उस्माननगर| कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर येथील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणात बदल करून एसी ला आरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाधर केरबा कांबळे यांनी तहसीलदार कंधार यांच्या कडे केली आहे.


सविस्तर माहिती की , कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर येथील ग्रामपंचायत ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे. येथील आरक्षण सोडत मागील दोन महीनाभर आगोदर ओबीसी साठी सुटले होते. यादरम्यान ओबीसीं नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. अचानक दि १ जुलै रोजी पुन्हा दुसऱ्यांदा आरक्षण सोडत काढण्यात आली. पण आरक्षण सोडताना संबंधित अधिकारी यांनी कोणत्या निकषावर आरक्षण काढले हे समजले नसले तरी. उस्माननगर येथे ओपन पुरूष हे आरक्षण मागील तीन टर्म सुटले होते. येथे सर्व जाती धर्माचे लोक आहेत.

नियमानुसार ज्या समाजाला आरक्षण मिळायला हवे त्यांना आतापर्यंत डावलण्यात आले आहे. दहा ते पंधरा वर्षांपासून एसी पुरुष व एस्टी इतर समाजाला आरक्षण सुटले नाही. दि १ जुलै रोजी सोडण्यात आलेल्या आरक्षणास सर्वसामान्य जनतेला विरोध आहे.२०११ च्या जनगणनेनुसार विचार करून ओपन पुरुषाचे आरक्षण रद्द करून SC पुरूषांच्या आरक्षणाचा विचार करावा अशी मागणीचे निवेदन तहसीलदार कंधार याना गंगाधर केरबा कांबळे यांनी दिले आहे.
