Tuesday, May 19

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Hadgaon ; रिपब्लिकन सेना ची हदगाव तालुका कार्यकारणी जाहीर

Hadgaon ; रिपब्लिकन सेना ची हदगाव तालुका कार्यकारणी जाहीर

नांदेड, राजकीय
हदगांव, शेख चांदपाशा| रोजी रिपब्लिकन सेनाचा पक्षप्रवेश सोहळा हदगाव येथे शासकीय विश्रामगृह येथे पार पडला या पक्षामध्ये मा. सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून रिपब्लिकन सेनेत तालुक्यातील अनेकांचा पक्षप्रवेश झाला तर हदगाव तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. हदगाव तालुका अध्यक्षपदी महेंद्र भाऊ धोंगडे, युवा तालुका अध्यक्षपदी राष्ट्रदीप वाढवे, महिला तालुका अध्यक्षपदी अॅड स्वरूपाताई चौरे, तालुका उपाध्यक्षपदी लक्ष्मण जमदाडे, तालुका महासचिव अडवोकेट अतुल चौरे, तालुका विधी सल्लागार अध्यक्ष एडवोकेट सदानंद भाऊ गजभारे, सदस्य दयानंद पाईकराव, पिंटू पाईकराव यांची निवड रिपब्लिकन सेना नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील सोनसळे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. आज रोजी हदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन सेना हदगाव तालुका नवयुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र रिपब्लिकन ...
Chakkajam : कर्ज माफी व सातबारा कोरा हवा.. प्रहार जनशक्ती पक्षाचा चक्काजाम आंदोलन

Chakkajam : कर्ज माफी व सातबारा कोरा हवा.. प्रहार जनशक्ती पक्षाचा चक्काजाम आंदोलन

नांदेड, राजकीय
हदगाव, शेख चांदपाशा| प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी दिव्यांग राज्यमंत्री व माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर “सातबारा कोरा”कर्जमाफी करिता चक्काजाम आंदोलन करण्यात आल आहे. त्याच्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हदगाव पोलिस स्टेशनमध्ये निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनाचा मुख्य उद्देश शेतकरी, मजूर, दिव्यांग, अपंग, निराधार, मेंढपाळ, मच्छीमार आदी समाजघटकां च्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणे हा आहे. या आंदोलनासाठी सर्व समाज, धर्म, जाती-पंथ, पक्ष या सगळ्या सीमा ओलांडून एकत्र यावे. असे आवाहन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. सरकारच्या निष्क्रिय धोरणामुळे शेतकऱ्यांचे जीवन संकटात सापडले असून, ‘सातबारा कोरा’ करणे गरजचे आहे. मात्र शासन कर्जमाफी करण्यात चालढकल करत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही ठोस मदत म...
fish market : नांदेड जिल्ह्यात मासळी मार्केट व लँडिंग सेंटर्स उभारण्याची मागणी

fish market : नांदेड जिल्ह्यात मासळी मार्केट व लँडिंग सेंटर्स उभारण्याची मागणी

नांदेड, राजकीय
नांदेड| प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आधुनिक एकीकृत मासळी लँडिंग सेंटर्स तसेच मासळी मार्केट उभारण्याची मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय पशूसंवर्धन, दुग्धविकास व पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंग यांच्याकडे केली आहे. भाजपचे लोहा तालुकाध्यक्ष अॅड. चंद्रसेन पाटील यांनी नुकतीच खा. अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन नांदेड जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाच्या अनुषंगाने अनेक मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी खा. चव्हाण यांनी आज राजीव रंजन सिंग यांच्या संसद भवनातील कार्यालयात त्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भोकर तालुक्यातील रेणापूर येथील सुधा नदी परिसर, लोहा तालुक्यातील माळेगाव येथील मन्याड नदी परिसर तसेच नांदेड येथील गोदावरी नदी परिसरात मोठ्या प्रमाणात मत्स्य उत्पादन होते. परंतु, या ठिकाणी मासळी लँडिंग सेंटर उपलब्ध नाही. त्यामु...
Shiv Sena : शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद बाधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले; लेखी आश्वासने घेतले माघार

Shiv Sena : शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद बाधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले; लेखी आश्वासने घेतले माघार

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर पाठवले| येथील जिल्हा परिषद बाधकाम विभागात काम करण्यासाठी १९ अधिकार याची नियुक्ती असताना केवळ दोन तीन कर्मचाऱ्यावर कार्यालय चालत होते. उध्वव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने कर्मचारी उपस्थित राहात नसल्याने बाधकाम विभागाला लेखी निवेदन देऊन ठाळे ठोकण्यात आले. कार्यकारी अभियंता विजय कांबळे यांनी सर्व कर्मचारी उपस्थित राहतील असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. देगलूर बाधकाम विभागाचे कर्मचारी उंटावर बसून शेळया हाकल्यासारखे नांदेडच्या कार्यालयात बसून नोकरी करतात. सर्वाचे उपस्थिती पट देखील नांदेडलाच हलविण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषद बाधकाम विभाग देगलूर अंतर्गत येणाऱ्या देगलूर, बिलोली, मुखेड, धर्माबाद, नायगाव या पाच तालुक्यातील जनतेची हेळसांड होत आहे. जनतेच्या प्रश्नाची दखल घेऊन बाधकाम विभागातील कार्यालयाचा कारभार सुरळीत व्हावा यासाठी शिवसेना उध्वव ठाकरे प...
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray  ; युवा उद्योजक धनराज भगीले यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ; युवा उद्योजक धनराज भगीले यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड आयोजित शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात नवीन नांदेड परिसरातील युवा उद्योजक धनराज दिलीपसिंह भगिले यांनी आपल्या समर्थकांसह प्रवेश केला . नांदेड येथे 22 जुलै रोजी लोकमान्य मंगल‌ कार्यालय नांदेड येथे नांदेड महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांच्या वतीने आयोजित या भव्य मेळाव्यास शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात,खासदार नागेश पाटील आष्टीकर,माजी आमदार अनुसया खेडकर,सहसंपर्क प्रमुख दयाल गिरी,जिल्हाप्रमुख बबनराव बारसे,जिल्हाप्रमुख भुजंग पाटील डक, जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, उपजिल्हाप्रमुख राम चव्हाण,जिल्हा समन्वयक भाऊसाहेब कदम, दक्षिण विधानसभा समन्वयक दिलीपसिंह भगीले शहरप्रमुख आनंदराव जाधव,अर्जुन ठाकूर,सिडको शहर प्रमुख जित्तूसिंह टाक,नांदेड दक्षिणचे शहर महानगर प्रमुख मनोज यादव,उपजिल्हाप्रमुख...
Blood donation camp : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त तमलुर येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

Blood donation camp : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त तमलुर येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील मौजे तमलुर येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पक्ष तमलुरच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर पार पाडले. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, गरजू लोकांना जीवन जगण्याची बळ रक्तदानापासूनच मिळते. या शिबीरात तमलुर शहापूर खानापूर परिसरातील लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते शकती प्रमुख बुथ प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर, देगलूर बाजार समितीचे उपसभापती रवींद्र पाटील, अशोक डुकरे, मोहन पाटील, सजीव पांचाळ, तुकाराम कोकणे, संजय पोकरणे, श्रीकांत कोपले, विजय गूते, रामलिंग स्वामीयांची उपस्थिती होती. रक्तदान शिबिराचे उत्तम नियोजन भाजपाचे तालुका संयोजक व ग्रामपंचायत सदस्य शिवराज हाडे यांनी केले....
MLA. Prataprao Chikhalikar : हरिहररावांच्या पश्वात प्रतापराव धावले भोसीकर कुटुंबियांच्या मद‌तीला: चिरंजीव शिवकुमार यांची बँकेत इन्ट्री”

MLA. Prataprao Chikhalikar : हरिहररावांच्या पश्वात प्रतापराव धावले भोसीकर कुटुंबियांच्या मद‌तीला: चिरंजीव शिवकुमार यांची बँकेत इन्ट्री”

नांदेड, राजकीय
लोहा| निखळ राजकारण करणारे फार कमी नेते असतात. विरोध निवडणूकीपुरता तात्विक मानतात. राजकीय टोकाचा विरोध दैनंदिन जीवनात अडसर होऊ नये. याची अनेक नेते काळजी घेत असतात. जिल्ह्यात असे मोजके राजकीय नेते आहेत. मन्याङ गोदा भूमीत चिखलीकर-भोसीकर ही जोडगोळीने गेली ३५-४० वर्ष जिल्ह्याचे राजकारण गाजविले. दुर्घकाळ काँग्रेसमध्ये राहिले पण कधी एकत्रित तर कधी अंतर्विरोधी होते. त्यानंतर एकमेकांचे राजकीय विरोधक राहिले. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांचे मे महिण्यात निधन झाले. त्याच्या पश्चात मित्राच्या कुटुंबियांच्या मदतीला प्रतापराव धावले . हरिहररावांचे विरंजीव शिवकुमार यांची जिल्हा बँकेच्या संचालक पदी बिननिवड झाली.हा क्षण भोसीकर कुटुंबासाठी एका डोळ्यात दुःख अन दुसऱ्यात आनंद होता. यासाठी प्रतापरांवाचा पुढाकार होता.चिरंजीव शिवकुमार यांची जिल्हा बँकेच्या राजकारणात इन्ट्री करून दिली. हीच श्रद्धांजली म...
Prahar activists : हिमायतनगर तालुक्यातील प्रहार कार्यकर्ते उतरले बच्चू कडूच्या समर्थनात मैदानात

Prahar activists : हिमायतनगर तालुक्यातील प्रहार कार्यकर्ते उतरले बच्चू कडूच्या समर्थनात मैदानात

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, शेमजूर, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार यांच्या न्याय्य हककच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी नुकतीच पदयात्रा काढली. तरीदेखील शासनाने कर्जमाफी केली नाही, त्यामुळे दिनांक 24 जुलै 2025 गुरुवारी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनातं हिमायतनगर तालुक्यातील प्रहारच्या कार्यकत्यांनी मैदानात येऊन गांधीगिरी संपली आता भगतसिंगगिरी सुरू झाली आहे. असे म्हणत आत्तातरी शासनाने तात्काळ मागण्या मान्य करून सलाईनवर असलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करून शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे. दरम्यान "चक्काजाम" आंदोलनामुळे दोन तास वाहतूक विसकळीत झाली होती. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी बच्चू कडू (Bacchu Kadu) आक्रमक झाले आहेत. त्यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवार दिनांक २४ रोजी ...
Chaitanyanagar-Sangvi : चैतन्यनगर-सांगवी वॉकिंग ट्रॅकला लोखंडी कुंपण आणि तरोडा कॅनाल रोडवरील लाईट सुरु करा

Chaitanyanagar-Sangvi : चैतन्यनगर-सांगवी वॉकिंग ट्रॅकला लोखंडी कुंपण आणि तरोडा कॅनाल रोडवरील लाईट सुरु करा

नाशिक, राजकीय
नांदेड| नागरिकांच्या सुरक्षितता व सुविधा लक्षात घेता एक महत्त्वाचा प्रस्ताव माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केला आहे. दोन मुख्य मुद्द्यांचा समावेश असलेल्या या प्रस्तावामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे: चैतन्यनगर – शिवमंदिर ते सांगवी दरम्यानच्या वॉकिंग ट्रॅकला लोखंडी कुंपण आणि तरोडा (बु.), तरोडा (खु.) व सांगवी येथील कॅनाल रोडवरील लाईट सुरू करण्यात व्यावेत अशी मागणी माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी केली आहे. चैतन्यनगर – शिवमंदिर ते सांगवी दरम्यानच्या वॉकिंग वॉकिंग ट्रॅकवर लावलेली झाडे काही अज्ञात व्यक्तींनी तोडल्याचे व गैरवापर केल्याचे निदर्शनास आले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रॅकच्या बाजूंने लोखंडी जाळीचे कुंपण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे या परिसराचे सौंदर्य टिकून राहील तसेच सकाळी चालायला येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता व सु...
J. P. Nadda : केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे सिव्हिल हॉस्पिटलचा विस्तार व सुपर स्पेशालिटी सुविधांची मागणी

J. P. Nadda : केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे सिव्हिल हॉस्पिटलचा विस्तार व सुपर स्पेशालिटी सुविधांची मागणी

नांदेड, राजकीय
नांदेड| मराठवाड्याच्या आरोग्य सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या नांदेड सिव्हिल हॉस्पिटलच्या विस्तारी करणासाठी आणि आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्र सरकारकडे ठोस मागणी सादर केली आहे. देशाचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. जे. पी. नड्डा यांची नुकतीच दिल्लीत भेट घेऊन, त्यांनी नांदेडच्या आरोग्य विषयक गरजांविषयी सविस्तर चर्चा केली. नांदेड जिल्ह्यातील आणि आसपासच्या भागातील लाखो नागरिक आरोग्य सेवेसाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयावर अवलंबून आहेत. सध्याचा ३०० बेडचा रुग्णालयाचा तांत्रिक व भौतिक विस्तार होऊन तो ५०० बेडपर्यंत करण्यात यावा, अशी मागणी डॉ. गोपछडे यांनी केली. नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी होणे आवश्यक आहे. हृदय, मेंदू, मूत्र, यकृत, अस्थी अशा विविध गंभीर आजारांवर नांदेडमध्ये उपचार मिळावे यासाठी सुपर ...
error: Content is protected !!