Tuesday, May 19

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Madhav Pavade : माधव पावडे यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती

Madhav Pavade : माधव पावडे यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती

नांदेड, राजकीय
नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी युवा नेतृत्व पावडे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते माधव पावडे यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी काही महिन्यांपूर्वीच आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता. आ. चिखलीकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पावडे यांचे जिल्हाभरात असंख्य युवा कार्यकर्ते आहेत. त्यांचे संघटनही मजबूत राहिले आहे. त्यामुळे माधव पावडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती देण्यात येत असल्याचे आ. चिखलीकर यांनी यावेळी सांगितले. नियुक्ती कार्यक्रमात माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, आ. प्रतापराव पाटील ...
Bhai Keshavrao Dhondge : भाई केशवराव धोंडगे यांच्यासारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही- प्रकाश गिरे पाटील

Bhai Keshavrao Dhondge : भाई केशवराव धोंडगे यांच्यासारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही- प्रकाश गिरे पाटील

नांदेड, राजकीय
नांदेड| भाई केशवराव धोंडगे यांची १०४ वी जयंती सांस्कृतिक,सामाजिक,वैचारिक उपक्रमाने श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळेमध्ये साजरी करण्यात आली यामध्ये हाळदा येथील श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये भाई केशवराव धोंडगे यांच्या जीवनकार्यावर व्याख्यानमाला आयोजीत करण्यात आली होती यावेळी विचारवंत पी. बी. वाघमारे व अष्टपैलू फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गिरे पाटील यांची व्याख्याने संपन्न झाली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांची शर्करातुला करून त्यांचे सत्कार करण्यात आले त्यावेळी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे याविषयी प्रसिद्ध विचारवंत पी बी वाघमारे वाघमारे यांचे सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रकाश गिरे पाटील यांची उपस्थिती होती ते बोलताना म्हणाले भाई केशवराव धोंडगे हे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,ज्य...
Mp Ashok Chavhan : ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय मंजुरीच्या अंतिम टप्प्यात: खा. अशोकराव चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Mp Ashok Chavhan : ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय मंजुरीच्या अंतिम टप्प्यात: खा. अशोकराव चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

नांदेड, राजकीय
नांदेड| शहरातील ५०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, त्यासाठी खा. अशोकराव चव्हाण सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अतुल सावे यांच्या संपर्कात आहेत. नांदेड येथील श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा सामान्य रुग्णालय पूर्वी १०० खाटांचे होते. खा. अशोकराव चव्हाण पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ३०० खाटांचे नवे रुग्णालय मंजूर करून घेतले होते. त्याबाबतचा शासन निर्णयही जारी झाला होता व नवीन आंतररुग्ण इमारतीच्या बांधकामासाठी २३१.२५ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रथम टप्प्यात १३८.२१ कोटी रुपयांच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र, २ ऑक्टोबर २०२३ रोजी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात घडलेल्या अप्रिय घटनेच्या...
Ashokrao Chavan welcomes : काँग्रेस – शिवसेना कार्यकर्ते व डॉक्टरांचा भाजपात प्रवेश – खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत

Ashokrao Chavan welcomes : काँग्रेस – शिवसेना कार्यकर्ते व डॉक्टरांचा भाजपात प्रवेश – खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
नांदेड, अनिल मादसवार| माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड शहर आणि जिल्ह्यातील अनेक नामांकित डॉक्टर, तसेच काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला (Congress - Shiv Sena workers and doctors join BJP - Kha. Ashokrao Chavan welcomes). खा. अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी हा सोहळा झाला. या सोहळ्यास महानगराध्यक्ष व माजी आमदार अमरनाथ राजूरकर, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, भाजपचे नेते डॉ. अंकुश देवसरकर, लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, तसेच डॉ. अमर काळबांडे (सेनगाव), डॉ. गोविंद वानखेडे (हिमायतनगर), डॉ. राहुल वानखेडे, डॉ. चंद्रकांत थोटे (कुरळा-कंधार), डॉ. बागल, डॉ. प्रताप प्रभणकर, डॉ. सुनिल जाधव, डॉ. साहेबराव शिंदे, डॉ. आशिष बेरळकर, डॉ. राजू धामने, डॉ. सु...
MLA Amit Deshmukh : महाराष्ट्रातील वाढत्या अपघातांच्या घटनांकडे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सरकारचे लक्ष वेधले

MLA Amit Deshmukh : महाराष्ट्रातील वाढत्या अपघातांच्या घटनांकडे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सरकारचे लक्ष वेधले

लातूर, मुंबई, राजकीय
मुंबई| राष्ट्रीय महामार्गावर शहरानजीक वाहनांची वेग मर्यादा नियंत्रणात राहावी म्हणून उपाययोजना आहेत मात्र ग्रामीण भागात याबाबतीत दुर्लक्ष असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होऊन जीवित हानी होत आहे, हे रोखण्यासाठी तसेच दुर्दैवाने अपघात झालाच तर जखमींना वेळेत उपचार मिळण्याच्या दृष्टीने रोड सेफ्टी असिस्टंन्स प्रणाली अधिक मजबूत करावी अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत बोलताना केली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यातील वाढते अपघात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी या संदर्भाने सरकारचे लक्ष वेधताना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी एका अपघाताच्या संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, मागच्या आठवड्यात धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे जात असताना औसा तालुक्यात दोन दुचाकीचा अपघात ...
Invetigetion Froud : श्रीमंत राजे यशवंतराव होळकर वस्तीगृह योजनेमध्ये विद्यार्थ्यांच्या नावे बोगस दाखवून बिले उचलण्याचा प्रताप

Invetigetion Froud : श्रीमंत राजे यशवंतराव होळकर वस्तीगृह योजनेमध्ये विद्यार्थ्यांच्या नावे बोगस दाखवून बिले उचलण्याचा प्रताप

नांदेड, राजकीय
नांदेड | राजे यशवंतराव होळकर वस्तीगृह योजनेमध्ये बहुजन कल्याण मंत्रालय अंतर्गत धनगर समाजातील बोगस विद्यार्थी संख्या दाखवून विद्यार्थ्यांच्या नावावर अनुदान लाटले गेलं आहे. हा महाभाग कोण? याची चौकशी करून कार्यवाही कराबी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनोहर लोलगे, जिल्हाप्रमुख शिवसेना अल्पसंख्याक आघाडी, (उत्तर नांदेड) यांनी निवेदणाद्वारे दिला आहे. श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांच्या नावाने ही योजना सुरु होते. धनगर समाजातील गोर-गरीब विद्यार्थ्याच्या नामाकिंत शाळेत शिक्षणाची सोयी या योजने मार्फत केली जाते. वस्ती गृहाची योजना ही बहुजन कल्याण मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्रभर राबविली जाते. या योजनेत वस्तीगृह हे जागेवर नाही फक्त कागदावरच राबविली जाते आणि विद्यार्थीही कागदावरच दाखविले जातात. तरीही योजने अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे संस्था चालकांना प्रतिवर्षी रुपय...
Nanded ; नांदेड शहरातील दीपनगर भागातील सिमेंट कोक्रेट रस्ता बोगस

Nanded ; नांदेड शहरातील दीपनगर भागातील सिमेंट कोक्रेट रस्ता बोगस

नांदेड, राजकीय
नांदेड| मनपा हद्दीत मुलभूत सोयी-सुविधे अंतर्गत दिपनगर येथील सुर्यवंशी यांचे घर ते जोशी यांच्या घरापर्यंत आणि हनुमान मंदिर कॉर्नर ते रविंद्र प्राथमिक शाळा पर्यंत सुरु असलेल्या सिमेंट कोक्रेट रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन पाटील यांनी एका निवेदनद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. नांदेड शहरातील दीप नगर भागात होत असलेल्या सिमेंट कोक्रेट रस्त्याचे दोन कामे अंदाजपत्रकानुसार होत नसल्यामुळे मुलभूत सोयी-सुविधे अंतर्गत मंजूर निधीचा अपव्यय होतो आहे. शासनाच्या योजनेमार्फत सुरु असलेल्या कामाचे ठेकेदार मनमानी पद्धतीने काम उरकून बिले काढण्याच्या तयारीत आहेत. रस्त्याचे काम करताना शासनाच्या मुलभूत सोयी-सुविधेला बगल दिली जात आहे. त्यामुळे रस्ता कामाचा बोजारा उडाला असून, सदर कामाचे तिन-तेरा करुन शासनाच्या निधीचा गैरवापर केला जातो आहे. सामान्य नागरीकांच्...
Nanded Super Specialty Hospital : नांदेड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रस्तावावर गतीमानतेने कार्यवाही करा

Nanded Super Specialty Hospital : नांदेड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रस्तावावर गतीमानतेने कार्यवाही करा

नांदेड, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार| येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ब्लॉक, कॅन्सर हॉस्पिटल, ट्रॉमा केअर सेंटर आणि बर्न इन्ज्युरी (लेव्हल-२) च्या उपचार सुविधा उभारण्याबाबतच्या प्रस्तावावर गतीमानतेने कार्यवाही (Take prompt action on the proposal for Nanded Super Specialty Hospital )करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. नांदेडला सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलसह अन्य आजारांवरील उपचाराच्या सोयी निर्माण करण्यासाठी खा. अशोकराव चव्हाण मागील अनेक महिने प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र सरकारने याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारकडे यंदा जानेवारीत सादर केला होता. त्यानंतर खा. अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांची भेट घेऊन या मागणीबाबत सविस्तर चर्चा केली होती. या मागणील...
Vinod Pawde : मराठीचा अपमान करणाऱ्यांना यापुढेही अद्दल घडवू : मनसे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांचा इशारा

Vinod Pawde : मराठीचा अपमान करणाऱ्यांना यापुढेही अद्दल घडवू : मनसे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांचा इशारा

नांदेड, राजकीय
नांदेड| महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा बोलता आली पाहिजे. त्यांचा व्यवहार मराठीतून झाला पाहिजे आणि मराठी अस्मिता कायम जपली पाहिजे. यासाठी (MNS District President Vinod Pawde) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब हे सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. हीच भूमिका नांदेड जिल्ह्यातील मनसेकडून घेतली जात असून भविष्यात ज्यांच्या शासकीय , निमशासकीय कार्यालयावर आणि खाजगी दुकानावर मराठी पाट्या नसतील त्या प्रत्येकाला मनसे आपल्या खळखट्याक स्टाईलने आंदोलन उत्तर देईल आणि निर्माण होणाऱ्या परिस्थितीला ते स्वतः जबाबदार असतील असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष विनोद पावडे यांनी दिला आहे . ते आज माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीची करण्याचा राज्य सरकारचा निर्णय हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तथा मराठी अस्...
Historical justice : मराठा आरक्षणाच्या लढ्यात ऐतिहासिक न्याय

Historical justice : मराठा आरक्षणाच्या लढ्यात ऐतिहासिक न्याय

नांदेड, राजकीय
नांदेड| मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांनी 2016 साली तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या हदगाव येथील सभेत ठामपणे आवाज उठवला. याच वेळी झालेल्या आंदोलनात "सभा उधळली" असा आरोप लावत आमच्यावर खटले दाखल करण्यात आले. २०१६ ते २०२५ या ९ वर्षांच्या संघर्षानंतर, आज हदगाव न्यायालयाने माननीय न्यायाधीशांच्या निर्णयानुसार निर्दोष मुक्तता दिली. हा निर्णय केवळ आमच्यासाठी नव्हे, तर संपूर्ण मराठा समाजाच्या न्यायहक्कासाठी मिळालेला ऐतिहासिक विजय आहे. अ‍ॅड. दिगंबर देशमुख सर यांचे, ज्यांनी हा संपूर्ण खटला विनामूल्य लढत, शेवटपर्यंत साथ दिली आणि आम्हाला न्याय मिळवून दिला. या आंदोलनात माधवराव पाटील देवसरकर, गणेश पाटील शिंदे, बालाजी पाटील जाधव, बालाजी पाटील शिंदे, शिवाजी पाटील जाधव, राहुल पाटील धुमाळ, विक्रांत पाटील नळगे आणि २०१६ मध्ये मराठा ...
error: Content is protected !!