Tuesday, May 19

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Blood donation : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लापूर येथे रक्तदान शिबिर

Blood donation : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लापूर येथे रक्तदान शिबिर

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान संकल्प समाज उपयोगी अभियान भाजपाच्या वतीने जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबविले जात असताना किनवटचे आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट शहरात आणि इस्लापूर येथील साई मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर राबवण्यात आले. भाजपा किनवट तालुका दक्षिण विभागाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरंडकर यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन साई मंगल कार्यालय इस्लापूर येथे केले असता या रक्तदान शिबिराला भाजपाचे ओबीसी चे जिल्हाध्यक्ष व माजी विधानसभा प्रमुख बाबुराव केंद्रे. पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड, भाजपा अनुसूचित जमाती आदिवासी सेलचे अध्यक्ष गोविंद अंकुरवाड,भाजपा युवा जिल्हा सरचिटणीस स्वप्निल गरडे, भाजपाचे श्रीरंग पवार, भाजपा अनुसूचित जातीचे जिल्हा सरचिटणीस रवी कसबे, जिल्हा उपाध्यक्ष विवेक केंद्रे कृषी उत्पन्न बाजार...
Chakkajam movement : चलो मांडवी, चलो मांडवी, चलो मांडवी, शेतकरी व दिव्यांगाचे चक्काजाम आंदोलन

Chakkajam movement : चलो मांडवी, चलो मांडवी, चलो मांडवी, शेतकरी व दिव्यांगाचे चक्काजाम आंदोलन

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| महाराष्ट्र शासनाने शेतकरी कर्जमाफीवर कोणतेच ठोस पावले उचलली नाही. या करीता मा‌.बच्चुभाऊ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात 7/12 कोरा व दिव्यांगाना 6000 मानधन व ईतर मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व दिव्यांग व शेतकरी, शेतमजूर, मेंडपाळ, मच्छीमार आपणास सुचीत करण्यात येथे की आदरणीय बच्चुभाऊ कडु यांचा 7 दिवसांचा अन्नत्याग आंदोलन व 7 दिवसांचा 140 की. मी.पायदळ यात्रा करुन सुद्धा महाराष्ट्र शासनाने शेतकरी कर्जमाफीवर कोणतेच ठोस पावले उचलली नाही. त्या अनुषंगाने किनवट तालुक्यातील मांडवी येथे दिनांक 24 जुलै रोजी गुरुवारी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकरी व दिव्यांग बांधव हजर राहुन आपले मागण्या आपल्या पदरात पाडून घ्यावे. असे आवाहन भगवान मारपवार तालुकाध्यक्ष प्रहार दिव्यांग...
Nanded news : उद्धट वर्तन करणाऱ्या परप्रांतीयाला नांदेडमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा चोप

Nanded news : उद्धट वर्तन करणाऱ्या परप्रांतीयाला नांदेडमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा चोप

नांदेड, राजकीय
नांदेड| शहरात एका परप्रांतीय व्यक्तीने स्थानिकांशी उद्धट आणि आक्रमक भाषेत वागल्याचा प्रकार काल उघडकीस आला आहे. त्यानंतर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला धारेवर धरत चोप देऊन माफी मागायला लावली आहे. हा प्रकार शहरातील बसस्थानक परिसरात घडला आहे. प्राथमिक माहितीनुसार, नांदेड शहरातील बस स्थानकात असेलेल्या सुलभ शौचालय मधील परप्रांतीय व्यक्तीला मराठी माणसाला मराठीत बोला असे सुचविले असता उद्धट भाषेचं उपयोग करत ... ज्या नही बोलता क्या....? करना है करले... असे म्हणत परप्रांतीय व्यक्तीने स्थानिक नागरिकांना अपमानास्पद भाषेत उत्तर दिले. या वागणुकीची माहिती मिळताच निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी त्याला रोखून त्याच्या वर्तनाबद्दल जाब विचारला. मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष शुभम पाटील आणि कार्यकर्त्यांनी त्या परप्रांतीयाला अद्दल घडवीत प्रसाद दिला. महाराष्ट्रातील सम...
Kapil naik : आगामी जि. प. व पं.स. समितीच्या निवडणुकीच्या कामाला लागा… माजी आ. पुत्र कपिल नाईक

Kapil naik : आगामी जि. प. व पं.स. समितीच्या निवडणुकीच्या कामाला लागा… माजी आ. पुत्र कपिल नाईक

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे| येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांनी आता पासूनच बांधणी करत कामाला लागण्याचे आदेश माजी आमदार पुत्र तथा विधानसभेचे युवा नेते कपिल प्रदीप नाईक यांनी इस्लापूर येथील कार्यकर्त्याच्या बैठकी प्रसंगी बोलताना व्यक्त केले. येत्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ईस्लापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक दि. 21 जुलै रोजी पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीला अँड राहुल नाईक, सभापती शिवाजी घोगरे, नारायण मिठु, अनिल पाटील कहाळे, नंदू गायकवाड, शिवराम जाधव, जगदीश माने,भोजराज देशमुख, संतोष जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. बैठकीच्या प्रथमता दिवंगत माजी आमदार प्रदिप नाईक यांना श्रद...
Chief Minister Devendra Fadnavis : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले” – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार

Chief Minister Devendra Fadnavis : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले” – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार

मुंबई, राजकीय
मुंबई| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने विविध क्षेत्रात भरीव प्रगती केली असून, त्यांचे नेतृत्व हे राज्याच्या विकासाला गतिमान करणारे ठरल्याचे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ( Governor C. P. Radhakrishnan) यांनी काढले. विकास, पारदर्शक प्रशासन, आणि जनतेशी थेट संवाद हीच त्यांच्या यशाची त्रिसूत्री आहे, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या ‘महाराष्ट्र नायक’ या विशेष कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे हस्ते राजभवन येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची कॉफी टेबल बुकची निर्मितीची संकल्पना अभिनंदनीय असल्याचेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांन...
Hunger strike : घरकुलाचे हप्ते आणि मोफत वाळूसाठी आमरण उपोषण सुरू

Hunger strike : घरकुलाचे हप्ते आणि मोफत वाळूसाठी आमरण उपोषण सुरू

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर शहरात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुले मंजूर झालेल्या नागरिकांनी जुनी राहती घरे पाडून घरकुलांचे बांधकामे सुरु केली. शासनाचे अनुदानाचे पैसे लवकर मिळतील या अपेक्षेने अनेकांनी उधार उसनवार खासगी कर्जे घेऊन घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले परंतु घरकुलाचे संपूर्ण हप्ते अद्याप पर्यत मिळाले नाही. पहिल्या डीपीआर मधील ७६ लाभार्थ्यांना केवळ २ लाख ३० हजार रुपये मिळाले उर्वरित २० हजार रुपये आद्यप थकीत आहेत. एकूण चार डीपीआर मधील ११०३ लाभार्थ्यापैकी १०२७,लाभार्थ्यांचे ५० हजार रुपये चे हप्ते अद्याप थकीत आहेत. अनुदानाचे पैसे वेळेत न मिळाल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे सदर लाभार्थ्यांचे थकीत असलेले हप्ते तातडीने लाभार्थ्यांना देण्यात यावे अशी विनंती करूनही शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांची रक्कम मिळाली नसल्याने तसेच आनंद पाटील तूपदाळे यांनी वारंवार मा मुख्...
“Chakkajam” protest : शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी 24 रोजी सोनारी फाट्यावर “चक्काजाम” आंदोलन

“Chakkajam” protest : शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी 24 रोजी सोनारी फाट्यावर “चक्काजाम” आंदोलन

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, शेमजूर, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार यांच्या न्याय्य हककच्या मागण्यांसाठी दिनांक 24 जुलै 2025 गुरुवारी सकाळी 10 ते 12 दरम्यान राज्यव्यापी " चक्काजाम " आंदोलन करण्यांत येणार आहे. यात तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवानी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ता देशमुख यांनी केले आहे. दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, हिमायतनगर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग सोनारी फाटा येथे शांततेच्या मार्गाने चक्का जाम आंदोलन करण्यांत येणार आहे. आंदोलनाची सुरुवात सोनारी फाटा तालुका हिमायतनगर येथील राष्ट्रीय महामार्गवर होणार असून, सकाळी 10 ते 12 हे दोन तास आंदोलन चालणार आहे. आंदोलन दरम्यान शेतकरी, दिव्यांग, शेजगजुर, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार आदिसह प्रमुख शेतकरी कर्जमाफी तात्काळ जाहिर करण्यात येऊन शेकऱ्यांचा सातबारा कोरा करण...
Mp ajit gopcchade : विवाह नोंदणी वेबसाईट नियंत्रित करा : खा. डॉ. अजित गोपछडे यांची राज्यसभेत मागणी

Mp ajit gopcchade : विवाह नोंदणी वेबसाईट नियंत्रित करा : खा. डॉ. अजित गोपछडे यांची राज्यसभेत मागणी

नांदेड, मुंबई, राजकीय
नवी दिल्ली| देशात अनेक विवाह नोंदणी वेबसाईट वरून अविवाहित आणि विवाहासाठी इच्छुक असणाऱ्या संबंधितांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी विवाह नोंदणी वेबसाईट केंद्र सरकारने नियंत्रित कराव्यात अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यसभेत केली आहे. देशातील विविध भागात विविध भाषेत विवाह नोंदणी वेबसाईट मोठ्या प्रमाणात चालविल्या जातात. यामधून अविवाहित मुला मुलींसाठी स्थळ शोधून दिली जातात. परीतक्त्या , विधवा , विधुर यांच्यासाठीही विवाह जुळवून देण्यासाठी या वेबसाईटवरून अनेक अमिष आणि प्रलोभन दाखविले जातात . त्यातून मोठ्या प्रमाणात पैसा उकळला जातो . अशातच छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका व्यक्तीने देशभरातील तब्बल 500 नागरिकांना फसवल्याचा प्रकार नुकताच पुढे आला आहे. त्याने वेगवेगळ्या सहा वेबसाईट तयार करून विवाहासाठी इच्छुक असणाऱ्या मुलामुली...
Ahmadabad plane crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या कारणांवर अंतिम अहवालानंतरच प्रकाश

Ahmadabad plane crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या कारणांवर अंतिम अहवालानंतरच प्रकाश

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड| अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान अपघाताच्या नेमक्या कारणांवर अंतिम अहवालानंतरच प्रकाश पडेल, असे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू यांनी आज सांगितले. राज्यसभेत खा. अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरक प्रश्नाद्वारे अहमदाबाद-लंडन विमानाच्या अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत खा. अशोक चव्हाण यांनी प्रश्न विचारला होता. विमानाचे दोन्ही इंजिने बंद होण्यामागील नेमके कारण काय आणि त्याकरिता विमान उत्पादक कंपनी, इंजिन निर्माती कंपनी किंवा इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स भाग बसवणाऱ्या कंपनीला काही निर्देश देण्यात आले आहेत का, अशी विचारणा त्यांनी केली. यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री के. राममोहन नायडू म्हणाले की, या अपघाताचा...
Nanded ; 22 जुलै रोजी नांदेड महानगर शिवसेनेचा भव्य मेळावा

Nanded ; 22 जुलै रोजी नांदेड महानगर शिवसेनेचा भव्य मेळावा

नांदेड, राजकीय
नांदेड | शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड महानगर शिवसेनेतर्फे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. 22 जुलै 2025 दुपारी 2 वाजता. लोकमान्य मंगल कार्यालय अण्णाभाऊ साठे चौक नांदेड येथे होणार असून. या मेळाव्याचे उद्घाटन शिवसेना नेते तथा विरोधी पक्ष नेता अंबादास जी दानवे साहेब यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख बबनराव जी थोरात साहेब राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेब. माजी आमदार अनुषाताई खेडकर. धोंडू पाटील. जिल्हाप्रमुख भुजंग पाटील. बबनराव बारसे. बिडी चव्हाण. महिला आघाडीच्या वच्‍लाताई पुयड. डॉक्टर निकिता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणारा आहे. नांदेड महानगर शिवसेनेतर्फे विध...
error: Content is protected !!