Tuesday, May 19

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Prakash Rathod : तांडा समृद्धी योजना अंतर्गत तांडा विकासासाठी ५०० तांड्यांना निधी द्या – प्रकाश राठोड

Prakash Rathod : तांडा समृद्धी योजना अंतर्गत तांडा विकासासाठी ५०० तांड्यांना निधी द्या – प्रकाश राठोड

नांदेड, राजकीय
हदगांव, शेख चांदपाशा| महाराष्ट्र शासनाने राज्यातील ४ हजार तांड्यांची नोंद केली असून, बंजारा-लमाण समाजाच्या विकासासाठी “संत सेवालाल महाराज बंजारा-लमाण तांडा समृद्धी योजना” लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी ५०० तांड्यांना निवडून निधी दिला जातो. मात्र यंदा शासन निर्णयाच्या अभावामुळे योजनेंतर्गत निधी वितरण होऊ शकलेले नाही. त्यामुळे तातडीने शासन निर्णय काढून ५०० तांड्यांना निधी वितरित करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या योजनेअंतर्गत तांड्यांमध्ये मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, शुद्ध पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा व इतर गरजांची पूर्तता करण्यात येते. यामुळे तांडा वस्तीतील लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते. अनेक तांडे हे मागास व दुर्लक्षित आहेत. त्यामुळे या योजनेचा निधी वेळेवर उपलब्ध होणे गरजेचे आहे.राठोड यांनी सांगितले...
Mp.Nagesh Patil Ashtikar : नांदेड महानगरपालिकेचे प्राधिकरण झालं पाहिजे – ठाकरे सेनेचे खा. नागेश पाटील आष्टीकर यांच मत

Mp.Nagesh Patil Ashtikar : नांदेड महानगरपालिकेचे प्राधिकरण झालं पाहिजे – ठाकरे सेनेचे खा. नागेश पाटील आष्टीकर यांच मत

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
नांदेड| ठाकरे शिवसेनेचे हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी नांदेड येथील महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत सोबत बैठक घेतली. त्या बैठकीत मतदार संघातील समस्या बाबत त्यांनी चर्चा केली. शक्तिपीठ महामार्गाच्या अनुषंगाने शेतकऱ्याला सोबत घेत नितीन गडकरी यांची भेट घेऊन मार्ग अशी प्रतिक्रिया खासदार आष्टीकरांनी दिली आहे. नांदेड महानगरपालिका प्राधिकरण बोलतांना ते म्हणाले की नांदेड महानगरपालिकेचे प्राधिकरण झालं पाहिजे मात्र अशोक चव्हाण का विरोध करतात हे मला माहित नाही, नांदेडमध्ये प्राधिकरणासाठी राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आग्रही असताना आता ठाकरे शिवसेनेच्या खासदारांनी प्राधिकरणाच्या बाजूने आपली भूमिका मांडली आहे. महावितरण बैठकीत खालील विषयावर चर्चा झाली - खेड्यापाड्यात अनेक मार्गदर्शनाच्या समस्या आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांची भेट घेतली. - केंद्राने राज्य...
deglur shivsena : शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा वाटप करा: अन्यथा शिवसेना आंदोलन करणार

deglur shivsena : शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा वाटप करा: अन्यथा शिवसेना आंदोलन करणार

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले | प्रसंगी शेतकर्यांना हक्काचा पिक विमा हेच एक मदतीचा मार्ग राहीला आहे. ज्या शेतकर्यांना २५ टक्के मिळाली नाहीं त्या शेतकर्यांना तत्काळ पिक विमा वाटप करण्यात यावा. अन्यथा देगलूर बिलोली मुखेड शिवसेना उध्वव ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर महेश पाटील बालाजी पाटील उमेश पाटील शिवकुमार बामणे विपुल पटने यांच्या सहया आहे. देगलूर बिलोली मुखेड तालुक्यातील शेतकर्यांना 2०२३ -२४खरीप हंगामातील पीकविमा वाटप करा. अन्यथा शिवसेना उध्वव ठाकरे पक्षाच्या वतीने नांदेड येथील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालया समोर उग्र व तीव्र. आंदोलन करण्याचा इशारा अपर निवासी जिल्हाधिकारी अबेकर व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अधिकारयाना शिवसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद केले. खरीप हंगाम २०२४ला शेतकरी बाधवानी सावकारी बिन सावकार...
Chief Minister : नांदेड जिल्ह्याच्या विकासकामांसाठी खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Chief Minister : नांदेड जिल्ह्याच्या विकासकामांसाठी खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

नांदेड, राजकीय
नांदेड| माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आ. श्रीजया चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नांदेड जिल्ह्यातील अनेक विकास कामा संदर्भात चर्चा केली. याप्रसंगी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी सर्व कामांची सद्यस्थिती जाणून घेतली आणि सदर विषय मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईस्थित 'वर्षा' शासकीय निवासस्थानी झालेल्या या भेटीत खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देणे, शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन होत असलेल्या शेतकऱ्यांनी सूचवलेले पर्याय शासनाने जाणून घेणे, नांदेड येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ५०० खाटांच्या रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देणे, शासनाच्या विविध प्रकल्पांस...
transgender building : नांदेड मध्ये भारतातील पहिले किन्नर भवन उभारणार : खा.डॉ. अजित गोपछडे यांनी केली जागेची पाहणी

transgender building : नांदेड मध्ये भारतातील पहिले किन्नर भवन उभारणार : खा.डॉ. अजित गोपछडे यांनी केली जागेची पाहणी

नांदेड, राजकीय
नांदेड| समाजातील एक वंचित घटक म्हणून ज्या किन्नरकडे पाहिले जाते त्यांचा सामाजिक दर्जा वाढवा. त्यांना प्रतिष्ठा मिळावी या अनुषंगाने खा. डॉ . गोपछडे यांनी यशस्वी प्रयत्न केले असून नांदेड शहरालगत साडेतीन एकर जमिनीवर लवकरच किन्नर भवन उभारण्यात येणार आहे. या अनुषंगाने जागेची पाहणी आज खा. डॉ. अजित गोपछडे यांनी समाज कल्याण अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसह केली. समाजातील तिसरा घटक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या किन्नर , तृतीय पंथीयांचे सामाजिक जीवन अत्यंत हालाखीचे आणि धक्काधकीचे असे झाले आहे. त्यामुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळावी , त्यांच्या आयुष्यातही सुख यावे या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने तृतीय पंथीयांसाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत . शिवाय त्यांना चांगले जीवन जगता यावे , त्यांच्या जगण्या मरणाच्या प्रश्न...
पुढील गुलाल आपलाच आहे – माजी उपनगराध्यक्ष सुनील भाऊ सोनुले

पुढील गुलाल आपलाच आहे – माजी उपनगराध्यक्ष सुनील भाऊ सोनुले

नांदेड, राजकीय
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील जनतेने सलग दोन वेळा एकहाती सत्ता देऊन काँग्रेसवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी प्रत्येक पदाधिकाऱ्यांची आहे. नागरिकांच्या विविध प्रश्नांना प्राधान्य देत वार्डा-वार्डात जाऊन काम करण्याचे स्पष्ट निर्देश काँग्रेस नेते व माजी उपनगराध्यक्ष सुनील सोनुले यांनी दिले. आगामी पालिका निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस शहरातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील सोनुले यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसचा विजय निश्चित असून, "गुलाल आपलाच आहे", या शब्दांत कार्यकर्त्यां मध्ये नवचैतन्य निर्माण केले. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन प्रयत्नशील राहावे, असे ते म्हणाले. या बैठकीत नागरिकांच्या विविध समस्या मांडण्यात आल्या. त्यामध्य...
Deglur News : देगलूर जिल्हा परिषद बाधकाम विभागाच्या कारभाराला वठणीवर आणण्यासाठी शिवसेनेच्या वतीने २४ रोजी आंदोलन

Deglur News : देगलूर जिल्हा परिषद बाधकाम विभागाच्या कारभाराला वठणीवर आणण्यासाठी शिवसेनेच्या वतीने २४ रोजी आंदोलन

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले | येथील जिल्हा परिषद बाधकाम विभाग कार्यालयात. एक कार्यकारी अभियंता आणि अठरा कर्मचारऱ्याची नेमणूक करण्यात आली असता तेव्हा येथील कार्यालयात केवळ दोन ते तीन कर्मचारी उपस्थित राहतात याना वठणीवर आणण्यासाठी उध्व शिवसेनेच्या वतीने २४ रोजी आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद बाधकाम विभागाचे विभाजन करून नांदेड देगलूर भोकर असे तीन विभाग तयार करण्यात आले आहे. देगलूरच्या जिल्हा परिषद बाधकाम विभागात काम करण्यासाठी एक कार्यकारी अभियंता व १८ कर्मचारी नियुक्ती करण्यात आले. परंतु सध्या देगलूरच्या कार्यालयात दोन तीन अधिकारी व एक दोन कर्मचारी सोडले तर उर्वरित कोणताही कर्मचारी हजर रहात नाही. सगळे अधिकारी नांदेडला राहून नांदेड कार्यालयात बसून नोकरी करतात. या सर्वांचे उपस्थिती पट देखील नांदेडलाच आहे. त्यामुळ...
Mp Ashok Chavhan : खा. अशोकराव चव्हाण यांची भोकर व मुदखेडसाठी रेल्वे पादचारी पुलाची मागणी

Mp Ashok Chavhan : खा. अशोकराव चव्हाण यांची भोकर व मुदखेडसाठी रेल्वे पादचारी पुलाची मागणी

नांदेड, राजकीय
नांदेड| माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी भोकर व मुदखेड येथे रेल्वे पादचारी पुलाची (एफओबी) मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला पत्र दिले आहे. भोकर शहरात रेल्वे उड्डाण पुल व मुदखेड शहरात रेल्वे भुयारी मार्ग झाल्याने रेल्वे विभागाने त्या ठिकाणी असलेले बंद केले आहेत. सदर रेल्वे उड्डाण पुल आणि भुयारी मार्गामुळे दोन्ही शहरांचे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात पायी जाणाऱ्या नागरिकांना अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर भोकर व मुदखेड येथे अनुक्रमे उड्डाण पुल आणि भुयारी मार्गानजिक तसेच दोन्ही शहरातील रेल्वे यार्ड परिसरात रेल्वे पादचारी पुलाचे बांधकाम करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमिवर माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी भोकर व मुदखेड शहरातील रेल्वे पादचारी पुलाला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे....
Bjp join : राष्ट्रवादीचे दिनकर दहिफळे सभापती गजानन मुंडे सहित बाजार समिती संचालकांचा भाजपात जाहीर प्रवेश !

Bjp join : राष्ट्रवादीचे दिनकर दहिफळे सभापती गजानन मुंडे सहित बाजार समिती संचालकांचा भाजपात जाहीर प्रवेश !

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| गत पंधरा वर्षाच्या राजकीय वर्तुळात मोठा फेरबदल घडून आला असून किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार एक विकसनशील नेतृत्व भीमराव केराम यांचा सर्व समावेशक विकासावर प्रभावित होऊन आज मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण, भाजपा महामंत्री विक्रांत पाटील, भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, आमदार तुषार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वात मुंबई येथे भारतीय जनता पक्षामध्ये सक्रियपणे प्रवेश केला आहे. असे मत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिनकर दहिफळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती गजानन गोविंदराव पाटील मुंडे यांनी मांडले. व त्यांचे सहकारी बाजार समितीच्या संचालकांनीही भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. अखेर आमदार भीमराव केराम यांना राष्ट्र...
bogus water supply : अधिवेशनाच्या काळात थेट मंत्री महोदयाकडे मांजरम गावच्या बोगस पाणीपुरवठ्याची तक्रार

bogus water supply : अधिवेशनाच्या काळात थेट मंत्री महोदयाकडे मांजरम गावच्या बोगस पाणीपुरवठ्याची तक्रार

नांदेड, राजकीय
नांदेड| मांजरम गावची पाणीपुरवठा योजना निर्मितीत अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाची कामे केल्यामुळे अपूर्ण राहिलेली आहे. या योजनेच्या विरोधात अनेकदा गावकऱ्यांनी निवेदने दिली होती. गावामधील लोकांनी हंडा मोर्चा आंदोलन सुद्धा केले होते. तरीपण अद्याप संबंधित कंत्राटदारावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. त्यामुळे आज मुंबई येथे चालू असलेल्या अधिवेशन काळात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. संतोष कन्स्ट्रक्शन व रोहित कन्स्ट्रक्शन आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने मांजरम गावची पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ केलेला आहे. शासनाला आमची नम्र विनंती आहे, संबंधित कंत्राटदारावर व अधिकार्‍यावर कायदेशीर कारवाई करावी आणि महत्वकांक्षी गावची पाणीपुरवठा ...
error: Content is protected !!