Tuesday, May 19

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Gunthewari News ; ग्रामीण भागातील गुंठेवारीला मुदत वाढ मिळणार : महसूल मंत्री बावनकुळे यांची आ. आनंदराव बोंढारकर यांच्याशी सकारात्मक चर्चा

Gunthewari News ; ग्रामीण भागातील गुंठेवारीला मुदत वाढ मिळणार : महसूल मंत्री बावनकुळे यांची आ. आनंदराव बोंढारकर यांच्याशी सकारात्मक चर्चा

नांदेड, राजकीय
Gunthewari in rural areas will get extension: Revenue Minister Bawankule has positive discussions with MLA Anandrao Bondharkar नांदेड। ग्रामीण भागातील गुंठेवारी बंद असल्यामुळे जमिन खरेदी-विक्रीचे सगळे व्यवहार ठप्प आहेत . यातून अनेक समस्या निर्माण झाले असल्याने मालमत्ता धारकांना दिलासा देण्यासाठी ग्रामीण भागातील गुंठेवारीला मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी आ. आनंदराव बोंढारकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. या मागणीबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. बोंढारकर यांच्याशी सकारात्मक चर्चा केली असून ही मुदत वाढ लवकरच मिळेल असा विश्वास आ. बोंढारकर यांनी व्यक्त केला आहे. विधानसभेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज आ. बोंढारकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी सादर केले. ग्रामीण भागातील गुं...
Mla Srijaya Chavhan ; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा – आ. श्रीजया चव्हाणांची विधानसभेत मागणी

Mla Srijaya Chavhan ; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा – आ. श्रीजया चव्हाणांची विधानसभेत मागणी

नांदेड, राजकीय
Provide financial assistance to the affected farmers - MLA Sreejaya Chavan's demand in the Legislative Assembly मुंबई/नांदेड। भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी वादळी वाऱ्यांमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विशेषतः केळी उत्पादकांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याची मागणी आज विधानसभेत मांडली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले आहे. आ. श्रीजया चव्हाण यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनांवरील चर्चेत ही मागणी केली. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या विषयाकडे त्यांचेही लक्ष वेधले. आपल्या निवेदनात आ. श्रीजया चव्हाण यांनी नमूद केले आहे की, ९ व १० जून रोजी नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर, मुदखेड, भोकर, हदगाव, देगलूर, कंधार, धर्माबाद, मुखेड इत्यादी तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे सुमारे ४ ...
MNS Vidyarthi Sena : नांदेड जिल्ह्यातील शाळेचे फलक बोर्ड मराठीमध्ये करा – मनसे विद्यार्थी सेना

MNS Vidyarthi Sena : नांदेड जिल्ह्यातील शाळेचे फलक बोर्ड मराठीमध्ये करा – मनसे विद्यार्थी सेना

नांदेड, राजकीय
 Make school boards in Nanded district in Marathi नांदेड| नांदेड जिल्ह्यातील शाळेचे फलक बोर्ड मराठीमध्ये करण्यात यावेत अशी मागणी मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष राम जाधव पाटील यांच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यातील बहुतांश अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या नामपलक इंग्रजी भाषेमध्ये नाम फलक लावण्यात आले असून, राज्यात शासन निर्णयानुसार शाळेचे नामफलक हे मराठीतच लावणे बंधनकारक आहे. असे असताना नांदेड जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळेत मराठी ऐवजी इंग्रजी भाषेमध्ये नाम फलक लावण्यात आले असून, जिल्ह्यातील इंग्रजी भाषेतील नामफलक लावलेल्या शाळेवर तात्काळ कारवाई करून मराठीमध्ये शाळेच्या नामफल लावण्याचे आदेश त्वरित पारित करून आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळेवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे. मराठी भाषा...
Cm Devendra Fadanvis ; दुष्काळाला भूतकाळ बनवून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी भाजपा समर्पित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Cm Devendra Fadanvis ; दुष्काळाला भूतकाळ बनवून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी भाजपा समर्पित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

नांदेड, मुंबई, राजकीय
BJP is dedicated to making drought a thing of the past and building a developed Maharashtra - Chief Minister Devendra Fadnavis assures नांदेड । लोकसभेच्या निवडणुकीत फेक नॅरेटिव्हद्वारे जनतेची दिशाभूल करून मिळविलेले यश विधानसभेच्या निवडणुकीत थेट नॅरेटिव्हद्वारे आम्ही हिरावून घेतले आहे, पण येत्या निवडणुकांमध्ये बोलबच्चन भैरवी सुरू होईल, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचे रडगाणे सुरू होईल, पण मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची ताकद कोणाकडेही नसून मुंबई महाराष्ट्राचीच आहे, अशी ग्वाही देतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारताबरोबर, विकसित महाराष्ट्र हे आमचे ध्येय असून दुष्काळ हा भूतकाळ ठरावा यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले. भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पदग्रहण सोहळ्यानि...
Bjp News ; भाजपाची राष्ट्रवादाची विचारधारा सामान्य माणसांपर्यंत नेणार – भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा निर्धार

Bjp News ; भाजपाची राष्ट्रवादाची विचारधारा सामान्य माणसांपर्यंत नेणार – भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा निर्धार

नांदेड, मुंबई, राजकीय
BJP's new state president Ravindra Chavan is determined to take the ideology of nationalism of the BJP to the common people मुंबई। भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादाची विचारधारा तसेच मोदी सरकारचे लोकोपयोगी निर्णय राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सामान्य माणसापर्यंत नेऊन पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या साथीने पार पाडेन, असा निर्धार भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केला. वरळी डोम येथे प्रचंड उत्साहात पार पडलेल्या पक्षाच्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात श्री. चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर बोलताना श्री. चव्हाण म्हणाले की, माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या छोट्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीसारख्या मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाते ही फार मोठी गोष्ट...
BJP News : भाजपा सिडको मंडळात संकल्प से सिध्दी तर्फे कार्यशाळा संपन्न

BJP News : भाजपा सिडको मंडळात संकल्प से सिध्दी तर्फे कार्यशाळा संपन्न

नांदेड, राजकीय
Workshop conducted by Sankalp Se Siddhi at BJP CIDCO Mandal नवीन नांदेड| पंतप्रधान मोदी सरकारच्या विकास, सुशासन आणि गरिबांच्या कल्याणा साठी समर्पित सेवेच्या ११ वर्षांच्या स्मरणार्थ भाजपा सिडकोमंडळात "संकल्प से सिद्धी तक" कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जनसंघाचे संस्थापक स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी अध्यक्ष प्रविण साले यांनी २०१४ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन भारत निर्माण करण्याचे वचन दिले होते आणि ११ वर्षांत, त्या वचनांची पूर्तता झाली आहे हे सांगून आर्थिक, सामाजिक सांस्कृतिक परिवर्तन प्रत्येक क्षेत्रात दिसून येत आहे व २०१४ पूर्वीच्या आणि २०१४ नंतरच्या भारतामधील फरक स्पष्ट आहे असे नमूद केले. त्यानंतर प्रा.नंदू कुलकर्णी यांनी १९७५च्या आणीबाणीच्या काळ्या वारशा बद्दलची माहिती उपस्थिती तांना सांगू...
Mla Prataprao Patil ; पाच वेळा पक्षांतर तरीदेखील जनतेच्या आशीर्वादामुळेच आमदार – आमदार प्रताप चिखलीकर

Mla Prataprao Patil ; पाच वेळा पक्षांतर तरीदेखील जनतेच्या आशीर्वादामुळेच आमदार – आमदार प्रताप चिखलीकर

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे। मी माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय वाटचालीमध्ये अनेक निवडणुका लढवल्या अनेक वेळेस जिंकलो तर काही वेळेस पराभव देखील पत्कारला. माझे वडील काही आमदार खासदार नव्हते तरीदेखील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील गरीब कष्टकरी जनता माझ्या पाठीशी सातत्याने खंबीरपणे उभी राहिली. मतदारसंघाच्या विकासासाठी व काही राजकीय अडचणीमुळे मला वारंवार पक्ष बदलावे लागले तरीदेखील जनतेचे माझ्यावरील प्रेम कमी झाले नाही. त्यांच्या प्रेमामुळेच तीन वेळेस आमदार, एक वेळेस खासदार म्हणून यशस्वी कामगिरी बजावू शकलो. असे भावनिक उद्गार आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काढले. तालुक्यातील गंगनबीड येथे संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष संदीप पाटील तोंडचिरे यांच्या वतीने शेतकरी सन्मान सोहळ्याचे व मेळाव्याचे भव्य आयोजन दि २८ जुन रोजी सायंकाळी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतापराव पाटील ...
Harshvardhan Sapkal : हिंदी सक्ती विरोधात मोठे जनआंदोलन उभे; ५ तारखेच्या मोर्चा आधीच सरकार निर्णय रद्द करेल – हर्षवर्धन सपकाळ.

Harshvardhan Sapkal : हिंदी सक्ती विरोधात मोठे जनआंदोलन उभे; ५ तारखेच्या मोर्चा आधीच सरकार निर्णय रद्द करेल – हर्षवर्धन सपकाळ.

मुंबई, राजकीय
A large public movement is being held against Hindi compulsion; the government will cancel the decision before the march मुंबई| हिंदी भाषा सक्तीचा शासन आदेश आल्यानंतर लगेच याला विरोध करत हिंदी सक्ती करू नये अशी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली. तसेच सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था यांनी यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले होते. हा संस्कृती रक्षणाचा लढा सर्वांनी मिळून लढला पाहिजे. आज राज्यात हिंदी सक्तीच्या विरोधात मोठे आंदोलन उभे राहिले आहे. ५ तारखेला मोर्चा निघत आहे पण मार्चाच्या आधीच हा निर्णय रद्द करण्याची वेळ सरकारवर येईल मात्र हा मोर्चा काढून मराठी संवर्धनासाठी आपण कट्टीबद्ध आहोत हा संदेश देशात पोहचला पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. मराठी भाषा केंद्र व समविचारी संस्था, राजकीय पक्ष यांच्यावतीने आझाद मैदानात हिंदी भाषेच्या सक्तीव...
CM. Devendra Fadnavis : हिंदी भाषे संदर्भातील दोन्ही शासन जीआर रद्द – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

CM. Devendra Fadnavis : हिंदी भाषे संदर्भातील दोन्ही शासन जीआर रद्द – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

मुंबई, राजकीय
Both government GRs regarding Hindi language cancelled - Chief Minister Devendra Fadnavis' announcement मुंबई| पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत हिंदी भाषेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र जाधव यांचे अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून या समितीच्या अहवालानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. महायुतीचे हे चौथे अधिवेशन असून, बहुतांश भागांत पावसाचे आगमन झाले आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी कमी पाऊस ...
Raj Thackeray : मराठी एकजुटीचा धसका सरकारने घेतला – राज ठाकरें

Raj Thackeray : मराठी एकजुटीचा धसका सरकारने घेतला – राज ठाकरें

मुंबई, राजकीय
Government took a hit on Marathi unity - Raj Thackeray मुंबई| महायुतीसरकारने हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावरून विरोधकांनी प्रतिक्रिया देणे सुरू केले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या दबावामुळे मागे घेतली गेली असे म्हणत सरकारने मराठी एकजुटीचा धसका घेतला असून, हिंदी सक्तीसाठी सरकारवर नेमका कोणाचा दबाव ? होता असा सवाल राज ठाकरें यांनी विचारला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या एक्स हैण्डलवरून महायुती सरकारने हिंदी भाषेसंदर्भातील निर्णय रद्द केल्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी म्हंटले कि, इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घ...
error: Content is protected !!