Tuesday, May 19

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Dcm Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी भेट

Dcm Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी भेट

नांदेड, राजकीय
नांदेड | जेष्ठ नेते मा.खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या भगिनी स्व.सौ.स्नेहलताताई भास्करराव पाटील खतगावकर यांचे परवा निधन झाले असता सोमवारी राजेंद्रनगर,नांदेड येथील निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांनी सांत्वन पर भेट दिली. शिवसेना आणि शिंदे कुटुंबीय खतगावकर कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत खतगावकर कुटुंबास या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशा भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार हेमंत पाटील,आमदार बालाजीराव कल्याणकर,आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार बाबुराव कोहळीकर,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे,माजी आमदार अविनाशराव घाटे, डॉ. मीनलताई निरंजन पाटील खतगावकर, सरजितसिंग गिल,आनंदराव चव्हाण,बालाजीराव खतगावकर, रवी पाटील खतगावकर,प्रवीण पाटील चिखलीकर,दी...
Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व हिंगोलीकडे प्रस्थान

Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व हिंगोलीकडे प्रस्थान

नांदेड, राजकीय, हिंगोली
नांदेड,अनिल मादसवार | राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी नांदेड विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी हिंगोली येथे आयोजित कावड यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रस्थान केले. हा दौरा आमदार संतोष बांगर यांच्या निमंत्रणावरून आयोजित करण्यात आला होता. दुपारी सुमारे ४:१५ वाजता, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टरमार्फत नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. आगमनानंतर काही वेळातच त्यांनी मोटारीने...
Nanded ; भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा नांदेड दक्षिण तालुकाध्यक्षपदी दत्ता जाधव वांगीकर यांची नियुक्ती..

Nanded ; भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा नांदेड दक्षिण तालुकाध्यक्षपदी दत्ता जाधव वांगीकर यांची नियुक्ती..

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l भारतीय जनता पार्टी ग्रामीण नांदेड दक्षिण युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पदी दत्ता गोविंदराव पाटील जाधव वांगीकर यांची नियुक्ती दक्षिण अध्यक्ष विश्वाभंर पाटील शिंदे यांनी एका नियुक्ती पत्राव्दारे केली आहे. नांदेड दक्षिण तालुक्यातील वांगी या गावाचे ते युवक सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे भाजपा पक्षात व सामाजिक, राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर राहुन व ,13 ते 14 वर्षांपासून आजपर्यंत ते पुरोगामी चळवळी मध्ये काम करतात मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड ह्या संघटनेत त्यांनी काम केले आहे आज ते पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी सुद्धा काम करत आहे,त्यांनी जिल्हायात वेळोवेळी शेतकऱ्यांना ,विध्यार्थ्यांना गरजू रुग्णांना त्यांचे काम करून मदत केली आहे,आज घडीला ते वांगी ता नांदेड येथील सरपंच पदावर विराजमान आहेत जिल्हाभरात त्यांची ओळख युवा सरपंच म्हणून आ...
Grand inauguration : हिमायतनगरचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा भव्य शुभारंभ

Grand inauguration : हिमायतनगरचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा भव्य शुभारंभ

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ आज माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली असून, नागरिकांच्या सेवेसाठी हे कार्यालय कार्यरत राहील अशी माहिती प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांनी यावेळी दिली. त्यांच्या या जनसंपर्क कार्यालयाचा फायदा जनसेवेसाठी होईल अशी अपेक्षा माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जी.प.सदस्य समद खान, सुभाष राठोड, गणेश शिंदे, गजानन सूर्यवंशी, फेरोज खान पठाण, संजय माने, मायंबा होळकर, राजू झरेवाड, आदींसह कार्यक्रमात स्थानिक कार्यकर्ते, जनप्रतिनिधी आणि नागरिक, काँग्रेस सह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित होऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख...
A. Bodhakar ; चिमुकल्यांचा उपस्थित आ.बोढाकर यांनी केला वाढदिवस साजरा

A. Bodhakar ; चिमुकल्यांचा उपस्थित आ.बोढाकर यांनी केला वाढदिवस साजरा

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांच्या वाढदिवस जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वसरणी येथे जवळपास 550 विध्यार्थी यांच्या उपस्थितीत आयोजक शिवसेना शहरप्रमुख सुहास पाटील खराणे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करून व केक कापून लहान विध्यार्थी समवेत साजरा करण्यात आला. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोढांरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे सिडको शहरप्रमुख सुहास पाटील खराणे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसरणी येथे 2ऑगस्ट‌ रोजी विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे,शहरप्रमुख तुलजेश यादव,तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे,अशोक मोरे,सेवानिवृत्त अधिकारी विश्वनाथ जटाळे, मुख्याध्यापक अगंद जाधव, युवासेना जिल्हा...
Bodharkar ; जिल्हा परिषदेचा शाळेत दर्जेदार शिक्षण, आ.बोढारकर

Bodharkar ; जिल्हा परिषदेचा शाळेत दर्जेदार शिक्षण, आ.बोढारकर

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l जिल्हा परिषदेच्या शाळेत आजही दर्जेदार शिक्षण मिळत असुन राज्य स्तरावर या शाळेतील शिष्यवृत्ती मध्ये मिळविलेले यश हे नेत्रदिपक असल्याचे प्रतिपादन आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी केले. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 2 ऑगस्ट रोजी शिवसेना शिंदे गटाचे सिडको शहरप्रमुख सुहास पाटील खराणे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसरणी येथे विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे, शहरप्रमुख तुलजेश यादव,तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, तालुका प्रमुख अशोक मोरे,सेवानिवृत्त अधिकारी विश्वनाथ जटाळे, मुख्याध्यापक जाधव,युवासेना जिल्हा प्रमुख अमोद साबळे ,पोलीस पाटील लवकुश अवनुरे, केंद्रप्रमुख यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. ...
Hanegaon ; हाणेगाव ते देगलूर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पदयात्रा

Hanegaon ; हाणेगाव ते देगलूर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पदयात्रा

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले|  देगलूर तालुक्यातील मौजे हाणेगाव ते देगलूर येथुन शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व इतर मागण्यासाठी ४ आगस्ट रोजी पदयात्रा चे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यांनी केले. उपजिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निघणाऱ्या मोर्चा चे मागणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पदयात्रा वॄधपकाळाना पेन्शन योजना जाहीर करावे शेतकर्यांना तत्काळ २०१४ चा पिक विमा वाटप करण्यात यावा जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठायाचे काम त्वरीत पूर्ण करण्यात यावा. देगलूर हाणेगाव देगलूर मानूर देगलूर मूक्रामबाद आदी रस्ता चे काम तत्काळ सुरु करावे. निराधार वॄधपकाळाना योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात यावे दारिद्र्य रेषेची अथवा २१००० रुपये उत्पन्नाच्या प्रमाण पञाची जाचक अट रद्द करण्यात यावे हाणेगाव येथे राष्ट्रीय बॅक चालू करण्यात य...
Mp Ashok Chavhan : विरोधी पक्षांचा भारतीय सैन्यापेक्षा ट्रम्पवर अधिक विश्वास – खा. अशोक चव्हाण यांचा हल्लाबोल

Mp Ashok Chavhan : विरोधी पक्षांचा भारतीय सैन्यापेक्षा ट्रम्पवर अधिक विश्वास – खा. अशोक चव्हाण यांचा हल्लाबोल

नांदेड, राजकीय
नांदेड| ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला विनंती केल्यामुळे दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष थांबला, ही वस्तुस्थिती भारतीय सैन्याने स्पष्ट केली आहे. मात्र, विरोधी पक्षांचा भारतीय सैन्यापेक्षा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अधिक विश्वास असल्याचे दिसते. राजकीय विरोधामुळे विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे ऐकण्यास तयार नाहीत. त्यांनी किमान भारतीय सैन्यावर तरी विश्वास ठेवावा, अशा बोचऱ्या शब्दांत खा. अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, भारतीय सैन्याने अचूक कारवाई करत दहशतवाद्यांची तळे आणि पाकिस्तानची लष्करी ठिकाणे उद्ध्वस्त केली. ‘ब्रह्मोस’सारखे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित क्षेपणास्त्र गेमचेंजर ठरले. भारताच्या हवाई स...
Prataprao Patil Chikhlikar prayed : जिल्ह्यात शांतता व बंधुत्व वृद्धिगत व्हावे : प्रतापराव पाटिल चिखलीकर यांनी केली प्रार्थना

Prataprao Patil Chikhlikar prayed : जिल्ह्यात शांतता व बंधुत्व वृद्धिगत व्हावे : प्रतापराव पाटिल चिखलीकर यांनी केली प्रार्थना

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील जनता सुखी समृद्धिगत व्हावी. जनतेत मित्रता, बंधुत्व आणी एकता नांदावी सदैव शांतता प्रस्थापित व्हावी. अशी प्रार्थना लोहा-कंधारचे आमदार मा. प्रतापराव पाटिल चिखलीकर यांनी शुक्रवारी सकाळी येथील गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहेब येथे केली. प्रतापराव पाटिल चिखलीकर हे वाढदिवसाच्या औचित्याने सरदार जगबीरसिंघ शाहू यांच्या तर्फे गुरुद्वारात ठेवण्यात आलेल्या श्री अखंडपाठचे दर्शन घेण्यासाठी गुरुद्वारात आले होते. शनिवारी त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे. गुरुद्वारात सकाळी या पाठाचे समापन व अरदास पार पडणार आहे. श्री चिखलीकर यांनी गुरुद्वारात दर्शन घेतले व त्यांचा सीरेपाव देऊन सत्कार करण्यात आला. नंतर त्यांनी भाई दयासिंघजी भाई धरमसिंघजी यांच्या अंगीठासाहेबचे दर्शन घेतले. तसेच माता भागकौर जी यांच्या तपस्थानचे ही दर्शन घेतले. आमदार प्रतापराव पाटिल चिखलीकर यांनी दर्शन घेतल्या नंतर आप...
Dr. Ajit gopcchade : भगवा आतंकवाद हा निगेटिव्ह निरेटिव्ह : खा.डॉ. गोपछडेनी न्यायालयाच्या निर्णयाचे केले स्वागत

Dr. Ajit gopcchade : भगवा आतंकवाद हा निगेटिव्ह निरेटिव्ह : खा.डॉ. गोपछडेनी न्यायालयाच्या निर्णयाचे केले स्वागत

नांदेड, राजकीय
नांदेड| मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्वच आरोपींची माननीय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे . न्यायालयाच्या या निकालाची आम्ही स्वागत करतो . या निकालाने भगवा आतंकवाद निगेटिव्ह नेरेटीव्ह होता हे सिद्ध केले आहे. त्यामुळे काँग्रेस सुशील कुमार शिंदे , दिग्विजय सिंह आणि गांधी घराण्याला हा निर्णय मोठी चपराक असल्याचे मत खा. डॉ. अजित गोपछडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. (more…)...
error: Content is protected !!