Tuesday, May 19

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Latur Bus stand : लातूरच्या बसस्थानक व डेपो स्थलांतरणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा

Latur Bus stand : लातूरच्या बसस्थानक व डेपो स्थलांतरणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा

मुंबई, राजकीय, लातूर
लातूर| लातूर शहर शिक्षण, कृषी आणि व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले असून, शहरात दररोज ८०० ते ९०० बसची ये-जा असते. प्रवाशांची वाढती संख्या पाहता सध्याचे मध्यवर्ती बसस्थानक अपुरे पडत असून, त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार्किंग व्यवस्थेसह सुसज्ज बसस्थानक उभारण्यात यावे, त्याचबरोबर लातूर येथून महत्त्वाच्या शहरासाठी अद्यावत इलेक्ट्रिक बस सुरू कराव्यात यासह विविध मागण्या राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांच्याकडे त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीदरम्यान केल्या आहेत. त्यांनी या सर्व मागण्यांना अनुकूलता दर्शवत संबंधितांना सूचना केल्या आहेत. परिवहन विभागाच्या संदर्भाने लातूर शहर व जिल्ह्यातील विविध मागण्यांची निवेदने परिवहन मंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांच्याकडे वेळोवेळी देण्यात आली आहेत, या सर्व निवेदनावर विचार करून नि...
Mla sreejaya chavan : नांदेडला लवकरच ‘एमआरआय’ व ‘सिटीस्कॅन’ – वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची आ. श्रीजया चव्हाण यांना ग्वाही

Mla sreejaya chavan : नांदेडला लवकरच ‘एमआरआय’ व ‘सिटीस्कॅन’ – वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची आ. श्रीजया चव्हाण यांना ग्वाही

नांदेड, राजकीय
नांदेड| येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एमआरआय व सिटीस्कॅन मशीन लवकरच उपलब्ध करून देण्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. आ. श्रीजया चव्हाण यांच्या उपप्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. Nanded will soon have 'MRI' and 'City Scan' - Medical Education Minister assures MLA Sreejaya Chavan भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्रीजया चव्हाण यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात हा विषय मांडला. त्यावरील उत्तरात हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्य सरकारने पीपीपी धोरणानुसार एमआरआय व सिटी स्कॅन मशिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्याच्या सर्व विभागात निविदा प्रक्रिया सुरू आहेत. नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे ३०० विद्यार्थी क्षमतेचे वस्तीगृहाचे काम लवकर पूर्ण करावे, अशीही मागणी आ. चव्हाण यांनी याप्रसंगी केली. प्राथम...
Government ; वंदे भारत एक्सप्रेस मोदी सरकारची नांदेडकरांना अमूल्य भेट : खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्र सरकारचे मानले आभार

Government ; वंदे भारत एक्सप्रेस मोदी सरकारची नांदेडकरांना अमूल्य भेट : खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्र सरकारचे मानले आभार

नांदेड, राजकीय
नांदेड l मुंबई ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह संबंधित मंत्री आणि विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता . अखेर या पाठपुराव्याला यश आले असून येत्या 26 ऑगस्ट पासून ही रेल्वे मुंबई - नांदेड आणि नांदेड - मुंबई नियमितपणे धावणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाचा सोहळा दिनांक 26 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने नांदेडकरांसाठी दिलेली अमूल्य भेट असून याबद्दल खा. डॉ. गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि यांच्यासह ज्यांनी ज्यांनी ही रेल्वे नांदेडला सुरू करण्याचे अनुषंगा...
Eklara Mukhed-Deglur road : एकलारा मुखेड- देगलूर रस्तासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख बारसे यांच्या नेतृत्वाखाली होम हवन आंदोलन

Eklara Mukhed-Deglur road : एकलारा मुखेड- देगलूर रस्तासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख बारसे यांच्या नेतृत्वाखाली होम हवन आंदोलन

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले| मुखेडकडे जाणाऱ्या एकलारा जाणाऱ्या केरुर पर्यंतचा रस्ता मागील दहा (१०) वर्षांपासून सदरील रस्ता अतिशय खराब, जीवघेणा, यमदूत मार्ग झाला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गावकऱ्यांना मुखेड, देगलूर आदी शहरासह आसपास शासकीय, निमशासकीय, सगेसोयरे, मित्रपरिवार, नातेवाईक, सुख, दुःखात , दवाखान्यात उपचारासाठी रूग्णांना, प्रसुती बाळंतपणसाठी जीवघेणा ठरलाय सदरील रस्त्यावरुन वाहतूक करताना. दुचाकी स्वार, ऑटो , चारचाकी वाहनांना अनेक अपघाताचा सामना करावा लागतो अनेकदा अपघात होऊन जखमी होऊन अपंगत्व झाले आहेत तर अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत. या संदर्भात अनेक वेळा मंत्री, लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी यांना वारंवार भेटून, अर्ज, निवेदन, विनंत्या करूनही सदरील रस्त्याचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू होण्याच्या दिसत नाहीत त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या ...
CIDCO ; भाजपा सिडको मंडळाची कार्यकारिणी घोषित, विविध आघाडी पदाधिकारी यांच्यी नियुक्ती

CIDCO ; भाजपा सिडको मंडळाची कार्यकारिणी घोषित, विविध आघाडी पदाधिकारी यांच्यी नियुक्ती

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर अंतर्गत असलेल्या सिडको भाजपा मंडळ सचिन रावका यांनी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मान्यतेने भाजपा मंडळ अंतर्गत येणाऱ्या युवा मोर्चा अध्यक्ष मोनु जोशी,महिला मोर्चा विजयाताई गोडघासे,एस.सी.मोर्चा विशाल गंडीबे,तर डॉक्टर आघाडी डॉ.संतोष महाजन, यांच्या सह ओबीसी मोर्चा अध्यक्ष चंद्रकांत डहाळे, आदिवासी मोर्चा अध्यक्ष आकाश मोरे, अल्पसंख्याक आघाडी इम्रान खान पठाण ,व मंडळ आठरा जणांची कार्यकारिणी घोषित केली आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मान्यतेनुसार,नांदेड महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, यांच्या आदेशानुसार सिडको भाजपा मंडळ अंतर्गत येणाऱ्या विविध आघाडीचा व मंडळ कार्यकारिणी मंडळ अध्यक्ष सचिन रावका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केली असून यात दोन सरचिटणीस,सहा उपाध्यक्ष,सहा चिटणीस ,कोषाध्यक्ष,सोशल मीडिया यांच्या स...
Dr. Ajit Gopchhade : नांदेड जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष भरून काढा : राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना खा. डॉ. अजित गोपछडे यांचे साकडे

Dr. Ajit Gopchhade : नांदेड जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष भरून काढा : राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना खा. डॉ. अजित गोपछडे यांचे साकडे

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण लक्ष द्यावे आणि नांदेड जिल्ह्याचा सर्वांगीन , शाश्वत विकास व्हावा या अनुषंगाने खा. डॉ .अजित गोपछडे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. (Fill the development backlog in Nanded district: Governor CP Radhakrishnan receives advice from Dr. Ajit Gopchhade) या भेटीत खा. डॉ .गोपछडे यांनी तब्बल आठ मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. नांदेड जिल्हा हा तेलंगणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर वसलेला जिल्हा आहे . नांदेड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, रोजगार उपलब्ध व्हावा , नांदेडच्या नागरिकांना अत्याधुनिक सोयी सुविधा मिळाव्यात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या विकसित भारताच्या स्वप्नात नांदेडचा ही खारीचा वाटा असावा या हेतूने खा.डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन या...
MLA Chikhlikar : बियाणे उगवण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी आ. चिखलीकर यांचा विधानसभेत आवाज बुलंद

MLA Chikhlikar : बियाणे उगवण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी आ. चिखलीकर यांचा विधानसभेत आवाज बुलंद

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्ह्यात नुकत्याच खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून खरीप हंगामात बोगस बियाणे विकणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांमुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात बियाण्याची उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी सरकार अर्थसहाय्य करणार का ? शिवाय शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्राच्या संचालकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणार का ? (MLA Chikhlikar's voice is raised in the Legislative Assembly for farmers whose seeds have not germinated) असा प्रश्न आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज पावसाळी अधिवेशनात अत्यंत पोटतिडकीने उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देत असताना राज्याचे कृषी राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, दोषी कृषी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल. पावस...
Babali dam : बाभळी बंधाऱ्यात पाणी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

Babali dam : बाभळी बंधाऱ्यात पाणी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

नांदेड, राजकीय
नांदेड| तेलंगणातील श्रीराम सागर धरणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी बाभळी बंधाऱ्यात रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न (Every effort to prevent water from flowing into Babali dam) करेल, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. आ. श्रीजया चव्हाण यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. विखे पाटील पुढे म्हणाले की, श्रीराम सागर धरणाची साठवण क्षमता ११२ टीएमसी आहे. मात्र एकिकडे या धरणातून साधारणतः २०० टीएमसी पाणी समुद्रात वाहून जात असताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे महाराष्ट्राला अवघी पावणे दोन टीएमसी साठवण क्षमता असलेल्या बाभळी बंधाऱ्यात २८ ऑक्टोबरपूर्वी पाणी अडवता येत नाही. ही मोठी विसंगती आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे. आ. श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या सूचनेप्रमाणे बाभळी बंधाऱ्...
MLA Sreejaya Chavan : नांदेड जिल्ह्यात केळीचे टिश्यू कल्चर सेंटर मंजूर करा – आ. श्रीजया चव्हाण यांची विधानसभेत मागणी

MLA Sreejaya Chavan : नांदेड जिल्ह्यात केळीचे टिश्यू कल्चर सेंटर मंजूर करा – आ. श्रीजया चव्हाण यांची विधानसभेत मागणी

नांदेड, राजकीय
नांदेड| केळी उत्पादनाचा दर्जा व उत्पादकता वाढविण्यासाठी नांदेड जिल्ह्यात केळीचे टिश्यू कल्चर सेंटर मंजूर करण्याची मागणी आ. श्रीजया चव्हाण यांनी विधानसभेत केली. (Approve banana tissue culture center in Nanded district - MLA Sreejaya Chavan's demand in the Legislative Assembly) भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्रीजया चव्हाण यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना ही मागणी केली. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. केळी उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले तर त्यांच्या उत्पादनात अधिक वाढ होईल. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेड जिल्ह्यात केळीचे टिश्यू कल्चर सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. त्याला मान्यता देऊन आवश्यक त्या निधीची तरतूद करण्यात यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. सदर टिश्यू कल्चर सेंटरच्या मागणीसाठी खा. अशोकराव चव...
Cemetery question : राज्यातील दफनभूमी, स्मशानभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम राबवावा

Cemetery question : राज्यातील दफनभूमी, स्मशानभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम राबवावा

लातूर, मुंबई, राजकीय
मुंबई| मुंबईसह महाराष्ट्रात सध्या दफनभूमी आणि स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे असे नमूद करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील एकूण लोकसंख्या, जन्मदर, मृत्युदर आणि क्षेत्रफळ या गोष्टींचा विचार करून हा प्रश्न सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोमवारी विधानसभेत या विषयावरील चर्चेत सहभागी होताना केली आहे. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख या विषयावरील चर्चेत सहभागी होताना म्हणाले की, दफनभूमी तसेच स्मशानभूमी उपलब्धतेची मुंबई येथे खूपच गंभीर समस्या आहे, त्याचप्रमाणे राज्यात गावागावातही अलीकडच्या काळात या संदर्भातील अडचणी निर्माण होत आहेत, बहुतांश ठिकाणी शासनाने दफनभूमी आणि स्मशानभूमीची व्यवस्था केली आहे, काही ठिकाणी खाजगी स्वरूपाची ही व्यवस्था आहे परंतु, वेगवेगळ्या समाजाची वाढलेली लोकसंख्या, वाढलेल्या वस्त्या यामुळे अनेक ठिकाण...
error: Content is protected !!