा, प्रत्येक वार्डात संपर्क अभियान राबवून संघटनात्मक बांधणी करा, महानगरपालिका निवडणुकांसाठी मिळालेला वेळ लक्षात घेता सूक्ष्म पध्दतीने नियोजन केल्यास विजय आपलाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रभागनिहाय बैठकांना सुरु करताना त्या भागातला शाखाप्रमुख ते शिवसैनिक याची सर्व माहिती सर्वांना असली पाहिजे, प्रभागात जाताना त्याबाबतचा आराखडा सुस्पष्ट तयार करुन त्याची मांडणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिकेवर आपल्याला विजय मिळवायचा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.