HomeनांदेडNanded Super Specialty Hospital : नांदेड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रस्तावावर गतीमानतेने कार्यवाही...

Nanded Super Specialty Hospital : नांदेड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रस्तावावर गतीमानतेने कार्यवाही करा

नांदेड,अनिल मादसवार| येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ब्लॉक, कॅन्सर हॉस्पिटल, ट्रॉमा केअर सेंटर आणि बर्न इन्ज्युरी (लेव्हल-२) च्या उपचार सुविधा उभारण्याबाबतच्या प्रस्तावावर गतीमानतेने कार्यवाही (Take prompt action on the proposal for Nanded Super Specialty Hospital )करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.

नांदेडला सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलसह अन्य आजारांवरील उपचाराच्या सोयी निर्माण करण्यासाठी खा. अशोकराव चव्हाण मागील अनेक महिने प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र सरकारने याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारकडे यंदा जानेवारीत सादर केला होता. त्यानंतर खा. अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांची भेट घेऊन या मागणीबाबत सविस्तर चर्चा केली होती. या मागणीला केंद्रीय मंत्री नड्डा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. केंद्र व राज्य सरकारने ही मागणी लवकर मार्गी लावावी, यासाठी खा. चव्हाण आग्रही आहेत.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड आणि लगतच्या जिल्ह्यांसह आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील नागरिकांनाही आरोग्य सेवा देते. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात नांदेड शहर व या रुग्णालयाचे वाढलेले महत्व लक्षात घेता ही मागणी लवकरात लवकर मंजूर करण्याचा आग्रह खा. अशोकराव चव्हाण यांनी धरला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर फुफ्फूस, हृदय, मेंदू, किडनी, पचनसंस्था, कॅन्सर व रक्ताच्या आजारांवर नांदेडमध्येच आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दर्जेदार उपचार व शस्त्रक्रिया शक्य होणार आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments