Nanded Super Specialty Hospital : नांदेड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रस्तावावर गतीमानतेने कार्यवाही करा
नांदेड,अनिल मादसवार| येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ब्लॉक, कॅन्सर हॉस्पिटल, ट्रॉमा केअर सेंटर आणि बर्न इन्ज्युरी (लेव्हल-२) च्या उपचार सुविधा उभारण्याबाबतच्या प्रस्तावावर गतीमानतेने कार्यवाही (Take prompt action on the proposal for Nanded Super Specialty Hospital )करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.
नांदेडला सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलसह अन्य आजारांवरील उपचाराच्या सोयी निर्माण करण्यासाठी खा. अशोकराव चव्हाण मागील अनेक महिने प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र सरकारने याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारकडे यंदा जानेवारीत सादर केला होता. त्यानंतर खा. अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांची भेट घेऊन या मागणीबाबत सविस्तर चर्चा केली होती. या मागणील...
