लोहा l मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनाला राज्यातील महिला वर्गात अतिशय लोकप्रिय झाली आज भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे – चिखलीकर यांच्या नियोजनात रनिवार (२९ सप्टें) रोजी लोहा, पारडी येथील विक्की गार्डन मध्ये’ लाडकी बहीण- स्नेह मेळावा ‘ आयोजित केला होत. विधान परिषदेचे गटनेते प्रविण दरेकर व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी’ मेळाव्यास झालेल्या महिलांच्या अभूतपूर्व . …गर्दीने प्रभावित झाले . नियोजन .. शिस्तबद्धता पाहता आयोजक प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या नेतृत्व व पक्ष संघटन गुणांचे या नेत्याने तोंड भरून कौतूक केले.

लोहा पारडी येथील विकी गार्डन येथे प्राणिताताई चिखलीकर यांनी “लाडकी बहीण” स्नेह मेळावा आयोजित केला होता मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणून विधान परिषदेचे गटनेते प्रवीणजी दरेकर , महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ याची विशेष उपस्थिती होती अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हिते व्यासपीठावर पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके.

ग्रामीण जिल्हाध्यक्ष ऍड किशोर देशमुख, माजी भ महानगराध्यक्ष प्रवीण साले, लोहा विधानसभा प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर, आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष विजय सोनवणे, प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम, बाळू खोमणे, छत्तीसगडचे भारतीय जनता पार्टी लोहा विधानसभा प्रवास प्रभारी भारत मटियारा, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, केशवराव मुकदम, दता वाले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मारोती पंढरे.

तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे कंधार तालुकाध्यक्ष किशनराव डफडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राठोड, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अनिल पाटील बोरगावकर महानगर सरचिटणीस विजय गंभीरे महिला मोर्चाच्या डॉ. शितलताई भालके, कंधार तालुकाध्यक्षा ऍड औरादकर लोहा तालुकाध्यक्षा मामीडवाड, बगडेताई, महादेवी मठपती यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

लोहा येथील लाडकी बहीण स्नेह मेळावा नियोजनाचा एक उत्तम नमुना होता. महिलांची अलोट गर्दी होती. अभूतपूर्व प्रतिसाद होता. लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवा भाऊ असे स्लोग्न जोरकसापणे सुरू होते. महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी केलेल्या योजना सांगितल्या तसेच देवा भाऊ यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली .कोणत्याहीविरोधकांच्या अफवाना बळी पडू नका असे सांगून माजी खा.प्रतापराव पाटील यांना आपणास निवडणूक द्यायचे आहे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ .प्रतापराव दादा विधानसभेत जाणार आहेत त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असे सांगून प्राणिताताईंच्या नेतृत्व गुणांचे चित्रा वाघ यांनी तोंडभरून कौतुक केले राज्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे .
असे सांगून विधान परिषदेचे गटनेते आ. प्रविण दरेकर,यांनी विरोधकांचा समाचार घेतला प्रतापरावांच्या पाठीशी उभे राहा असा नेता तुम्हाला मिळाला आहे हे या मतदारसंघाचे भाग्यच होय असे त्यांनी सांगितले , माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर ,प्रविण साले , प्रदेश प्रवक्ते गणेश हाके , विजय सोनवणे यांची भाषणे . प्रास्ताविक प्रणिताताई देवरे -चिखलीकर यांनी प्रास्ताविक केले संचालन स्मिता मिहीर यांनी केले तर आभार किशनराव डफडे यांनी केले .
लाडकी बहीण मेळाव्यात अभूतपूर्व गर्दी होती पण नियोजन ..व्यवस्था . पाहून भाजपा नेत्यानी प्राणिताताईंच्या संघटन नेतृत्वाची तारीफ केली. मेळाव्यात रुचकर भोजन.पाणी बॉटल व महिलांना गिफ्ट देण्यात आली