HomeनांदेडMeenal Kanarwal : शेतकऱ्यांसाठी अनुदानावर गोबरगॅस योजना - मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल...

Meenal Kanarwal : शेतकऱ्यांसाठी अनुदानावर गोबरगॅस योजना – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल कनरवाल -NNL

नांदेड| ज्‍या शेतक-यांकडे चार ते पाच पेक्षा जास्‍त पशुधन असणा-या पशुपालकांना अनुदानावर गोबरगॅस योजनेचा लाभ देण्‍यात येणार आहे, अशी माहिती नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मिनल करनवाल यांनी दिली आहे.

एन.डी.डी.बी मृदा मार्फत ही योजना जिल्‍हयात राबविण्‍यात येणार असून केंद्र शासनाच्‍या वतीने एस.सी., एस.टी. व सामान्‍य वर्ग ओबीसाठी संवर्गातील शेतक-यांना अनुदान देण्‍यात येणार आहे. 2, 4, 6 व 8 क्‍यूबिक मीटर गॅस क्षमतेचे असणारे प्‍लांट शेतक-यांसाठी देण्‍यात येणार आहेत. यासाठी शेतक-यांकडे गुरे असणे आवश्‍यक आहे.     

योजनेचा लाभ घेण्‍यासाठी शेतक-यांनी आपल्‍या जवळच्‍या पशुवैद्यकीय दवाखान्‍यात अर्ज सादर करावेत. अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड व बॅक पासबुकची सत्‍यप्रत जोडावी. गोबरगॅस संयंत्रामुळे शेतकऱ्यांना इंधन खर्चात बचत होईल, जैविक खताचा वापर वाढेल तसेच महिलांना स्वयंपाकासाठी लाकूड गोळा करण्याचा त्रास कमी होईल. तरी शेतक-यांनी गोबरगॅस योजनेसाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

गोबरगॅस प्‍लांट, क्षमता व त्‍यानुसार देण्‍यात येणारे अनुदान

गॅस क्षमता (क्‍यूबिक) दररोज शेण पुरवठा (कि.ग्रा.) गुरांची संख्‍या       एकुण आवश्‍यक जागा (फूट) लांबी X रुंदी दररोज स्‍लरी उत्‍पादन (लिटर) केंद्रीय अनुदान राशी (रु) लोकासाठी पुरेसा गॅस
समान्‍य वर्ग- OBC SC/ST
2 45-50 3-4 10 X 12 80–90 14350 22000 6–8
4 90-100 6-8 10 X 15 170–180 14350 22000 9–12
6 130-150 9-12 12 X 20 240–360 22750 29250 12–16
8 180-200 12-16 12 X 25 340–360 23000 34500 18–24

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments