Tuesday, May 19

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Pratap patil chikhalikar : मा.खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त विशेष कार्यवृतांन्त

Pratap patil chikhalikar : मा.खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त विशेष कार्यवृतांन्त

नांदेड, राजकीय
मा.खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त विशेष कार्यवृतांन्त सुनिल रामदासी यांनी लिहिलेला लेख... नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय मा. खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब. ज्यांना खूप दूरवरचे दिसते ते केवळ त्यांचे नेत्र निर्दोष असतात म्हणून नव्हे, तर ती दूरदृष्टी त्यांच्या हृदयात पेटलेल्या महत्त्वाकांक्षे मुळे आहे. त्यांच्या इच्छा लक्ष्याच्या प्राप्तीसाठी अविरत गतिशील असतात. त्यांचा श्वास निर्धाराला जिवंत ठेवण्यासाठी चालू असतो हृदयाच्या अस्तित्वासाठी नसतो.अशा ध्येयवादी व्यक्तिमत्त्वाचे जीवन लक्ष्य साध्यासाठीच धगधगत असते. त्यांच्या हृदयाला कान लावून ऐकायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्यातून ध्येयध्वनीचा अंतर्नाद ऐकू येऊ लागतो.अशी व्यक्तिमत्वे शब्दकोशातून " अशक्य " हा शब्द कायमचा मिटवून टाकण्यासाठी अखंड लढणारे धैर्य धुरंदर योद...
Sahebrao Gaikwad complains : महापालिकेत प्रधानमंत्री आवास योजनेत भ्रष्टाचार – साहेबराव गायकवाड यांची आयुक्तांकडे तक्रार

Sahebrao Gaikwad complains : महापालिकेत प्रधानमंत्री आवास योजनेत भ्रष्टाचार – साहेबराव गायकवाड यांची आयुक्तांकडे तक्रार

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या सल्लागार संस्थांच्या निवडीत व देयक अदा करण्यात प्रचंड भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे महानगर सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांनी केला आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात गायकवाड यांनी म्हटले आहे की, महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजनेच्या आराखडा व इतर कामासाठी दि. ४ नोव्हेंबर २०१७ रोजी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. त्यासाठी चार जणांनी निविदा भरल्या होत्या, परंतु यातील तब्बल तीन निविदा अपात्र ठरवून अकोला येथील नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्था या एकमेव एजन्सीला पात्र ठरवून दोन वर्षाच्या मुदतीसाठी काम मंजूर करण्याची शिफारस प्रशासनाने सर्वसाधारण सभेकडे केली. सर्वसाध...
Municipal Elections : राज्य निवडणूक आयुक्तांकडून महानगरपालिका निवडणुक तयारीचा आढावा

Municipal Elections : राज्य निवडणूक आयुक्तांकडून महानगरपालिका निवडणुक तयारीचा आढावा

छत्रपती संभाजीनगर, नांदेड, राजकीय
छत्रपती संभाजीनगर| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक पूर्वतयारीबाबत आज राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आढावा घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयात आज महानगरपालिका निवडणुकीबाबत विभागातील पाचही महानगरपालिका आयुक्तांशी सर्व सोईसुविधा, मतदान केंद्र, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, मतदान केंद्र, शासकीय, निमशासकीय ठिकाणे, खाजगी ठिकाणे याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका आयुक्त जी.श्रीकांत, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालनाचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जालना महानगर पालिका आयुक्त संतोष खांडेकर, नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे, परभणी महानगरपालिका आयुक्त महेश जाधव, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, लातूर महानगर...
Congress : प्रा.यशपाल भिंगे यांना काँग्रेसतर्फे उपाध्यक्ष पद तर उत्तर जिल्हा अध्यक्षपदी राजेश पावडेंची वर्णी

Congress : प्रा.यशपाल भिंगे यांना काँग्रेसतर्फे उपाध्यक्ष पद तर उत्तर जिल्हा अध्यक्षपदी राजेश पावडेंची वर्णी

नांदेड, राजकीय
नांदेड| अ.भा. काँग्रेस कमिटी नवी दिल्ली हायकमांडने काल रात्री उशिरा महाराष्ट्र काँग्रेस कमिटी पदाधिकारी आणि कांही शहरी व ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांची नियुक्ती घोषित केली आहे. त्यात उपाध्यक्षपदी प्रा.यशपाल भिंगे यांना नियुक्त केले तर सरचिटणीस पदी श्रीमती रेखा दत्तात्रय चव्हाण पाटील, डॉ दिनेश निखाते, सुरेंद्र घोडजकर आणि डॉ श्रावण रॅपनवाड यांच्या नावाची घोषणा केली.उत्तर जिल्हाध्यक्ष रिक्त पदावर राजेश पावडे यांना स्थानापन्न करण्यात आले आहे. ब-याच वर्षांपासून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वगळता इतर महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या प्रलंबित होत्या.त्या कालच्या आल इंडिया काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी घोषणेमुळे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.या घोषणेत वरिष्ठ उपाध्यक्ष -१६, उपाध्यक्ष -३८, वरिष्ठ प्रवक्ता-५,जनरल सेक्रेटरी -१०८, सेक्रेटरी -९५, कार्यकारी समिती सदस्य -८७ तर राजकीय व...
Ramdas Patil : रामदास पाटील यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती

Ramdas Patil : रामदास पाटील यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती

राजकीय, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| समाजाचे आणि जनतेच्या सेवेत सामावून घेऊन गोरगरिबांच्या अडीअडचणीच हिरिरीने भाग घेवून अडचणी दूर करण्यासाठी मोलाचा वाटा उचलणारे रामदास पाटील सुमटानकर यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे स्थेचया माध्यमातून राज्यामध्ये राबविलेले विविध सामाजिक उपक्रम कार्यक्रम समारंभ यातील सहभाग आणि दिलेल्या उलेखनीय योगदान सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे. निछितच सर्व समाज बधु भगिनी युवकच्या साठी प्रेरणादायी केल्याने रामदास पाटील सुमटानकर यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे प्रदेश कार्यकारी समितीच्या कार्याध्यक्ष पदावर २६ जुलै २०२६ आशा एका वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे...
Bhimrao Keram ; आ.भीमराव केराम यांच्या पाठपुराव्याला यश

Bhimrao Keram ; आ.भीमराव केराम यांच्या पाठपुराव्याला यश

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे l मागासवर्गीय मुला मुलींच्या निवासी शासकीय वसतिगृहासाठी किनवट विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून 100 विद्यार्थी क्षमतेच्या 2 शासकीय वस्तीगृहाला मंजुरी दिल्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.संजय शिरसाट यांचे पत्र आ. केराम यांना प्राप्त झाले आहे.या वस्तीग्रहामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा निवासी शिक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याने पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. किनवट तालुका हा मागास दुर्गम असून येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. परंतु त्यांच्यासाठी वस्तीगृहाची सोय नसल्यामुळे प्रचंड शैक्षणिक गैरसोय होत होती. वस्तीगृहाअभावी खेड्यापाड्यातील हजारो मागासवर्गीय विद्यार्थी शहराच्या ठिकाणी किरायाची खोली घेऊन अथवा ये जा करून शिक्षण घेतात.या संदर्भात आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे मुख्यमंत...
Vadepuri ; वडेपुरी येथील माता रत्नेश्वरी मंदिरात महाअभिषेक व महाप्रसादाचे आयोजन

Vadepuri ; वडेपुरी येथील माता रत्नेश्वरी मंदिरात महाअभिषेक व महाप्रसादाचे आयोजन

नांदेड, राजकीय
उस्माननगर l आ. प्रतापराव पाटील चिखलीकर व युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वडेपुरी येथील माता रत्नेश्वरी मंदिरात महाअभिषेक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. वडेपुरी येथील माता रत्नेश्वरी मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन व्हॉइस चेअरमन सेवा सहकारी सोसायटी जोशी सांगवीचे रामदास तांबोळी यांनी केले असून, यावेळी मा. जि प सदस्या सौ.प्रणिता ताई देवरे चिखलिकर ,एडवोकेट संदीप पाटील चिखलीकर, मा. सरपंच चिखली सचिन पाटील चिखलीकर, मा. सभापती आनंद पाटिल शिंदे ढाकणीकर, मा.सभापती शंकर पाटील ढगे ,मा. उपसभापती लक्ष्मण पाटील बोडके, कंधार -लोह्यातील यातील सर्व पदाधिकारी सरपंच ,उपसरपंच ,चेअरमन ,व्हाईस चेअरमन ,ग्रामपंचायत सदस्य ,सर्व पदाधिकारी यांची उपस्थिति राहणार आहे. दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजता...
IIPA : आयआयपीएच्या नांदेड शाखेची निवडणूक संपन्न

IIPA : आयआयपीएच्या नांदेड शाखेची निवडणूक संपन्न

नांदेड, राजकीय
नांदेड| इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन नवी दिल्ली (आयआयपीए) ही भारत सरकारच्या कर्मचारी, लोकतक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालयाअंतर्गत लोकप्रशासन विकास, प्रशिक्षण, संशोधन व प्रशासकीय सुधारणा या महत्वपूर्ण क्षेत्रात कार्य करणारी एक मूलभूत संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे. केंद्र शासनाच्या भारतीय लोकप्रशासन संस्था ( आय.आय.पी. ए.) नवी दिल्ली यांच्याकड़ून नांदेड येथे स्थानिक शाखेला स्थापन्यास मान्यता प्राप्त झाले असल्याची माहिती आयआयपीए नांदेड शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिली आहे. या महत्वपूर्ण संस्थेच्या इतर पदाधिकारी यांची निवड करण्यासाठी नांदेड स्थानिक शाखेची सर्वसाधारण सभा व निवडणूक प्रक्रीया नुकतीच संपन्न झाली आहे. आयआयपीए नांदेड संस्थेच्या शाखा उपाध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची तर सचिवपदी देगलूर म...
Hemant Patil ; सिडको शिवसेना बालेकिल्ला पुन्हा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील, आ.हेमंत पाटील

Hemant Patil ; सिडको शिवसेना बालेकिल्ला पुन्हा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील, आ.हेमंत पाटील

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l सिडको शिवसेनेच्या बालेकिल्ला पुन्हा अबाधित राहील यासाठी शिवसैनिकांना आगामी मनपाच्या निवडणूक निमित्ताने शिवसैनिक व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करून दोन्ही प्रभागातील एक समिती करून नऊही जागा निवडणूक निमित्ताने लढविण्याची तयारी ठेवावी युती असो किंवा नसो तयारी लागा असे आवाहन शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी सिडको येथे आयोजित बैठकीत केले. आगामी नांदेड मनपा निवडणूक निमित्ताने सिडको येथील धुत बँकेट हॉल येथे 28 जुलै रोजी आयोजित पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यी बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी आमदार आनंदराव पाटील बोढारकर, दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे,माजी नगरसेवक,बाळासाहेब देशमुख, राजेंद्र कुलथे,सिडको शहरप्रमुख सुहास पाटील खराणे,ओबीसी जिल्हा प्रमुख अनिल पाटील धमणे,महिला आघाडीच्या स्मिता कुलकर्णी ,गजानन राजरवार,यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे दक...
A. Prataprao Patil Chikhlikar’ ; आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडमध्ये भव्य कवी संमेलन : आयोजक माधव पावडे यांची माहिती

A. Prataprao Patil Chikhlikar’ ; आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडमध्ये भव्य कवी संमेलन : आयोजक माधव पावडे यांची माहिती

नांदेड, राजकीय
नांदेड l लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता शंकराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे महाराष्ट्रातील नामांकित कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती कवी संमेलनाचे आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष माधव पावडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि लोकसंपर्कामुळे नांदेड जिल्ह्यातील लोकनेते म्हणून सुपरिचित असणाऱ्या आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस याही वर्षी विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष माधव पावडे यांच्या पुढाकारातून यावर्षी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील नामांकित कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात ...
error: Content is protected !!