HomeनांदेडChakkajam movement : चलो मांडवी, चलो मांडवी, चलो मांडवी, शेतकरी व दिव्यांगाचे...

Chakkajam movement : चलो मांडवी, चलो मांडवी, चलो मांडवी, शेतकरी व दिव्यांगाचे चक्काजाम आंदोलन

किनवट, परमेश्वर पेशवे| महाराष्ट्र शासनाने शेतकरी कर्जमाफीवर कोणतेच ठोस पावले उचलली नाही. या करीता मा‌.बच्चुभाऊ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात 7/12 कोरा व दिव्यांगाना 6000 मानधन व ईतर मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.

तालुक्यातील सर्व दिव्यांग व शेतकरी, शेतमजूर, मेंडपाळ, मच्छीमार आपणास सुचीत करण्यात येथे की आदरणीय बच्चुभाऊ कडु यांचा 7 दिवसांचा अन्नत्याग आंदोलन व 7 दिवसांचा 140 की. मी.पायदळ यात्रा करुन सुद्धा महाराष्ट्र शासनाने शेतकरी कर्जमाफीवर कोणतेच ठोस पावले उचलली नाही.

त्या अनुषंगाने किनवट तालुक्यातील मांडवी येथे दिनांक 24 जुलै रोजी गुरुवारी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकरी व दिव्यांग बांधव हजर राहुन आपले मागण्या आपल्या पदरात पाडून घ्यावे. असे आवाहन भगवान मारपवार तालुकाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना किनवट यांनी केलं आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments