HomeनांदेडMla Srijaya chavhan : नांदेडच्या सीसीटीव्ही प्रस्तावाला मान्यता देण्याबाबत निर्देश देणार -...

Mla Srijaya chavhan : नांदेडच्या सीसीटीव्ही प्रस्तावाला मान्यता देण्याबाबत निर्देश देणार – आ. श्रीजया चव्हाण यांच्या प्रश्नाला गृह राज्यमंत्र्यांचे उत्तर

नांदेड|  नांदेड शहरात सीसीटीव्ही यंत्रणा व नियंत्रण कक्ष उभारण्यासाठी शासनाकडे सादर १०० कोटी रुपयांच्या कामाचा प्रलंबित प्रस्ताव तपासून त्याला मान्यता देण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आ. श्रीजया चव्हाण यांना दिले आहे.

मंगळवारी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात आ. श्रीजया चव्हाण यांनी याबाबत उपप्रश्न विचारला होता. या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिलेली आहे. मात्र, अद्याप निधी मिळाला नसल्याकडे आ. श्रीजया चव्हाण यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावून त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

सीसीटीव्हीची देखभाल व दुरुस्ती संदर्भात त्यांनी विचारलेल्या अन्य उपप्रश्नावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री पुढे म्हणाले की, या कामासाठी संपूर्ण राज्यात एकसूत्रता आणण्याकरिता गृह विभाग एसओपी तयार करीत असून, ते लवकरच वितरित होतील.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments