Tuesday, May 19

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

A. Anandrao Bondharkar ; आ.आनंदराव बोंढारकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

A. Anandrao Bondharkar ; आ.आनंदराव बोंढारकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड़ l नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आ.आनंदराव बोंढारकर यांच्या वाढदिवसा निमित्त परिसरातील पिंपळगाव मीश्री, वडगांव, बळीरामपुर येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले,तर गुरुगोंविद सिघजी अंध विद्यालय धनेगाव येथे अन्नदानाचे वाटप व बळीरामपुर येथे शिवसेना शाखेच्या नाम फलकाचे अनावरण आ.आनंदराव बोंढारकर यांचा हस्ते करण्यात आले. आ.बोढारकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शालेय साहित्य वाटप करण्यात आले तर गुरु गोंविद सिघजी अंध विद्यालय धनेगाव येथे अन्नदानाचे वाटप करण्यात आले, यावेळी आ.बोढारकर यांनी अंध मुलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कार्यक्रमांचे आयोजक संभाजी पाटील जाधव यांच्या सह ,संभाजीराव पुयड वडगांवकर,मुरली पाटील पुयड पिंपळगांवकर,नांमदेव पाटील पुयड, युवराज पुयड,वैभव जाधव,केशव जाधव, यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून ,बालाजी पाटील भायेगावकर, सुहास पाटील खराणे, तुक...
CIDCO ; भाजपा महानगर कार्यकारिणी सह विविध आघाडीचा नियुक्तावर सिडको परिसरातील निष्ठावंत पदाधिकारी यांच्यी वर्णी

CIDCO ; भाजपा महानगर कार्यकारिणी सह विविध आघाडीचा नियुक्तावर सिडको परिसरातील निष्ठावंत पदाधिकारी यांच्यी वर्णी

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l भाजपा महानगर कार्यकारिणी व विवीध आघाडीचा समिती प्रमुख पदाधिकारी पदी सिडको हडको सह विविध भागातील निष्ठावंत व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते यांच्यी वर्णी लागल्यामुळे आगामी मनपा निवडणूक पुर्वी नियुक्ता मुळे नवचैतन्य पसरले आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ.अजितराव गोपछडे, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांच्या शिफारशीनुसार भाजपा महानगर नांदेड शहर जिल्हा अध्यक्ष माजी आ.अमरभाऊ राजूरकर यांनी भाजपा महानगर कार्यकारिणी घोषित केली. यात नवीन नांदेड भागातील व भाजपा निष्ठावंत पदाधिकारी यांच्यी नियुक्ती केली,यात उपाध्यक्ष पदावर माजी नगरसेवक प्रतिनिधी तथा युवा नेते संजय पाटील घोगरे, सामाजिक चळवळीतील अग्रगण्य असणारे वैजनाथ देशमुख, भाजपा एकनिष्ठ पदाधिकारी सिध्दार्थ धुतराज, यांच्यी नियुक्ती केली आहे तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून तिसऱ्यांदा धिरज स्वामी यांची नियुक्ती...
Gopinathrao Munde : दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे दुष्काळमुक्त मराठवाड्याचे स्वप्न साकार करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gopinathrao Munde : दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे दुष्काळमुक्त मराठवाड्याचे स्वप्न साकार करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, राजकीय, लातूर
लातूर| लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे हे कर्तृत्ववान व संघर्षशील नेतृत्व होते. त्यांची कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतची वाटचाल संघर्षमय होती. त्यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न पाहिले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी या भागात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी कृष्णा खोऱ्यातील ७ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी यापूर्वीच मंजुरी दिली असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता गोदावरी खोऱ्यातील ५४ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच लातूर शहर विस्तारीत पाणी पुरवठा योजना आणि जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या कामाला मंजुरी देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. लातूर येथे दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणानिमित्त दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्र...
Sardar Vallabhbhai Patel : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष

Sardar Vallabhbhai Patel : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष

नांदेड, राजकीय
नांदेड| देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कारेगाव फाटा ता.धर्माबाद जि.नांदेड येथिल पुर्णाकृती पुतळ्याकडे सत्ताधाऱ्यांकडून मोठे दूर्लक्ष होत आहे. पुतळ्याची दोन्ही हात तुटलेल्या अवस्थेत असून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नायगांव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर व राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांसह आज येथे आले होते. प्रारंभी सरदार पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर, पुतळा दुरावस्थेबाबतची माहिती स्थानिक रहिवाशांकडून घेण्यात आली.त्यावर आक्रमकपणे भूमिका मांडून या पुतळ्याची दुरावस्था नव्हे तर,विटंबना असून येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून याबाबत दखल घ्याव...
Ajit Dada Pawar : उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांची खतगावकर कुटुंबीयांची सांत्वन पर भेट

Ajit Dada Pawar : उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांची खतगावकर कुटुंबीयांची सांत्वन पर भेट

नांदेड, राजकीय
नांदेड| स्व.सौ.स्नेहलता भास्करराव पाटील खतगावकर यांचे दिनांक १ रोजी दुःखद निधन झाले. ही घटना समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांनी खतगावकर साहेबांसह समस्त खतगावकर कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली. राष्ट्रवादी काँगेस पार्टी आणि पवार कुटुंबीय खतगावकर कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत खतगावकर कुटुंबास या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशा भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर,आमदार विक्रम काळे,आमदार सतीश चव्हाण,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे,माजी आमदार अविनाशराव घाटे, सरजितसिंग गिल,व्यंकटराव पाटील गोजेगावकर,प्रवीण पाटील चिखलीकर,दीपक पावडे,डॉ.विक्रम देशमुख तळेगावकर,भास्कर भिलवंडे,राजू गंदीगुडे,साबीर चाऊस,अँड.जमीर पठाण,मोहसीन खान पठाण, डॉ.विक्रम देशमुख,राहुल हंबर्डे,जोगिंदरसिंग ख...
Shrijaya Chavan ; स्वाधार योजनेतील डिसेंबरपूर्वीच्या अर्जदारांना जुन्या निकषांनुसार लाभ द्या!: आ. श्रीजया चव्हाण

Shrijaya Chavan ; स्वाधार योजनेतील डिसेंबरपूर्वीच्या अर्जदारांना जुन्या निकषांनुसार लाभ द्या!: आ. श्रीजया चव्हाण

नांदेड, राजकीय
नांदेड l अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या निकषांमध्ये डिसेंबर २०२४ मध्ये वयोमर्यादेची अट समाविष्ट करण्यात आली आहे. मात्र, चालू शैक्षणिक वर्षात डिसेंबरपूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना जुन्या निकषांनुसार लाभ देण्याची मागणी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये सामाजिक न्याय विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयान्वये स्वाधार योजनेच्या निकषांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. यामध्ये ३० वर्षांच्या वयोमर्यादेचा समावेश आहे. परंतु, या शासन निर्णयापूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज केले होते. हा शासन निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होत नसल्याने, चालू शैक्षणिक वर्षात विहित मुदतीत अर्ज करणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौ...
Ashokrao Chavan ; किनवट न्यायालयासाठी ९५ लाखांचा निधी मंजूर करावा खा. अशोकराव चव्हाण यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

Ashokrao Chavan ; किनवट न्यायालयासाठी ९५ लाखांचा निधी मंजूर करावा खा. अशोकराव चव्हाण यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

नांदेड, राजकीय
नांदेड l किनवट न्यायालयाच्या न्यायालयीन कक्ष उभारणीसाठी ९५ लाखांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करावा, अशी ठोस मागणी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली आहे. या मागणीमुळे न्यायालयीन कर्मचारी, वकील व पक्षकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत निधी मंजूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. किनवट येथील न्यायालयाची विद्यमान इमारत निजामकालीन काळातील असून ती आता जीर्णावस्थेला पोहोचली आहे. इमारतीची मोडकळीस आलेली अवस्था पाहता सध्याचे न्यायालयीन कामकाज सुरक्षिततेच्या दृष्टीनं अडचणीचे ठरत होते. परिणामी जिल्हा सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्या कक्षांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. सध्या न्यायालयीन कामकाज किनवट नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मंगलकार्यालयात...
Gopal Khaparde : भाजपा सोशल मीडिया तालुका प्रमुख पदी गोपाल खापर्डे यांची निवड

Gopal Khaparde : भाजपा सोशल मीडिया तालुका प्रमुख पदी गोपाल खापर्डे यांची निवड

राजकीय, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात मंगळवार दि. ५ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के यांच्या अध्यक्षतेत व जिल्हा सरचिटणीस संदीप केंद्रे, शहराध्यक्ष सागर महामुने, यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपची संघटनात्मक बैठक पार पडली.या बैठकीत गोपाल खापर्डे यांची भाजपा सोशल मीडियाच्या तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. तांत्रिक कौशल्य, संघटन क्षमता आणि पक्षनिष्ठेचा उचित सन्मान या बाबींचा विचार करून आपल्यावर सोशल मीडिया प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली, असे गौरोद्गगार शहराध्यक्ष गोपू महामुने यांनी काढले. जिल्हा सरचिटणीस संदीप केंद्रे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिल्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खापर्डे यांचा सत्कार केला. युवा मोर्चाचे प्रदेश सचिव संदीप राठोड, अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष फिरोज पठाण उपाख्य बाबुभाई, माजी ...
Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा

Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवार 6 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथुन विमानाने दुपारी 1.20 वा. श्री गुरू गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. त्यानंतर मोटारीने प्रयाण. दुपारी 1.30 वा. माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर यांचे निवासस्थान साई निवास महात्मा फुले हायस्कुलजवळ यशवंत कॉलेजरोड बाबानगर नांदेड येथे आगमन. दुपारी 1.30 वा. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालिका कै. सौ. स्नेहलता भास्करराव पाटील खतगावकर यांच्या दु:खद निधनानिमित्त सात्वंनपर भेट. त्यानंतर दुपारी 2.25 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. दुपारी 2.30 वा. हेलिकॉप्टरने बीडकडे प्रयाण करतील....
local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवीन प्रभाग रचनेला सर्वोच्च न्यायालयाचा दुजोरा

local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवीन प्रभाग रचनेला सर्वोच्च न्यायालयाचा दुजोरा

मुंबई, नांदेड, राजकीय
नांदेड | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी राज्य सरकारने अलीकडेच नवीन प्रभाग रचनेचे आदेश निर्गमित केले होते. या आदेशाला हरकत घेऊन काही याचिकाकर्त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्या याचिकेला नकार दिला असून, नवीन प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणानुसारच महापालिका निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, राज्यातील विविध महापालिकांमध्ये लवकरच निवडणुकीची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजासाठी आरक्षण कायम ठेवत नवीन प्रभाग रचना लागू करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता मिळाल्यामुळे, निवडणूक आयोग आता निवडणुकीच्या कार्यक्रमाकडे पुढे सरकणार आहे. महत्वाचे मुद्दे: सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका फेटाळली, नवीन प्रभाग रचना व ओ...
error: Content is protected !!