Tuesday, May 19

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Ashok chavhan : ‘बाभळी’बाबत खा. अशोकराव चव्हाण यांनी घेतली विखे पाटील यांची भेट

Ashok chavhan : ‘बाभळी’बाबत खा. अशोकराव चव्हाण यांनी घेतली विखे पाटील यांची भेट

नांदेड, राजकीय
नांदेड| बाभळी बंधाऱ्यातील महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी वाचवण्यासाठी उपलब्ध पर्यायांवर विचारविनिमय करण्यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी आज राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. विधानभवनात झालेल्या या भेटीप्रसंगी आ. राजेश पवार, आ. जितेश अंतापूरकर, आ. श्रीजया चव्हाण व भाजपचे नांदेड महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर उपस्थित होते. जलसंपदा विभागाच्या सचिवांसह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या चर्चेत खा. अशोकराव चव्हाण यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी काही पर्याय सुचवले. तेलंगणाला त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे याविषयी दुमत नाही. मात्र एकीकडे तेलंगणातील श्रीराम सागर प्रकल्पातून पाणी समुद्रात वाहून जात असताना महाराष्ट्राला आपल्या हक्काचे पाणी सर्वोच्च न्यायालयाच्या बंधनामुळे अडवता येत नाही, असे खा. अशोक चव्हाण म्हणाले. ...
Bantibhau Landge : युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांचा राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश

Bantibhau Landge : युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांचा राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड शहरातील युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांनी आपल्या शेकडो समर्थकासह आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पक्षात जाहिर प्रवेश केला. यावेळी अजितदादा पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून बंटी लांडगे यांच्यासह समर्थकांना प्रवेश देण्यात आला. नांदेड शहरातील मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच नेहमीच अडीअडचणीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून बंटीभाऊ लांडगे यांची ओळख आहे. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ असो की त्यांच्या सार्वजनिक अडचणी असो त्या सोडविण्यासाठी बंटीभाऊ नेहमीच पुढाकार घेत असतात. शहरातील अस्वच्छता, नियमित पाणीपुरवठा, सार्वजनिक ठिकाणी लाईट असे अनेक सामाजिक मुद्दे घेवून त्यांनी प्रशासनाकडे याचा पाठपुरावा केला आहे. या कार्याची दखल...
Mla. Srijaya Chavan : ‘पिंपळढव’ जून २०२६ पर्यंत तर ‘रेणापूर सुधा’ दोन महिन्यात पूर्ण करणार

Mla. Srijaya Chavan : ‘पिंपळढव’ जून २०२६ पर्यंत तर ‘रेणापूर सुधा’ दोन महिन्यात पूर्ण करणार

नांदेड, राजकीय
नांदेड| जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पिंपळढव साठवण तलावाचे काम जून २०२६ पर्यंत तर रेणापूर सुधा प्रकल्पाच्या उंची वाढवण्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करणार असल्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. श्रीजया चव्हाण यांना दिले आहे. बुधवारी सकाळी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना विखे पाटील यांनी ही माहिती दिली. नांदेड जिल्ह्यातील या दोन्ही महत्वपूर्ण प्रकल्पांसंदर्भात भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पिंपळढव साठवण प्रकल्पाचे काम आणि रेणापूर सुधा प्रकल्पाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने भूसंपादन व प्रकल्पांच्या कामासाठी निधी देण्याची तसेच हे प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्याची मागणी त्यांनी आपल्या प्रश्नातून केली होती. आ. श्रीजया चव्ह...
Nanded News : नांदेड तालुक्यातील दक्षिण मतदारसंघात नव्याने धनेगाव जिल्हा परिषद संघाची निर्मिती,दहा गावाच्या समावेश

Nanded News : नांदेड तालुक्यातील दक्षिण मतदारसंघात नव्याने धनेगाव जिल्हा परिषद संघाची निर्मिती,दहा गावाच्या समावेश

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या नवीन मतदार संघ नांदेड तालुक्यातील दक्षिण विधानसभा मतदार संघातील धनेगाव हा झाला असुन वाजेगाव‌ मतदार संघातुन विभाजन करून धनेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ अस्तित्वात आला आहे यामुळे दक्षिण विधानसभा मतदार संघात आता तिनं जिल्हा परिषद संघ व सहा पंचायत समिती गण झाले आहेत, नव्याने झालेल्या जिल्हा परिषद मतदार संघाचे आजी माजी जिल्हा परिषद सदस्य व सरपंच, विविध राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी व संभाव्य उमेदवार यांनी प्रशासनाचे आभार मानुन आनंद व्यक्त केला असुन विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर वाजेगाव सर्कल मध्ये ऊतर मतदार संघातील पाच गावांचा समावेश असल्याची प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे. राज्य शासनाच्या निवडणूक विभागाने वाढलेल्या लोकसंख्या अधारे जिल्हा परिषद नांदेड यांच्यी पुर्वी असलेली जिल्हा परिषद गट संख्या 63 वरून दोन जिल्हा परिषद गट वाढवून 65 ...
Mp. Ravindra Chavan : कै वसंतराव चव्हाणांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करणार – खा. रवींद्र चव्हाण

Mp. Ravindra Chavan : कै वसंतराव चव्हाणांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करणार – खा. रवींद्र चव्हाण

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले| नांदेड जिल्ह्यातील मोठे मोठे नेते काँग्रेस सोडून गेल्याने खासदारकिची निवडणूक लढण्यासाठी कोणताही नेता तयार नव्हता. मी सामान्य जनतेच्या भरवशावर निवडणूक मैदानात उतरलो आणि जिंकलो. त्यामुळे नांदेड जिल्हाचा विकास करण्यासाठी जे स्वप्न कै. वसंतराव चव्हाणांनी पाहिल ते स्वप्न मी साकार करणार असल्याचे प्रतिपादन खासदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. ते देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर वासियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाल उत्तर देताना बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले कि, शेतकऱ्यासाठी संसदेत बोलताना सोयाबीनवर प्रकिया केंद्र उभारल्यास शेतकऱ्याना भाव जास्त येतो आणि तरुणांच्या हाताला देखील काम मिळते. तसेच कासराळी येथे शासकीय जमीन जास्तीतजास्त असल्याने मिरची केंद्र उभारावे यासाठी देखील पाठपुरावा केला. शेतकऱ्याच्या पिक विमासाठी दिल्लीच्या संसद मधे आवाज उठवून शंभ...
Draft ward formation program : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषीत

Draft ward formation program : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषीत

नांदेड, राजकीय
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 16 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रारुप प्रभाग रचना 14 जुलै 2025 रोजी परिशिष्ट 5 (अ) व 5 (ब) मध्ये पुढील ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रारुप प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, जिल्हा परिषद नांदेड यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, संबंधित तहसिल कार्यालयाच्या बोर्डावर, संबंधित पंचायत समितीच्या नोटीस बोर्डवर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https:nanded.gov.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणाच्या प्रारुप प्रभाग रचनेस मसुद्यास कोणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची सकारण लेखी निवेदने, हरकती, सूचना जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व संब...
Mla Srijaya chavhan : नांदेडच्या सीसीटीव्ही प्रस्तावाला मान्यता देण्याबाबत निर्देश देणार – आ. श्रीजया चव्हाण यांच्या प्रश्नाला गृह राज्यमंत्र्यांचे उत्तर

Mla Srijaya chavhan : नांदेडच्या सीसीटीव्ही प्रस्तावाला मान्यता देण्याबाबत निर्देश देणार – आ. श्रीजया चव्हाण यांच्या प्रश्नाला गृह राज्यमंत्र्यांचे उत्तर

नांदेड, राजकीय
नांदेड|  नांदेड शहरात सीसीटीव्ही यंत्रणा व नियंत्रण कक्ष उभारण्यासाठी शासनाकडे सादर १०० कोटी रुपयांच्या कामाचा प्रलंबित प्रस्ताव तपासून त्याला मान्यता देण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आ. श्रीजया चव्हाण यांना दिले आहे. मंगळवारी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात आ. श्रीजया चव्हाण यांनी याबाबत उपप्रश्न विचारला होता. या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिलेली आहे. मात्र, अद्याप निधी मिळाला नसल्याकडे आ. श्रीजया चव्हाण यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावून त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. सीसीटीव्हीची देखभाल व दुरुस्ती संदर्भात त्यांनी विचारलेल्या अन्य उपप्रश्नावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री पुढे म्हणाले की, या कामासाठी संपूर्ण राज्या...
Sachin Patil : मुलभूत सोयी-सुविधे अंतर्गतची कामे निकृष्ठ; चौकशी करून कार्यवाही करा – सचिन पाटील

Sachin Patil : मुलभूत सोयी-सुविधे अंतर्गतची कामे निकृष्ठ; चौकशी करून कार्यवाही करा – सचिन पाटील

नांदेड, राजकीय
नांदेड| मनपा हद्दीत मुलभूत सोयी-सुविधे अंतर्गत दिपनगर परिसरातील सिमेंट काँक्रेट रस्त्याची कामे दिवस न करता रात्रीला अंधारात उरकून निष्कृष्ठ दर्जा अवलंबविला जात आहे. या बोगस कामाची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करावी. देयके काढणाऱ्या अधिकाऱ्यास निलंबित करण्यात यावे अशी मागणी सचिन पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख, नांदेड यांनी निवेदन देऊन केली आहे. नांदेड मनपा हद्दीत दिपनगर येथील सुर्यवंशी यांचे घर ते जोशी यांच्या घरापर्यंत सि.सी. रोड आणि दिपनगर येथील हनुमान मंदिरचे कॉर्नर ते रविंद्र प्राथमिक शाळा पर्यंत सि.सी. रस्ता हे दोन कामे अंदाजपत्रकानुसार होत नाहीत. त्यामुळे शासनाच्या मुलभूत सोयी-सुविधे अंतर्गत योजनेमार्फत मंजूर कामे काही ठेकेदार मनमानी पद्धतीने कामाचे तिन-तेरा करुन शासनाच्या निधीचा गैरवापर करत आहेत. सर्व सामान्य नागरीकांच्या कराचा पैश्यातून होत असलेल्या विकास कामे महान...
Rajasthan Governor Haribhau Bagde : देशाचा समृध्दीसाठी विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

Rajasthan Governor Haribhau Bagde : देशाचा समृध्दीसाठी विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

नांदेड, राजकीय
नांदेड| जगात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे आपल्या देशाचा सर्वांगिण विकास व समृध्दीसाठी विद्यापीठं, शाळांनी विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढविण्यावर विशेषत्वाने भर द्यावा, अशी सूचना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली. अभिनव भारत शिक्षण संस्थेच्यावतीने नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात आज श्री बागडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे, कोषाध्यक्ष कैलाशचंद्र काला, सचिव ॲड. वनिता जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य एम.वाय. कुलकर्णी आदी मान्यवरांसह प्राध्यापक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. प्रारंभी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा संस्थेचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. ...
Nanded ; भाजपा तालुका नांदेड दक्षिण ग्रामीण मंडळ कार्यकारिणी जाहीर

Nanded ; भाजपा तालुका नांदेड दक्षिण ग्रामीण मंडळ कार्यकारिणी जाहीर

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार व नांदेड महानगर अध्यक्ष अमर भाऊ राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा नांदेड दक्षिण तालुका मंडळ कार्यकारिणी विश्वंभर शिंदे यांनी जाहीर केली असून यात सहा उपाध्यक्ष दोन सरचिटणीस यांच्या सह सोळा जणांच्या समावेश केला असुन मंडळ अंतर्गत महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून अश्वीनी वानखेडे,युवा मोर्चा दता जाधव, किसान मोर्चा मारोती तळणे, अनुसूचित जाती मोर्चा रमेश वाघमारे, ओबीसी मोर्चा माधव डाके, आदिवासी मोर्चा आकाश एमलवाड यांच्यी नियुक्ती केली आहे. तालुका अध्यक्ष विश्वंभर शिंदे यांनी यांनी प्रसिद्धी केलेल्या पत्रकात कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष अमित संजय पगडे,गजानन ऊतमराव कदम,विठ्ठल राजाराम सोनटक्के, नरबा दौलतराव जाधव,संतोष मुक्ताजी कर्डिले,गजानन हरिश्चंद्र उबाळे, सरचिटणीस म्हणून माधव नारायण वाघमारे,राजेश रोहीदास पावडे, तर चिटणीस म्हणून ...
error: Content is protected !!